आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टती 9 महिन्यांची असताना मणके तुटले:10 वर्षे तर वॉशरुममध्येही जाता येत नव्हते, तरीही नेमबाजीत 6 पदके मिळवली

नीरज झा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याचा दिवस होता. ही घटना आजपासून 14 वर्षांपूर्वीची आहे. मी 9 महिन्यांची होते. आम्ही माऊंट अबूहून गाडीत खाली परत येत होतो. तेवढ्यात अचानक एक उंट जंगलातून बाहेर आला. उंटाला वाचवताना कार ट्रकला धडकली.

मला अंतर्गत दुखापत झाली, तर माझ्या पालकांचेही फ्रॅक्चर झाले होते. मला दोन-तीन दिवस झाले तरी पाय हलवता येत नव्हते. तापही उतरत नव्हता. पप्पानी डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचे निदान केले. डॉक्टरांनी ऑपरेशन देखील केले.

या दरम्यान माझ्या मणक्याचे तुकडे झाले होते आणि मानेच्या खालच्या भागात संवेदना नष्ट झाल्या होत्या. म्हणजे मानेच्या खालच्या भागात कुठेही सुई टोचली असती तरी मला ते लक्ष्यात आले नसते. सुमारे 10 वर्षे वॉशरूममध्येही जात येत नव्हते.

पॅराशूटर असलेल्या 13 वर्षीय सिमरन शर्मा यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथे झाला, परंतु संपूर्ण कुटुंब फरीदाबादमध्ये राहते. रायफल शूटिंगच्या ट्रेनिंगला जाण्यापूर्वी सिमरन ही कहाणी आमच्यासोबत शेअर करत आहे.

सिमरन म्हणते, ही घटना घडली तेव्हा मी खूप लहान होते. मला काही आठवत नाही. मी फक्त पप्पाला या सर्व गोष्टी इतरांना सांगताना ऐकले आहे. पण आजही त्या गोष्टी सांगताना पप्पा थरथर कापतात.

आता मी मोठी झाले आहे. मी हळूहळू बरी होत आहे. वरचा भाग पूर्णपणे कार्यरत आहे, परंतु खालच्या भागात अद्याप संवेदना नाहीत. आजही मी डायपर वापरते जेणेकरुन अंथरुण घाण होऊ नये. या सर्व आव्हानांना न जुमानता मी पॅराशूटर म्हणून माझा ठसा उमटवला आहे.

सिमरनने रायफल शूटिंगमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 6 हून अधिक पदके जिंकली आहेत. सध्या ती वर्ल्ड कप आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये जाण्याची तयारी करत आहे.
सिमरनने रायफल शूटिंगमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 6 हून अधिक पदके जिंकली आहेत. सध्या ती वर्ल्ड कप आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये जाण्याची तयारी करत आहे.

सिमरन तिच्या कथेत पुढे सांगते की, मी अडीच वर्षांची झाल्यावर माझ्या वडिलांना मला शाळेत टाकयचे होते. त्यामुळे वाचन-लेखनात व्यस्त राहील असे त्यांना वाटत होते. यामुळे माझ्यावरील मानसिक तणाव देखील कमी होईल. पण इथेही सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पप्पांनी माझ्यासाठी खास खुर्ची बनवली होती. कारण, मला त्यावेळी व्हीलचेअरवर बसता येत नव्हते. काही शाळांनी प्रवेश देण्यासही नकार दिला. त्यांना वाटले की, मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.

कसाबसा मला एका शाळेत प्रवेश मिळाला. मी अभ्यास करू लागले, पण मुलं मला चिडवायची. कोणालाच माझे मित्र बनायचे नव्हते. जेव्हा मला त्यांच्यासोबत खेळायचे होते तेव्हा ते म्हणायचे, 'तुला पायावर चालता येत नाही, तर खेळणार कसे?' त्यानंतर मी माझ्या हातांनी माझे नशीब बदलण्याचा निर्णय घेतला. मला आजही पहिल्यांदा रायफल उचलली ती घटना आठवते. तोपर्यंत मी 9 वर्षांची झाले होते. तेव्हा मी चौथीत शिकत होते. शाळेत रायफल शूटिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तेव्हा मी 10.9 चे लक्ष्य काठले होते. म्हणजेच माझा निशाना जवळपास अचूक होता. यानंतर माझ्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांशी बोलले आणि तेथून माझी रायफल शूटिंग करिअरला सुरुवात झाली. पण तोपर्यंत घरच्यांना किंवा मला रायफल शूटिंगची एबीसीडी देखील माहीत नव्हती. त्यामुळे माझी राज्यस्तरावर निवड होऊ शकली नाही.

सिमरनच्या वडिलांनी तीला हरियाणातील अंबाला येथील रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. येथे ती वर्षभर राहिली.
सिमरनच्या वडिलांनी तीला हरियाणातील अंबाला येथील रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. येथे ती वर्षभर राहिली.

सिमरन म्हणते, “माझ्या प्रशिक्षणामुळे संपूर्ण कुटुंबाला इथे शिफ्ट व्हावे लागले. घरच्यांनी मला कधीच एकटं वाटू दिलं नाही. पप्पा फरीदाबादला कामाला असायचे, त्यामुळे ते मला दर आठवड्याला भेटायला यायचे.

माझ्या आई-वडिलांमुळे मला प्रेरणा मिळत राहिली. याचा परिणाम म्हणून मी राष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. सोफिया वर्ल्ड कपमध्येही निवड झाली होती, पण कोरोनामुळे मी जाऊ शकले नाही. आता ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न आहे.

मला आजही ते दिवस आठवतात, आम्ही माझ्या गावी जायचो, तेव्हा लोकांना माझी दया यायची. ते म्हणायचे, या मुलीवर देवाने खूप अन्याय केला. आता ही मुलगी कसे आयुष्य काढेल?

शाळेतही शिक्षक भेदभाव करायचे. कोणत्याही उपक्रमात मला शेवटी बोलावले जायचे. कारण विचारल्यावर ते म्हणायचे, 'सर्व मुलांमध्ये ही मुलगी व्हीलचेअरवर कशी सहभागी होईल. तु हे सर्व उपक्रम करू शकणार नाही.’

आजही मी माझ्या पायावर चालू शकत नाही, पण मी मुक्तपणे जीवन जगत आहे. माझे कुटुंब आता माझ्या नावाने ओळखले जाते. मी माझ्या आई-वडिलांचे पहिले अपत्य आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते लोक सुमारे 2 वर्षे डिप्रेशनमध्ये होते, परंतु त्यांनी वास्तव स्वीकारले. मी देखील त्याची हिंमत कधीही तुटू दिली नाही.

या छायाचित्रात सिमरन तिच्या आई-वडिलांसोबत आहे. सिमरन स्विमिंग देखील करते. ती कोणत्याही आधाराशिवाय 20 फुटांपर्यंत पोहू शकते.
या छायाचित्रात सिमरन तिच्या आई-वडिलांसोबत आहे. सिमरन स्विमिंग देखील करते. ती कोणत्याही आधाराशिवाय 20 फुटांपर्यंत पोहू शकते.

सिमरन सांगते की, पायात प्राण नसतानाही मी जलतरणात पदके जिंकली आहेत. पण मी हे रिलॅक्स वाटण्यासाठी करते. मी पियानो वाजवते. मी नाचते देखील. त्यासाठी मला 'डान्स इंडिया डान्स' या रिअ‍ॅलिटी शोच्या जजचे मार्गदर्शन मिळाले होते, त्यानंतर शाळेतील लोकही मला दैनंदिन कार्यक्रमात सहभागी करून घेऊ लागले.

अनेकवेळा असे घडले की अपंग असल्यामुळे अनेक ठिकाणी नाकारही मिळाला. अनेक ठिकाणी चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्प नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या.

आजही भौतिक आव्हाने आहेतच, सोबतच आर्थिक संकटही पार करावे लागते. माझ्या सरावाच्या खर्चामुळे माझ्या कुटुंबालाही आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. माझ्या प्रशिक्षणावर दर महिन्याला सुमारे 50 हजार रुपये खर्च होतात.

रायफल शुटिंगचा सराव बराच खर्चिक आहे. सरकारही मदत करत नाही. पदक जिंकून आल्यावर अनेक मंत्री पुरस्काराच्या नावावर काही लाख रुपये देऊन निघून जातात, हे दुर्दैव आहे, पण त्याआधी किंवा नंतर कोणीही विचारणार नाही.

आजही जेव्हा मी वर्तमानपत्रात वाचते की, एखाद्या खेळाडूला घर चालवण्यासाठी इतर कामे करावी लागतात तेव्हा मी खूप निराश होते.

खालील लिंकला क्लिक करुन आणखी बातम्या देखील वाचा....

फेकलेले अन्न खाल्ले:प्रसादाने भूक भागवली, पोते घालून रात्री काढल्या; वाचा पिझ्झा स्टॉल सुरू करणाऱ्या अनाथाची कहाणी

माझी ओळख सांगणारे 16 पानांचे पत्र लिहिले:मला मुले नाही तर मुली आवडतात; आईला स्वीकारायला लागली 4 वर्षे

बातम्या आणखी आहेत...