आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Raj Kundra Porn Case Explainer| Kundra Pornography Case; What Is The Difference Between Erotica And Pornography

एक्सप्लेनर:पोर्नोग्राफी प्रकरणात अडकला राज कुंद्रा; पोर्नोग्राफी आणि इरॉटिक कॉन्टेंटमध्ये फरक काय? कायद्यात कशी आहे तरतूद?

2 महिन्यांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
 • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या जामीन अर्जावर मुंबईतील सत्र न्यायालयात 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते. हायप्रोफाइल खटल्याशी संबंधित वकील सुभाष जाधव यांच्या मते, राज कुंद्रावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्याने बनवलेला कॉन्टेंट पोर्न नाही तर इरॉटिक आहे. अर्थात कुंद्राने बनवलेले व्हिडिओ अश्लील नसून उत्तेजक होते असे वकीलांचे म्हणणे आहे.

आता अशात पोर्न आणि इरॉटिक कॉन्टेंटमध्ये फरक आहे का? असला तरीही, कायद्यानुसार त्यात अंतर करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

राज कुंद्रावर काय आहे आरोप?
मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी दावा केला होता, की राज कुंद्राच्या विरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पुरावे आहेत. कोर्टाने कुंद्राला आधी 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडी आणि नंतर 27 जुलै पर्यंत न्यायलयीन कोठडीत पाठवले. तेव्हापासूनच तो तुरुंगात आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला हॉटशॉट्स या अ‍ॅपवर पोर्नोग्राफिक कॉन्टेंट बनवून टाकण्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हटले आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (C) (वोयरिझ्म- कपलच्या खासगी क्षणांमध्ये डोकावणे), कलम 292 व 293 (अश्लील सामुग्री दाखवणे आणि विकणे) आणि कलम 420 (फसवणूक) इत्यादी आरोप दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच, त्याच्याविरुद्ध इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) अ‍ॅक्टच्या कलम 67 आणि 67 A (अश्लील कॉन्टेंट के ट्रान्समिशन) असे आरोपही केले आहेत.

पोर्नोग्राफी म्हणजे काय?

पोर्नोग्राफी म्हणजे असा कॉन्टेंट जे कुणालाही सेक्शुअली उत्तेजित करेल. ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या व्याख्येनुसार, पोर्नोग्राफीचा अर्थ न्यूड होऊन असे हावभाव करणे जेणेकरून प्रेक्षक उत्तेजित होतील. यात फोटो आणि व्हिडिओंचा समावेश आहे. तसेच यामध्ये गुप्तांग दाखवले जातात.

आता इरॉटिका म्हणजे काय?

 • इरॉटिका म्हणजे उत्तेजित करणारा कॉन्टेंट असले तरी यात थोडा फरक आहे. यामध्ये कलात्मक पद्धतीने सेक्सचे थीम प्रस्तुत केले जाते. पेन्टिंग, मूर्ती, फोटोग्राफी, ड्रामा, चित्रपट, संगीत किंवा साहित्य यात समाविष्ट असतात.
 • सेक्सला मावनी संवेदनेच्या स्वरुपात प्रस्तुत करणे इरॉटिका आहे. यात केवळ अश्लीलता किंवा नग्नता नसते तर कलात्मकता हा हेतू असतो. सोबतच इरॉटिक कॉन्टेंटसाठी न्युडिटी आवश्यक नसते. उल्लू आणि अल्ट बालाजी यासारखे OTT प्लॅटफॉर्म्सवर येणारे कॉन्टेंट अशाच स्वरुपाचे आणि केवळ प्रोढांसाठी असते.

मग पोर्नोग्राफी आणि इरॉटिका यात फरक कसा करणार?

 • मुळात हा विषय जगभरात वादाचा ठरलेला आहे. अमेरिकन चित्रपट निर्मात्या लुसी फिशर यांच्या मते, इरॉटिकामध्ये रेशीम तर पोर्नोग्राफीमध्ये नायलॉनचा अनुभव असतो. इरॉटिका मध्यम वर्गातील प्रगत लोकांसाठी आहे तर पोर्नोग्राफी एकट्या, अनाकर्षक आणि अशिक्षित लोकांसाठी आहे.
 • सरळ-सरळ म्हटल्यास गुप्तांग दाखवणे म्हणजे पोर्न आहे तर ते दाखवल्याशिवाय उत्तेजित करणे हे इरॉटिका आहे. अर्थातच दोन्हीचा हेतू उत्तेजना हाच असतो. तर काहींच्या मते यात आणखी एक फरक आहे तो कमाईचा. पोर्नचा मुख्य हेतू पैसा कमवणे आहे. तर इरॉटिकामध्ये कलाकारी आहे. यात प्रॉडक्शन आणि पॅकेजिंगला खूप महत्व आहे. इरॉटिका पैसे कमवण्यासाठी नाही, तर एक पॅकेज कलात्मक पद्धतीने सादर वापरली जाते.
 • काही लोक तर इरॉटिकाला उच्चभ्रू पोर्नोग्राफी पोर्नोग्राफी असेच म्हणतात. असे म्हणणाऱ्यांच्या मते, इरॉटिका एका खास वर्गासाठी डिझाइन करण्यात आलेले प्रॉडक्ट आहे. दोन्हीचा हेतू शेवटी एकच आहे.

भारताय पोर्न दाखवणे बेकायदा आहे?

नाही. भारतात एकट्यात पोर्नोग्राफी पाहणे गुन्हा किंवा बेकायदा नाही. सुप्रीम कोर्टाने जुलै 2015 मध्ये म्हटले होते, की घरात बसून एकट्यात पोर्न पाहणाऱ्या एखाद्या प्रौढ व्यक्तीला आपण थांबवू शकत नाही. हा त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. याचा अर्थ असा नाही की सगळंच चालेल. माहिती तंत्रज्ञान IT कायद्यानुसार चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे, शेअर करणे गुन्हा आहे.

भारतीय कायद्यात पोर्नोग्राफी, इरॉटिकात काय अंतर?

 • भारतात कायद्यानुसार यामध्ये फरक करण्यात आलेला नाही. कलाकार वर्ग नेहमीच इरॉटिकाचे समर्थन करताना दिसून येतो. हा त्या-त्या कलाकाराचा दृष्टीकोन असू शकतो. भारतीय कायद्यात एखाद्या अश्लील कॉन्टेंटला अश्लील असेच म्हटले जाते. त्यात पोर्नोग्राफी आणि इरॉटिका असा काहीच फरक नाही. अश्लील, पोर्नोग्राफिक, इरॉटिक सर्व प्रकारच्या कॉन्टेंटला अश्लील असेच म्हटले जाते. यासाठी आयटी कायदा 2000, भारतीय दंड विधान आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेज (POCSO) कायदा 2012 मध्ये शिक्षा नमूद करण्यात आल्या आहेत.
 • दिल्लीतील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. विकास पाहवा यांनी एका मुलाखतीमध्ये पोर्नोग्राफीची भारतीय कायद्यात विशेष व्याख्या नाही असे म्हटले होते. कुंद्राच्या विरोधात लागलेले आरोप प्रामुख्याने IT अॅक्टच्या कलम 67 आणि कलम 67 A अंतर्गत आहेत. कोर्टाने त्याला दोषी ठरवल्यास 5 ते 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

अश्लील कॉन्टेंटवर भारतीय कायद्यात काय तरतूद?

 • भारतीय दंड विधानाच्या कलम 292 मध्ये उत्तेजक सामुग्रीला अश्लील म्हटले आहे. यानुसार अश्लील सामुग्रीच्या माध्यमातून कुणी पैसे कमवत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते. कलम 293 मध्ये सांगण्यात आले की 20 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना हा कॉन्टेंट विकला जाऊ शकत नाही. तसेच दाखवता देखील येणार नाही.
 • इंडीसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन (प्रोहिबिशन) अ‍ॅक्ट 1986 मध्ये महिलांना अश्लील पद्धतीने प्रस्तुत करणारा कॉन्टेंट प्रतिबंधित आहे. अशा स्वरुपाची सामुग्री प्रकाशित, अरेंज किंवा ट्रान्समिट करण्यास बंदी आहे. 2012 पासून या कायद्यामध्ये एक सुधारणा प्रलंबित आहे. त्यात इंटरनेट, केबल टीव्ही किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन मार्फत होणारे ट्रान्समिशन सुद्धा प्रतिबंधित करण्याची तरतूद आहे.
 • आयटी अ‍ॅक्टच्या कलम 67 मध्ये अश्लील सामुग्रीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशन आणि ट्रान्समिशनवर बंदी आहे. याचे उल्लंघन केल्यास 3 वर्षांची कैद होऊ शकते. तसेच 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
 • IT अ‍ॅक्टच्या कलम 67 A सेक्शुअली उत्तेजित करणारे कॉन्टेंट बनवणाऱ्यांवर लागू होते. यात थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दाखवले किंवा नाही याचा फरक पडत नाही. व्हिडिओमध्ये पुरुष किंवा महिलांचे कपडे काढतानाचे दृश्य असतील तर त्याला सुद्धा अश्लील सामुग्री म्हटले आहे. यात कमाल 5 वर्षांची कैद आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
बातम्या आणखी आहेत...