आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टराजीव गांधी हत्येतील दोषी नलिनीने घर सोडले:सोनियांना देव मानते, तुरुंगात ओरडल्याने घशातून रक्त आले

लेखक: आशीष राय15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळनाडूच्या वेल्लोरमधील कटपाडी भागातील भरमपूरममधील एक घर गेल्या 10 महिन्यांपासून पोलिस छावणी बनले होते. घरात प्रवेशाचे चारही मार्ग बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले होते. कुणालाही परवानगीशिवाय आत जाता येत नव्हते आणि बाहेर पडता येत नव्हते.

21 मे 1991 रोजी एक स्फोट झाला, ज्यात पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. याच प्रकरणात दोषी ठरलेली आणि माफी मिळाल्यानंतर आता बाहेर आलेली नलिनी श्रीहरन या घरात राहत होती. नलिनी ही कोणत्याही भारतीय तुरुंगात सर्वाधिक काळ शिक्षा भोगणारी महिला कैदी आहे आणि ती पुन्हा एकदा अंडरग्राऊंड म्हणजेच भूमिगत झाली आहे.

नलिनी नोव्हेंबर 2021 पासून या घरात तिची आई पद्मावती, भाऊ एस. भाग्यनाथन, वहिनी भावधरानी आणि तीन मुलांसह राहत होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच तिची सुटका केली होती. नलिनीसोबत तिचा पती मुरुगन श्रीहरन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांनाही सोडण्यात आले आहे. मात्र, श्रीलंकेचे नागरिक असल्याने त्यांना विशेष छावणीत ठेवण्यात आले आहे.

12 नोव्हेंबरला नलिनी तुरुंगातून सुटताच तिच्या घराबाहेर गर्दी जमली. आजूबाजूच्या गावातही फटाके फोडून तिच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यात आला.

महिला तुरुंगातून सुटकेनंतर नलिनी सेंट्रल जेलमध्ये गेली. तिथे तिने पती श्रीहरनची(लांब दाढीतील) भेट घेतली. व्हॅनमध्ये दुसऱ्या बाजूला आरोपी संथन आहे.
महिला तुरुंगातून सुटकेनंतर नलिनी सेंट्रल जेलमध्ये गेली. तिथे तिने पती श्रीहरनची(लांब दाढीतील) भेट घेतली. व्हॅनमध्ये दुसऱ्या बाजूला आरोपी संथन आहे.

घर रिकामे आणि नलिनी गायब, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारनंतर आता काँग्रेसनेही नलिनी आणि इतर दोषींच्या सुटकेविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 18 नोव्हेंबरला मी नलिनीच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे ना पोलिस होते ना गर्दी. नलिनी येथून निघून गेली आहे.

घराच्या तीन दरवाजांना कुलूप होते आणि एकच उघडा होते. दरवाजा ठोठावल्यावर एक महिला बाहेर आली. तिने सांगितले की नलिनी आणि तिचा भाऊ कुटुंबासह कुठेतरी गेले आहेत. पत्ता विचारल्यावर मात्र सांगण्यास नकार दिला.

खूप आर्जव केल्यानंतर मला नलिनीच्या भावाचा फोन नंबर मिळाला. मी आधी नलिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. यानंतर नलिनीचा भाऊ भाग्यनाथन तिच्या वतीने बोलण्यास तयार झाला.

भाग्यनाथन म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आम्ही ठरवले आहे की आता ती मीडियाशी बोलणार नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र, नलिनी पुन्हा तुरुंगात जाण्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब चिंतेत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवले.

भरमपूरमधील नलिनीचे घर, इथे ती कुटुंबासह सुमारे 10 महिन्यांपासून राहत होती. हे घर सोडल्यानंतर ती कुठे गेली, कुणालाच माहिती नाही.
भरमपूरमधील नलिनीचे घर, इथे ती कुटुंबासह सुमारे 10 महिन्यांपासून राहत होती. हे घर सोडल्यानंतर ती कुठे गेली, कुणालाच माहिती नाही.

तुरुंगात एवढी किंचाळायची की घशातून रक्त वाहायचे

भाग्यनाथन यांनी या याचिकेविषयी काहीही बोलायचे नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या मनात दुसरा प्रश्न होता की नलिनीने इतकी वर्षे तुरुंगात काय केले? उत्तरात भाग्यनाथन सांगतात की नलिनीसाठी तुरुंगातील सुरुवातीचे दिवस हे दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. तिला एका वेगळ्या कोठडीत साखळदंडाने बांधून ठेवले जायचे.

तुरुंगात ती इतकी रडायची आणि ओरडायची की तिच्या घशातून रक्त यायचं. अनेकदा तिला रुग्णालयातही दाखल करावे लागले. भाग्यनाथन सांगतात की नलिनी केवळ स्वतःसाठीच नाही तर राजीव गांधींसाठीही रडायची. 31 वर्षांच्या काळात आम्ही जे भोगले त्याचा विचार केल्यावरही भीती वाटते. आम्ही ते एक भयानक स्वप्न आहे असे समजून ते विसरण्याचा प्रयत्न करत आहोत.

तुरुंगातील छळाची आठवण करून देताना भाग्यनाथन म्हणाले की, तुरुंगातील एका अधिकाऱ्याने नलिनीला धमकी दिली की ती मोठी झाल्यावर तिला सेक्स रॅकेटमध्ये ढकलतील. या घटनेबद्दल नलिनीने तिच्या आत्मचरित्रातही लिहिले आहे.

अटकेनंतर नलिनीने कधीही वृत्तपत्र वाचले नाही

नलिनी इतकी वर्षे तुरुंगात काय करत होती? असे विचारल्यावर भाग्यनाथन यांनी सांगितले की, तिचा दिवस तुरुंगातील मंदिरापासून सुरू व्हायचा. यानंतर ती आधी योगा करायची आणि नंतर व्यायाम करायची. तुरुंगात तिच्याकडे चार पुस्तके होती. न्याहारी झाल्यावर ती त्यातली एक वाचायची. नलिनीने 32 वर्षांत कधीही कोणतेही वृत्तपत्र वाचले नाही. ती महाभारत आणि गीता वाचायची.

नलिनी एकांतवासात राहत होती. त्यामुळे तिला तुरुंगात कोणतेही काम दिले जात नव्हते. ती फक्त पूजा करायची, जेवण करायची, अभ्यास करायची, कपडे धुवायची आणि झोपायची. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिला बरे वाटत आहे, परंतु हे जग तिच्यासाठी खूप बदलले आहे.

तुरुंगात जन्मलेली मुलगी कुपोषणग्रस्त होती

नलिनीने तुरुंगातच एका मुलीला जन्म दिला. दोन वर्षांपर्यंत ती वेल्लोर महिला कारागृहात राहिली. भाग्यनाथन सांगतात की, सामान्य स्त्रीला बाहेर मुक्त वातावरणात एखादे मूल वाढवणे खूप अवघड जाते. अशा स्थितीत तुरुंगात तिच्या मुलीचे पालनपोषण कसे झाले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तुरुंगात मुलगी कुपोषणग्रस्त झाली. यानंतर तिला उपचारांसाठी बाहेर आणावे लागले.

नलिनीची मुलगी हरिद्रा श्रीहरन लंडनमध्ये डॉक्टर आहे. तिचे लग्न झाले आहे. लग्नाच्या तयारीसाठी नलिनीला 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. प्रियंका गांधींनी नलिनीची भेट घेतली तेव्हा तिच्या मुलीने सोनिया आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले. ती म्हणाली- सोनिया गांधी माझ्यासाठी देवासारख्या आहेत.

राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपात नलिनीला जून 1991 मध्ये अटक करण्यात आली, तेव्हा ती 2 महिन्यांची गर्भवती होती. तिने काही दिवसांपूर्वीच तिरुपती येथे मुरुगनसोबत विवाह केला होता.
राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपात नलिनीला जून 1991 मध्ये अटक करण्यात आली, तेव्हा ती 2 महिन्यांची गर्भवती होती. तिने काही दिवसांपूर्वीच तिरुपती येथे मुरुगनसोबत विवाह केला होता.

नलिनी सोनिया-प्रियंका यांचे वारंवार आभार मानते

टाडा न्यायालयाने नलिनीसह 28 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापैकी 19 जणांची सर्वोच्च न्यायालयाने 1999 मध्ये निर्दोष मुक्तता केली होती. उर्वरित 7 पैकी 4 दोषी नलिनी, मुरुगन उर्फ ​​श्रीहरन, संथन आणि पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमारला जन्मठेपेची शिक्षा झाली.

नंतर सोनिया गांधी यांनी नलिनीला माफ केले. यानंतर तिची फाशी जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधींनी 2008 मध्ये वेल्लोर सेंट्रल जेलमध्ये नलिनीची भेट घेतली होती. काँग्रेसचे काही नेते अजूनही दोषींच्या सुटकेला विरोध करत आहेत. यावर राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधींनी मात्र काहीही वक्तव्य केलेले नाही.

नलिनीच्या भावाने सांगितले की, प्रियजनांना गमावण्याचे दुःख आम्हाला माहीत आहे. असे असतानाही गांधी परिवाराने या सुटकेला विरोध केला नाही. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आम्हाला संधी मिळाली तर आम्ही जाऊन त्यांना भेटू. शेजारी मानतात, सुटका ठीक आहे; एवढी शिक्षा कोणालाही मिळू नये.

घराभोवती 27 पोलिस तैनात

नलिनीच्या भावाशी बोलल्यानंतर मी आजूबाजूच्या लोकांशी बोललो. ज्या घराबाहेर 2 निरीक्षक, 4 उपनिरीक्षकांसह 27 सुरक्षा कर्मचार्‍यांची ड्युटी आहे, तिथे राहणाऱ्या लोकांना भेटणे कोणालाही अशक्य आहे.

इथे मला लष्करातून निवृत्त झालेले विनोद कुमार भेटले. त्यांनी सांगितले की नलिनी 10 महिन्यांपासून तिथे राहत होती. ती आम्हाला फक्त पोलीस स्टेशनला जाताना आणि तिथून येताना दिसायची.

न्यायालयाने नलिनीला मुक्त केल्याच्या प्रश्नावर विनोद म्हणाले की, हा सरकारचा निर्णय आहे. त्यांनी काहीतरी विचार करूनच केले असावे. यावर आम्ही अधिक काही बोलू शकत नाही.

शेजारी राहणारी कुमारी यावेळी येते. ती म्हणते - शेजारी असूनही आम्ही तिला कधीच भेटलो नाही. पोलिसांमुळे ती बाहेर येत नव्हती. तिची तुरुंगातून सुटका झाली याचा आम्हाला आनंद आहे. ही ईश्वराची इच्छा आहे.

शेजाऱ्यांनी पोलिस बघितल्यावर कळाले की नलिनी राहायला आली आहे

नलिनीच्या वस्तीत 22 वर्षांपासून टिफिनचा पुरवठा करणाऱ्या राजूने सांगितले की, 10 महिन्यांपूर्वी घराबाहेर मोठा फौजफाटा दिसला तेव्हा आम्हाला कळाले की, नलिनी तिथे राहायला आली आहे.

नलिनीच्या राहण्याने कोणालाच कधीही त्रास झाला नाही. रात्रीच्या वेळी आम्ही इथे जेवण द्यायला यायचो. पोलिस ओळखपत्र तपासल्यानंतरच आम्हाला जाऊ द्यायचे. नलिनीच्या सुटकेवर राजू म्हणाला की, माझ्या मते नलिनीची सुटका योग्यच आहे. तिने भलेही पंतप्रधानांची हत्या केली असेल, पण 30 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा म्हणजेच तिचे संपूर्ण आयुष्यच जवळपास संपले आहे. आता तिला सोडायलाच हवे होते.

तुरुंग अधिकारी म्हणाले - नलिनीविषयी कधीही काहीही तक्रार आली नाही

नलिनीच्या तुरुंगातील वर्तणुकीविषयी मी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहातील अनेक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही रेकॉर्डवर बोलण्यास तयार झाले नाही. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नलिनी बहुतेक वेळा एकटी आणि शांत असायची. तिच्याविषयी कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकायला मिळाली नाही.

नलिनी अजूनही स्वतःला निर्दोष म्हणते

राजीव गांधींच्या हत्येतील सहभागाच्या प्रश्नावर आणि याविषयी कोणत्याही प्रकारच्या पश्चातापाच्या प्रश्नावर नलिनीच्या वतीने तिच्या भावाने सांगितले की, ती परिस्थितीमुळे याला बळी पडली. ती एका काँग्रेस कुटुंबातील आहे. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. नलिनी इंदिरा गांधींची खंबीर समर्थक होती. त्यांच्या निधनानंतर, ती बरेच दिवस उपाशी राहिली आणि खूप रडली होती.

राजीव गांधींच्या हत्येच्या कटात नलिनीचा सहभाग नव्हता. आरोपपत्रातही तिच्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. सीबीआयनेही कधीही म्हटले नाही की, या कटात नलिनीचा सहभाग होता. तिच्याविरुद्ध फक्त 120(B) (गुन्हेगारी कट आणि खून) चा गुन्हा सिद्ध झाला. गुन्ह्याची कबुली देणारे कोणतेही प्रतिज्ञापत्र नलिनीने दिले नाही. पण ती स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकली नाही.

लंडनला मुलीसोबत राहण्याची नलिनीची इच्छा

तुरुंगातून सुटकेनंतर नलिनीला तिचे आयुष्य कसे जगायचे आहे? उत्तरात तिच्या भावाने सांगितले की, ती 32 वर्षांपर्यंत एका कोठडीत कैदेत राहिली. आता तिला तिची मुलगी आणि पतीसोबत शांततेत, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा आहे. ती लंडनला जाण्याची तयारी करत आहे.

म्हणूनच आम्ही या गर्दीपासून दूर राहण्यासाठी जात आहोत. सरकारच्या वतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या प्रश्नावर तिच्या भावाने सांगितले की, आम्ही यावर काहीही बोलणार नाही. देशाच्या संविधानावर आणि कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

बातम्या आणखी आहेत...