आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हराहुल यांचा चेहरा बदलला, राजकारणही बदलेल?:मध्य प्रदेश-राजस्थानातच भारत जोडो यात्रेची अग्निपरीक्षा

लेखक: राजेश शर्मा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुऱ्हाणपूरमधून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. दक्षिणेत मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता हिंदी पट्ट्यात यात्रा हिट करण्याचे आव्हान आहे. राहुल यांनी येथील लोकांची मने जिंकावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राहुल यांच्या मध्य प्रदेश दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादाचा परिणाम इतर हिंदी भाषिक राज्यांवरही होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते. यामुळेच राहुल यांचे भवितव्य ठरेल. 24 नोव्हेंबरपासून राहुल यांचा प्रवास सुरू होऊन 78 दिवस झाले आहेत.

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील मालवा-निमाडच्या 6 जिल्ह्यांतील 17 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. राहुल बुऱ्हाणपूर, खांडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर मालवा जिल्ह्यातून जाणार आहेत. यात्रेदरम्यान ते ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर या दोन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील. ही यात्रा जेव्हा मालवा पट्ट्यातून जाईल तेव्हा 26 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानी राहुल गांधी एका मोठ्या सभेलाही संबोधित करतील.

मालवा-निमाडमध्ये विधानसभेच्या 66 जागा, गेल्या वेळी काँग्रेसने 34 जिंकल्या

मालवा आणि निमाडमध्ये विधानसभेच्या 66 जागा आहेत. 2018 मध्ये भाजपला येथे 29 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, येथे 34 जागा जिंकून काँग्रेस 15 वर्षांनंतर मध्य प्रदेशात सत्तेवर आली होती. यापूर्वीच्या 3 निवडणुकांत भाजपची सत्ता स्थापन झाली होती. पुढील निवडणुकीत येथून 35 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काँग्रेसचा सत्तेचा मार्ग तयार करणार का? ही यात्रा 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मध्य प्रदेशात राहील, त्यानंतर ती राजस्थानकडे प्रयाण करेल.

321 लोकसभा मतदारसंघांत समीकरणे जुळवण्याची तयारी

ज्या 12 राज्यांमधून ही यात्रा काढली जात आहे, त्या मार्गात 321 लोकसभा मतदारसंघ येतात. 2019 मध्ये काँग्रेसला यापैकी केवळ 37 जागांवर विजय मिळाला होता. यापैकी 129 लोकसभा मतदारसंघ हे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगाणा, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांतील आहेत. हे लोकसभेच्या एकूण 543 जागांच्या सुमारे 24% आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या 129 जागांपैकी केवळ 29 जागा जिंकता आल्या होत्या. अनेक राज्यांत त्यांचे खातेही उघडले नाही. उत्तर भारत आणि इतर प्रदेशांच्या तुलनेत दक्षिण भारतात भाजपची स्थिती कमजोर आहे. राहुल याच जागांवर ताकद लावत आहे, जे मिशन 2024 साठी खूप महत्वाचे आहे.

ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई म्हणतात की, कर्नाटकमध्ये राहुल यांची अग्निपरीक्षा होईल. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाचा विचार केला तर दोन्ही राज्यांत काँग्रेसचा सुपडा साफ आहे. मला असे वाटते की, एखाद्या पक्षाने किंवा नेत्याने यात्रा काढली आणि त्यांची केंद्रात सत्ता आली. तर त्याचे प्रादेशिक परिणान निश्चितच असतात. त्यामुळेच कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये आश्चर्यकारक निकाल लागू शकतात. या यात्रेमुळे राहुल गांधींच्या रेटिंगमध्ये सुधारणा होऊ शकते, पण काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल, याबाबत साशंकता आहे.
ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई म्हणतात की, कर्नाटकमध्ये राहुल यांची अग्निपरीक्षा होईल. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाचा विचार केला तर दोन्ही राज्यांत काँग्रेसचा सुपडा साफ आहे. मला असे वाटते की, एखाद्या पक्षाने किंवा नेत्याने यात्रा काढली आणि त्यांची केंद्रात सत्ता आली. तर त्याचे प्रादेशिक परिणान निश्चितच असतात. त्यामुळेच कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये आश्चर्यकारक निकाल लागू शकतात. या यात्रेमुळे राहुल गांधींच्या रेटिंगमध्ये सुधारणा होऊ शकते, पण काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल, याबाबत साशंकता आहे.

लोकप्रियता वाढली, पण राहुल मोदींच्या मागे आहेत

काँग्रेसचे राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई म्हणतात की 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 19-20% मते मिळाली होती. राहुल गांधींची लोकप्रियता बघितली तर असे अनेक सर्वेक्षण झाले आहेत, ज्यामध्ये फक्त 9 ते 10% लोकांचीच पसंती राहुल हे आहेत. भाजपला 31 ते 38% मते मिळाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती देणारे 50% पेक्षा जास्त आहेत. भारत जोडो यात्रेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, राहुल यांच्याविषयी एक धारणा होती की ते बहुतेक वेळ परदेशात घालवतात.

या दौऱ्यामुळे राहुल यांनी त्यांची परदेशी पर्यटकाची प्रतिमा तर मोडीत काढलीच, पण एक गंभीर नेता म्हणूनही ते पुढे आले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये या दौऱ्याचा कितपत परिणाम झाला, या प्रश्नावर किडवई म्हणतात की, राहुल यांना दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक पाठिंबा मिळाला. तमिळनाडूबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेस येथे मित्रपक्षांवर अवलंबून आहे. येथे काँग्रेसची गाडी केवळ आघाडीच्या मदतीने धावत आहे. केरळमध्ये 2021 च्या निवडणुकीत राहुल गांधींना चांगले जनसमर्थन मिळाले होते, पण काँग्रेसला विजय मिळाला नव्हता.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मात्र राजस्थानात मोठा कलह आहे. काय मजबूरी आहे खाली वाचा...
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मात्र राजस्थानात मोठा कलह आहे. काय मजबूरी आहे खाली वाचा...

काँग्रेस राजस्थानमध्ये लाचार, मध्य प्रदेशात मजबूत आणि यूपी-बिहारमध्ये खस्ताहाल

ही यात्रा दक्षिणेतून निघून आता हिंदी भाषिक राज्यांमध्ये दाखल झाली आहे. यावर किडवई म्हणतात की बघा, जेव्हा आपण हिंदी पट्ट्याबद्दल बोलतो तेव्हा मुळात दोन प्रकारची राज्ये येतात. एक म्हणजे, जिथे आजही काँग्रेसची जमीन आहे. जसे की मध्य प्रदेश, जिथे काँग्रेस 2018 मध्ये सत्तेत आली होती. मध्य प्रदेशात काँग्रेसची स्थिती चांगली आहे. राज्यातील ज्या भागातून ही यात्रा जाणार आहे, त्या भागात काँग्रेस सक्रीय आहे. इथे नेत्यांनी श्रेय घेण्यासाठी उपयात्राही काढल्या आहेत, त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसची मुळे मजबूत आहेत.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात जसा संघर्ष सुरू आहे. त्यातून काँग्रेसची गटबाजीही दिसून येत आहे. एवढेच नाही तर पक्षाकडून ज्यांना नोटीस देण्यात आली त्यांनाच यात्रेचे समन्वयक बनवण्यात आले आहे. त्यामुळे यातूनच इथे काँग्रेस लाचार असल्याचे दिसते. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे तर इथे काँग्रेस खूपच कमकुवत आहे. या राज्यांमधून यात्रेचा खूप फायदा होईल अशी आशा कमी आहे.

लोकप्रियतेत अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुढे आहेत. या यात्रेमुळे राहुल यांच्या प्रतिमेत सुधारणा झाली आहे. मात्र सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नाही.
लोकप्रियतेत अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुढे आहेत. या यात्रेमुळे राहुल यांच्या प्रतिमेत सुधारणा झाली आहे. मात्र सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नाही.

चार-पाच राज्यांत राहुल यांची लोकप्रियता वाढली तर मोदींसाठी अडचणी वाढतील

किडवई म्हणतात की, राहुल गांधींसमोर सर्वात मोठे आव्हान आहे की काँग्रेसचा आलेख कसा वाढवायचा? जर त्यांनी काँग्रेसचे समर्थन आणि त्यांचे स्वतःचे (राहुल गांधींचा) समर्थन यातील फरक भरून काढला तर ते त्यांच्यासाठी खूप मोठे यश असेल. देशात नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेसमोर कोणत्याही नेत्याचा प्रभाव फक्त सिंगल डिजिटमध्येच आहे. मग त्या ममता बॅनर्जी असो किंवा नितीशकुमार. असे असतानाही केवळ काँग्रेसच तेवढा दमखम दाखवत आहे. मोदींसारखा डोंगर पार करण्याचे आव्हान काँग्रेसच पेलवू शकते. काँग्रेसचा हा इतिहासही राहिला आहे. या दौऱ्याने राहुल गांधींचा आलेख राष्ट्रीय स्तरावर वाढू शकतो.

देशात काही ठिकाणी राहुल गांधींचा आलेख अजूनही नरेंद्र मोदींपेक्षा वरच आहे, पण तो राज्यवार आहे. त्यात तमिळनाडू, केरळ आणि पंजाब आहेत असेही किडवई म्हणतात. त्यात आणखी चार-पाच राज्यांची भर पडली तर राहुल यांच्या राजकीय भवितव्यासाठी ते यशदायक ठरेल. यात्रेदरम्यान राहुल गांधी काँग्रेसच्या अजेंड्याऐवजी नागरी समाजाचे प्रश्न जोरकसपणे मांडत आहेत, त्याचा थेट मतांशी ताळमेळ दिसत नाही.

आदीवासी मतदारांना आपल्या बाजूने करायचे आहे?

या प्रश्नावर राजकीय विश्लेषक अरुण दीक्षित सांगतात की, गेल्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींच्या जागा काँग्रेसला जास्त आणि भाजपला कमी मिळाल्या. आदिवासींबद्दल खूप बोलले जाते. हा वर्ग आता जागरूक झाला आहे, पण दुर्दैव हे की आदिवासी नेतृत्व विकले जाते किंवा लोभी होते. राहुल गांधी या यात्रेत गरीब, शेतकरी आणि खालच्या आणि उपेक्षित घटकांबद्दल बोलत आहेत.

मला वाटते की, राज्यातील नेत्यांनी राज्याचे प्रश्न मांडण्याचा आणि योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच परिणाम होईल, कारण काँग्रेसचा अध्यक्ष कोणीही असो, गांधी घराणे हे सर्वमान्य नेतृत्व करणारे कुटुंब आहे. याच कारणामुळे मध्य प्रदेशात यात्रेविषयी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मात्र संधी तर काँग्रेसचेच लोक देत ​​आहेत. जर नेत्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले नाहीत तर यात्रेचा फारसा परिणाम होणार नाही. अशा स्थितीत राहुल गांधींच्या राज्यातील 370 किमीच्या प्रवासाने 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नशीब बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तमिळनाडूःइथून सुरुवात करणे भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचे होते

राहुल गांधी यांच्यासाठी दक्षिणेकडील या राज्यातून प्रवासाची सुरुवात करणे केवळ भौगोलिकच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचे होते. राहुल गांधी यांनी श्रीपेरंबदूर येथे वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करून पदयात्रेला सुरुवात केली. 8 सप्टेंबर रोजी जेव्हा राहुल यांची पदयात्रा रस्त्यांवर सुरु झाली होती, तेव्हा कमेंट सुरु झाल्या होत्या की, ट्विटर पार्टी आता रस्त्यावर उतरली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेस आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त 8 तर अण्णा द्रमुकला एक जागा मिळाली होती. तमिळनाडूमध्ये भाजपचे केडर आणि जागांची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्यांची क्रांतिकारी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. द्रमुक हा येथे काँग्रेसचा मित्रपक्ष आहे.

केरळः11% जास्त मते मिळाली, आता यात्रेमुळे अपेक्षा

2021 मधील केरळ विधानसभा निवडणुका याला अपवाद ठरली, ज्यात LDF ला जास्त जागा आणि मताधिक्य मिळवून सत्ता राखण्यात यश आले होते. केरळ निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सक्रीय प्रचारानंतरही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीने राज्यातील 20 पैकी 19 जागा जिंकल्या. एवढेच नाही तर युतीला एलडीएफपेक्षा 11% जास्त मते मिळाली होती. राहुल गांधी हे वायनाडचे खासदार असणे, केरळमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याच्या वातावरणात यात्रेचे यश काँग्रेससाठी सोपे नव्हते, मात्र नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून हेही समोर आले आहे की, केरळशिवाय तमिळनाडूतही राहुल गांधी खूप लोकप्रिय आहेत.

कर्नाटकः7 लोकसभा आणि 21 विधानसभा मतदारसंघातून प्रवास

कर्नाटक हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी आणीबाणीनंतरच्या निवडणुकीतही जेव्हा संपूर्ण उत्तर भारत कोरडा होता. तेव्हा कर्नाटकातच काँग्रेसला 28 पैकी 24 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटक हे अनेक वेळा काँग्रेसच्या विघटनाचे मूळ कारण ठरले आहे, हेही खरे आहे. विधानसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत राज्याच्या नेत्यांसाठी ही मौके पे चौका मारण्याची संधी होती.

यात्रेचा मार्ग आणि राजकीय समीकरणे पाहता कर्नाटकातील ही यात्रा चामराजनगर, म्हैसूर, मंड्या, तुमकूर, चित्रदुर्ग, बेल्लारी आणि रायचूर या सात संसदीय जिल्ह्यांतून गेली. या सात लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या किमान 21 जागा आहेत. येथे 2018 च्या निवडणुकीत 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला 80 जागा, भाजपला 104 जागा, जेडीएसला 30 जागा मिळाल्या होत्या. अपक्षांकडे 5 जागा होत्या, मात्र दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या अनेक आमदारांनी साथ सोडल्यामुळे आज पोटनिवडणुकीनंतर भाजपचा आकडा 120 तर काँग्रेसचा आकडा 69 वर पोहोचला आहे.

आंध्र प्रदेशः2019 मध्ये काँग्रेसला NOTA पेक्षाही कमी मते मिळाली होती

2014 किंवा 2019 मध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही अशा राज्यात यात्रेने प्रवेश करणे हे काँग्रेससमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. एकेकाळी आंध्र हा काँग्रेसचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. 2004 मध्ये काँग्रेसच्या पुनरागमनात आंध्र प्रदेशने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राजकीय परिस्थिती अशी बदलली आहे की आंध्र प्रदेशची राजकीय जमीन काँग्रेससाठी कोरडी झाली आहे. 2019 च्या निवडणुकीच्या उन्हाळ्यात आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला 1.29% मते मिळाली, जी NOTA पेक्षाही कमी होती. राज्याचे विभाजन आणि तेलंगाणाची निर्मिती हे 2014 साली काँग्रेसच्या पतनाचे कारण होते, त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा (वायएसआरसीपी) उदय झाला, ज्याची काँग्रेसला जाणीव होती.

तेलंगाणाःफक्त 3 खासदार आणि 5 आमदार

एक काळ असा होता की आंध्र प्रदेश काँग्रेससाठी ब्रह्मास्त्रापेक्षा कमी नव्हते. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 42 पैकी 33 खासदार संयुक्त आंध्रमधून आले होते. 2014 पासून तेलंगाणातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता 8 वर्षांनंतरही तेलंगाणातून पक्षाकडे केवळ 3 खासदार आणि 5 आमदार आहेत. तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाला 18 जागा मिळाल्या. मात्र वर्षभरातच 12 आमदारांनी पक्ष सोडला. तेलंगाणा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. 2014 ते 2019 या काळात राहुल गांधी येथे सातत्याने येत आहेत. नुकतीच वारंगलमध्ये राहुल गांधींची मोठी रॅली झाली, त्यातील गर्दी पाहून काँग्रेसमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रः15 विधानसभा आणि 6 लोकसभेच्या जागांवर परिणाम

या यात्रेने 14 दिवसांत महाराष्ट्रातील हिंगोली, वाशीम, अकोला, नांदेड, बुलढाणा आणि जळगाव या सहा जिल्ह्यांतून प्रवास केला. यादरम्यान 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघ कव्हर झाले. या यात्रेत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. राहुल गांधींसोबत तेही पदयात्रेत चालले. महाराष्ट्रातील सुमारे 250 बड्या साहित्यिकांनीही राहुल यांच्या यात्रेला पाठिंबा दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे 44 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास महाआघाडीमध्ये काँग्रेस तिसरा सहकारी पक्ष होता. येथे भाजप (105) नंतर शिवसेनेला 56 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्या. तिघांनी मिळून सरकार स्थापन केले, पण त्यांना दोन वर्षेही पूर्ण करता आली नाहीत.

राजस्थानःझालवाड्यातून एन्ट्री, वसुंधरा यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला मुसंडी मारता येणार?

गेल्या 9 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झालवाड-बारण लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिथूनच राहुल राजस्थानमध्ये प्रवेश करत आहेत. येथे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे 5 वेळा आणि त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह (1989 ते 2019) सलग 4 वेळा खासदार आहेत. यानंतर ही यात्रा कोटा, बुंदी आणि सवाई माधोपूर, दौसा मार्गे अलवरला पोहोचेल. अलवर जिल्ह्यातून हरियाणातील झिरका आणि त्यानंतर पंजाबमधील फिरोजपूरमध्ये प्रवेश करेल.

संपूर्ण मार्गात राजस्थान हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसची सत्ता आहे.

राहुल गांधी यांनी केरळमधून यात्रेला सुरुवात केली. ती तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांनंतर 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर या यात्रेच्या मार्गावर राजस्थान हेच एकमेव राज्य आहे, जिथे काँग्रेसची सत्ता आहे. राजस्थानमध्ये डिसेंबर 2023 मध्ये विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत आणि त्यानंतर सहा महिन्यांनी मे-2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत या दोन्ही निवडणुकांमध्ये या यात्रेचा परिणाम होणार हे नक्की, कारण ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे नाहीत तिथेही राहुल गांधी आणि त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यात्रेतून 60 विधानसभा आणि 9 लोकसभेच्या जागांवर नजर

ही यात्रा दक्षिण-पूर्व राजस्थान ते ईशान्य राजस्थानपर्यंत 521 किमी अंतर कापेल. या भागातील सुमारे 60 जागांवर त्याचा विशेष प्रभाव पडेल, कारण यादरम्यान राहुल गांधींसह काँग्रेसचे सर्व बडे नेते याच भागात असतील. यादरम्यान, काँग्रेस पूर्व राजस्थान कालवा प्रकल्पावरूनही (ईआरसीपी) भाजपला कोंडीत पकडेल. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये यापूर्वीच वातावरण गरम आहे. या 60 विधानसभेच्या जागांव्यतिरिक्त लोकसभेच्या 9 जागांवर परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...