आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टमाझी ओळख सांगणारे 16 पानांचे पत्र लिहिले:मला मुले नाही तर मुली आवडतात; आईला स्वीकारायला लागली 4 वर्षे

नीरज झा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ते 2017-18 चे वर्ष होते. मी पप्पाला मुंबईत एका चहाच्या टपरीवर बोलावले आणि त्यांना 16 पानांचे पत्र दिले. या पत्रात मी त्यांना माझ्या खऱ्या ओळखीबद्दल सर्व काही लिहिले होते.

वडिलांना ते पत्र देतांना म्हटले, लक्ष्यात ठेवा मी तुमची मुलगी आहे.….या वाक्याने त्यांना धक्का बसला, मी पत्रात काय लिहिलंय असा त्यांना प्रश्न पडला. चहा पीतांनाच ते पत्राची पाने उलटू लागले. काही पाने वाचल्यावर त्यांना रडू कोसळले. ते एका नजरेने माझ्याकडे पाहत होते तर एका नजरेने पानांवर लिहिलेली अक्षरे वाचत होते.'

वयाच्या 23 व्या वर्षी, जोधपूर, राजस्थान येथील अंकिता मेहराने जगाला सांगितले की, ती LGBTQ+ समुदायातील आहे.

अंकिता सध्या बंगळुरूमध्ये राहते. तिला तिच्या ओळखीची लाज वाटत नाही, तिला अभिमान वाटतो. ती म्हणते- खूप धाडसानंतर मी VOOT वरील टीव्ही शोद्वारे जगाला सांगितले की, मी लेस्बियन आहे. मला मुली आवडतात, मुले नाहीत.

मला ही ओळख घेऊन जगायचे होते. मला स्वीकारायला माझ्या आईला 4 वर्षे लागली. मात्र, वडील आणि बहिणीने पूर्ण साथ दिली.

वास्तविक, समलैंगिकांच्या समुदायाला (समान लिंगाचे आकर्षण) LGBTQ+ समुदाय म्हणतात. LGBTQ+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर यासह विविध प्रवृत्तीचे लोक.

या फोटोमध्ये अंकिता मेहरा तिच्या आईसोबत आहे. अंकिता लहान असताना नातेवाईक तिच्या लैंगिकतेची चेष्टा करायचे.
या फोटोमध्ये अंकिता मेहरा तिच्या आईसोबत आहे. अंकिता लहान असताना नातेवाईक तिच्या लैंगिकतेची चेष्टा करायचे.

अंकिता सांगते, माझाही जन्म सामान्य मुलांसारखा झाला. पत्र वाचून पप्पांनी मला मिठी मारली. म्हणाले, तू कशीही असो, तु माझी मुलगी आहेस. ते हवाई दलात होते. दर दोन-तीन वर्षांनी त्यांची बदली होती.

माझ्या खऱ्या ओळखीसह मी गेल्या 6 वर्षांपासून बंगलोरमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतेय. लोकांना माझ्या समाजाची जाणीव करून देतेय. आतापर्यंत, मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 300 हून अधिक सत्रांना संबोधित केले आहे.

अंकिता तिच्या बालपणीच्या दिवसाच्या आठवणी सांगते. मला वाटायचं, हळूहळू ते नॉर्मल होईल, पण तसं झालं नाही. शाळेत जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. माझा सगळा वेळ स्वतःला ओळखण्यात जात होता. कमी नेमकी आहे कोण? माझी ओळख काय आहे?

अंकिता पुढे तिच्या आयुष्यातील घटना सांगते. ती मोठी झाल्यावर डिप्रेशनमध्ये राहू लागली. या गोष्टी कुणाला सांगितल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं नेहमी वाटायचं. थोडी आशा आणि हिंमत दाखवून तीने आपल्याबद्दल शाळेतील मित्रांना सांगितले, तर ते म्हणाले, 'तुला काहीतरी प्रॉब्लम आहे, तु आमच्यापासून दूर राहा.'

अंकिता 14 वर्षांची असताना तिने सर्वप्रथम आपल्या बहिणीला स्वतःबद्दल सांगितले होते.

आजही कॉलेजचे दिवस आठवले की, ती घाबरते. सांगते, नाशिकच्या एका कॉलेजमध्ये बी. कॉमला प्रवेश घेतला होता. कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी मुलांनी माझ्यावर अश्लील कमेंट करायला सुरुवात केली. ते मला म्हणायचे- 'उद्यापासून मुलगी म्हणून ये', पण काही मित्र मला समजून घेणारेही होते.

कॉलेजला जाण्याची नेहमी भीती वाटत होती. माझी 3 वर्षे मी भीतीमध्ये घालवली. अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मग जेव्हा मला वाटले की, मी जगातून निघून गेल्यावरही ही समस्या संपू शकत नाही. माझ्यासारख्या अनेक अंकिता असतील. त्यांचा विचार करून समाजात बदल घडवून आणण्याचा विचार केला.

अंकिता म्हणते की, चित्रपटांनी LGBTQ+ समुदायाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. समाजात आमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
अंकिता म्हणते की, चित्रपटांनी LGBTQ+ समुदायाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. समाजात आमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.

अंकिताला हा त्रास कॉलेजपुरता मर्यादित होता असे नाही. नोकरीच्या पहिल्या अनुभवाविषयी ती सांगते, मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जायचे तेव्हा लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे. माझे वेगवेगळे पोशाख पाहून ते विचित्र प्रश्न विचारायचे. पास आऊट झाल्यावर पहिली नोकरी कॉल सेंटरमध्ये केली होती.

ती एक वाक्य पुन्हा सांगते. ती म्हणते, मुलाखतकाराने विचारले, 'तुझे केस इतके लहान का आहेत? लहानपणापासून असे केस आहेत का?’ आजही माझ्यासोबत किंवा माझ्या समाजातील लोकांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

अंकिता म्हणते, ' My sexuality is my identity, not my introduction (माझी लैंगिकता ही माझी ओळख आहे, परिचय नाही). आज मी चेंजमेकर आहे, पिडीत नाही.

अंकिता शेवटी म्हणते, मी विमानतळ, मॉल्ससह अनेक सार्वजनिक ठिकाणी जेंडर न्यूट्रल वॉशरूमसाठी प्रचार करत आहे.

अंकिता आता पब्लिक स्पीकर म्हणून ओळखली जाते. कंपन्यांमध्ये जाऊन, ती LGBTQ + समुदायाबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करते.

काही महत्वाचे तथ्य

सप्टेंबर 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने LGBTQ + समुदायासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने 158 वर्षे जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मधील तो भाग रद्द केला होता, ज्याने समान लिंगाच्या लोकांमध्ये लैंगिक संबंध हा गुन्हा ठरवला होता.

रॉयटर्सच्या 2019 च्या अहवालानुसार, देशातील LGBTQ+ च्या लोकसंख्येबद्दल कोणताही अधिकृत डाटा नाही. वास्तविक, सरकारच्या दाव्यानुसार, समलिंगी लोकांची एकूण संख्या 25 लाखांच्या जवळपास आहे.

बातम्या आणखी आहेत...