आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Practicing By Touching VP Singh's Feet, After 9 Days The Spot Was Made By Wearing A Sandalwood Garland

दिव्य मराठी एक्सप्लेनरराजीव गांधींच्या हत्येची संपूर्ण कहाणी:व्हीपी सिंह यांच्या पायाला स्पर्श करून सराव, 9 दिवसांनी चंदनाची माळ घालून घडवला स्फोट

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 मे 1991 रोजी धनू नावाच्या मुलीने तामिळनाडूमध्ये एका सभेला संबोधित करण्यासाठी आलेले माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या पायाला स्पर्श केल.

9 दिवसांनंतर म्हणजेच 21 मे 1991 रोजी जेव्हा याच धनुने तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे देशाचे दुसरे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा मोठा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये राजीव गांधींचा मृत्यू झाला. धनू ही एक मानवी बॉम्ब होती, धनुची निवड LTTE च्या वतीने राजीव गांधी यांची हत्या करण्यासाठी करण्यात आली होती.

11 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येतील 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील सातवा दोषी पेरारिवलन याला सर्वोच्च न्यायालयाने याच वर्षी मे महिन्यात मुक्त केले होते. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या.... देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या कशी आणि का झाली?

4 जून 1987 रोजी सकाळचे 8 वाजले होते. भारतीय हवाई दलाच्या पाच An-32 मालवाहू विमानांनी आग्रा एअरबेसवरून बंगळुरूसाठी उड्डाण केले. त्यांच्यासोबत 6 मिराज-2000 युद्ध विमानेही होती. दुपारी 3 च्या सुमारास भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंह यांनी दिल्लीतील श्रीलंकेच्या राजदूताला बोलावले आणि चेतावणी दिली की आमचे विमान दुपारी 4 वाजता जाफनाच्या लोकांसाठी कपडे, तंबू आणि अन्नपदार्थांसह औषधे टाकतील. श्रीलंकेच्या लष्कराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. An-32 हे त्यावेळी भारतातील सर्वात मोठे मालवाहू विमान होते आणि मिराज हे सर्वात शक्तिशाली हवाई लढाऊ विमान होते. यानंतर, ठरलेल्या वेळी, पाच An-32 ने जाफनाभोवती फिरून मदत सामग्री टाकली आणि त्या वेळी श्रीलंकेचे सैन्य शांत बसलेले होते.

याच सुमारास पाकिस्तान, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिकेच्या शस्त्रांनी बळकट झालेल्या श्रीलंकन सैन्याने अल्पसंख्याक तामिळींचा गड असलेल्या जाफनाला वेढा घातला. सिंहली भाषिक बहुसंख्य लोकांच्या अत्याचाराला कंटाळून तमिळांनी शस्त्रे हाती घेतली. ते वेगळ्या देशाची मागणी करत होते आणि त्यांचे नेतृत्व लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) करत होते. प्रभाकरन हा एलटीटीईचा शक्तिशाली नेता होता.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या या कृतीला घाबरून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर. जयवर्धने यांनी मुत्सद्देगिरी करत जाळे फेकले आणि 29 जुलै 1987 रोजी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यात एक करार झाला. करारानुसार, भारतीय सैन्याला दोन्ही बाजूंमध्ये शांतता राखायची होती आणि तामिळ गटांकडून शस्त्रे काढून घ्यायची होती. पण एलटीटीईला ते मान्य नव्हते. हळूहळू श्रीलंकन आर्मी आणि LTTE यांच्यातील या युद्धाचे रूपांतर भारतीय सैन्य आणि LTTE यांच्यातील युद्धात झाले. यात शेकडो भारतीय जवान शहीद झाले आणि शेकडो जखमी झाले.

राजीव गांधी सत्तेत पुन्हा येण्याच्या शक्यतेमुळे एलटीटीई भयभीत

येथे बोफोर्स घोटाळ्याच्या छायेत झालेल्या 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राजीव गांधी सत्तेबाहेर झाले. भाजपच्या पाठिंब्याने जनता दल पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि व्हीपी सिंग पंतप्रधान झाले. व्हीपी सिंग यांनी 1990 मध्ये श्रीलंकेतून शांतता सेना मागे घेतली. ऑक्टोबर 1990 मध्ये, अयोध्येजवळ कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ भाजपने व्हीपी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधान झाले. पण चंद्रशेखर यांचे सरकार अल्पमतातील सरकार होते, त्यामुळे मे 1991 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले. तेव्हा राजीव गांधी सत्तेवर येण्याची खात्री असल्याचे मानले जात होते. या शक्यतेमुळे लिट्टेचा नेता प्रभाकरन घाबरला. राजीव गांधी यांचे पुनरागमन हे भारतीय लष्कराचे श्रीलंकेत परतणे ठरेल, असे त्यांना वाटत होते.

राजीव गांधींना मारण्यासाठी एलटीटीईचे 'ऑपरेशन वेडिंग'

पत्रकार नीना गोपाल यांनी त्यांच्या 'द असॅसिनेशन ऑफ राजीव गांधी' या पुस्तकात लिहिले आहे की, एलटीटीईने राजीव यांच्या हत्येला 'ऑपरेशन वेडिंग' असे नाव दिले होते. LTTE प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याने नोव्हेंबर 1990 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येची योजना आखली होती.

पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांनी त्यांच्या 'नाइन्टी डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधी असॅसिंस' या पुस्तकात लिहिले आहे की, 'राष्ट्रीय आघाडीचे सरकार (व्हीपी सिंग सरकार) पडण्यापूर्वीच एलटीटीईने राजीव गांधीं यांना पुन्हा सत्तेत येवू द्यायचे नाही, असे ठरवले होते. मग भलेही त्यासाठी त्यांना ठार मारावे लागले तरी चालेल.'

पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांनी लिहिले आहे, '(LTTE) च्या हे लक्षात आले की, राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना लक्ष्य करणे जवळजवळ अशक्य आहे, म्हणून जेव्हा त्यांची सुरक्षा विरोधी पक्षनेत्याची होती तेव्हा त्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यावर हल्ला करणे आणखी सोपे केले.
पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांनी लिहिले आहे, '(LTTE) च्या हे लक्षात आले की, राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना लक्ष्य करणे जवळजवळ अशक्य आहे, म्हणून जेव्हा त्यांची सुरक्षा विरोधी पक्षनेत्याची होती तेव्हा त्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यावर हल्ला करणे आणखी सोपे केले.

21 मे 1991 म्हणजे राजीव यांच्या हत्येचा दिवस

राजीव गांधींची हत्या करणारी LTTE आत्मघाती हल्लेखोर धनू नावाची महिला होती. राजीव गांधी यांना मारण्यापूर्वी धनूने ड्राय रनसाठी दोनदा रिहर्सल केली होती. दिवंगत AIADMK नेत्या जयललिता यांच्या रॅलीत त्यांनी पहिल्यांदा याचा सराव केला.

राजीव यांच्या हत्येच्या अवघ्या 9 दिवस आधी तामिळनाडूमध्ये माजी पंतप्रधान व्हीपी सिंग आणि DMK नेते करुणानिधी यांच्या रॅलीदरम्यान त्यांनी दुसरी तालीम केली होती. या रॅलीत पोहोचल्यानंतर धनूने व्हीपी सिंह यांच्या पायाला स्पर्श केला. धनूला रिहर्सलमधून पाहायचे होते की, मोठ्या नेत्याच्या स्टेजजवळ म्हणजेच हाय सिक्युरिटी डी एरियामध्ये त्यांच्या पायांना स्पर्श करता येतो का. नेत्याला हार घालायचा आणि पाया पडतांना बटण दाबून बॉम्ब फोडायचा असा बेत होता.

21 मे 1991 रोजी रात्री 10 वाजता राजीव गांधी तामिळनाडूची राजधानी मद्रास (आताचे चेन्नई) पासून 40 किमी अंतरावर असलेल्या श्रीपेरंबुदूर येथे सभेला संबोधित करण्यासाठी आले. सभेमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गॅलरी होती. राजीव आधी पुरुषांच्या गॅलरीत आणि नंतर महिलांच्या गॅलरीत गेले.

21 मे 1991 रोजी श्रीपेरंबुदुर येथील सभेमध्ये मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा राजीव गांधी यांचा फोटो.
21 मे 1991 रोजी श्रीपेरंबुदुर येथील सभेमध्ये मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा राजीव गांधी यांचा फोटो.

पत्रकार नीना गोपाल यांनी लिहिले आहे की, 'तामिळनाडू पोलिसांच्या लेडी इन्स्पेक्टर अनुसुय्या यांना 21 मे रोजी श्रीपेरंबदुर येथे राजीव यांच्या रॅलीत त्यांच्या स्टेजसमोर डी क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. तिथे काही लोक व्हीआयपी पास घेऊन उभे होते. तिथे एक सैल सलवार सूट घातलेली, मोठा चष्मा घातलेली आणि हातात चंदनाच्या माळा घेऊन उभी असलेली मुलगी पाहून अनुसयाला विचित्र वाटले, म्हणून राजीव गांधी येण्यापूर्वीच तिने तिला गर्दीत ढकलले. राजीव आल्यावर ती मुलगी पुन्हा पुढे आली. अनुसयाने मुलीचा हात धरला. पण तेवढ्यात राजीव गांधींचा आवाज आला, 'काळजी करू नका, सगळ्यांना येऊ द्या' आणि अनुसूयाचा हात सैल झाला.

काही वेळाने ती मुलगी राजीव गांधींजवळ पोहोचली आणि त्यांना चंदनाचा हार घालून त्यांच्या पायाला स्पर्श केला. आणि इतक्यात तीच्या कपड्यात लपवलेले बाॅम्ब बेल्टचे बटण दाबले आणि जोराचा आवाज होऊन सर्वत्र रक्त उडाले. ती मुलगी एलटीटीईची मानव बॉम्ब धनु होती आणि राजीवपर्यंत पोहोचल्यानंतर तिने स्वत:ला उडवले. या स्फोटात राजीव आणि मानव बॉम्ब धनू यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला.

राजीव गांधी यांच्यावर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा राहुल 20 वर्षांचे होते.
राजीव गांधी यांच्यावर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा राहुल 20 वर्षांचे होते.

21 मे 1991 रोजी, वयाच्या 40 व्या वर्षी, राजीव गांधी, देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान, श्रीपेरंबदुर येथे लिट्टे बॉम्बस्फोटात मारले गेले. राजीव हे देशाचे दुसरे पंतप्रधान होते ज्यांची हत्या झाली. यापूर्वी 1984 मध्ये त्यांच्या आई इंदिरा गांधी यांची पंतप्रधान असताना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

राजीव गांधींचा मारेकरी कोण होते?

राजीव गांधींचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या मिन्हाज मर्चंटने त्यांच्या 'राजीव गांधी: एंड ऑफ अ ड्रीम' या पुस्तकात लिहिले आहे की, राजीव यांची हत्या करणाऱ्या एलटीटीईच्या कोअर ग्रुपमध्ये आठ प्रमुख सदस्य होते. त्यांच्यासोबत एक फोटोग्राफरही होता.

आठ जणांच्या मुख्य गटात मानव बाम धनू, शिवरासन, मुरुगन, अरिवू, शुभा आणि तीन स्थानिक भाग्यनाथन, नलिनी आणि पद्मा यांचा समावेश होता. घटनास्थळी धनू, शिवरासन, नलिनी, शुभा आणि छायाचित्रकार हरिबाबू असे पाच लोक उपस्थित होते. स्फोटाच्या वेळी हरिबाबू फोटो काढत होते आणि स्फोटात धनूसह ठार झाले, उर्वरित तीन जण घटनास्थळावरून पळून गेले.

घटनास्थळी उपस्थित लोकांपैकी फक्त नलिनी जिवंत पकडली गेली. बाकीच्यांनी आत्महत्या केली होती. शिवरसन यांनी स्वत:ला गोळी मारली तर इतरांनी सुरक्षा यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सायनाइड चाटून आत्महत्या केली.

छायाचित्रकार हरिबाबू या स्फोटात ठार झाले, परंतु त्यांची छायाचित्रे 24 मे 1997 रोजी या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीसाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरली. हरिबाबूने राजीवच्या हत्येपूर्वीपर्यंत या कटात सहभागी असलेल्या शिवरसन आणि मानव बॉम्ब धनू यांच्या सर्व हालचालींचे छायाचित्रण केले होते.

21 मे 1991 रोजी राजीव यांच्या हत्येपूर्वी घेतलेल्या या छायाचित्रात, पुष्पहार हातात घेऊन LTTE ची मानव बॉम्ब धनू, काँग्रेसची स्वयंसेविका लता कन्नन आणि तिची मुलगी कोकिला दिसत आहे. पांढरा कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीचे नाव शिवरासन असून तो या कटाचे नेतृत्व करत होता. बॉम्बस्फोटात मारला गेलेला एलटीटीईचा छायाचित्रकार हरिबाबू याने हे छायाचित्र काढले आहे.
21 मे 1991 रोजी राजीव यांच्या हत्येपूर्वी घेतलेल्या या छायाचित्रात, पुष्पहार हातात घेऊन LTTE ची मानव बॉम्ब धनू, काँग्रेसची स्वयंसेविका लता कन्नन आणि तिची मुलगी कोकिला दिसत आहे. पांढरा कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीचे नाव शिवरासन असून तो या कटाचे नेतृत्व करत होता. बॉम्बस्फोटात मारला गेलेला एलटीटीईचा छायाचित्रकार हरिबाबू याने हे छायाचित्र काढले आहे.

26 दोषींना शिक्षा आणि नंतर सुटका

या प्रकरणात 1998 मध्ये चेन्नई न्यायालयाने 26 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 26 पैकी 19 जणांची सुटका केली. न्यायालयाने जया कुमार, रॉबर्ट पायस आणि रविचंद्रन या तिघांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आणि नलिनी, तिचा पती मुरुगन, संथन आणि एजी पेरारिवलन या चौघांच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली.

2000 मध्ये, सोनिया गांधी आणि तामिळनाडू सरकारच्या अपीलवरून राज्यपालांनी नलिनी यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. 2014 मध्ये, सुप्रीम कोर्टाने उर्वरित तीन दोषी - मुरुगन, संथन आणि एजी पेरारिवलन - यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

या प्रकरणावरून अनेक वाद निर्माण झाले होते. 2006 मध्ये, पेरारिवलन यांनी त्यांच्या आत्मचरित्र 'अॅन अपील फ्रॉम द डेथ रो' मध्ये दावा केला की त्यांना खोटे विधान करण्यास भाग पाडले गेले.

2013 मध्ये, हे समोर आले की पेरारिवलनला दोषी ठरवणारे विधान खोटे होते. पेरारीवलनचे म्हणणे घेणारे माजी सीबीआय तपास एसपी व्ही त्यागराजन यांनी 2013 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, पेरारीवलन यांनी कधीच असे म्हटले नव्हते की त्यांनी खरेदी केलेली बॅटरी राजीव यांना मारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॉम्बमध्ये वापरली जाईल हे त्यांना माहित नव्हते. सीबीआयचे एसपी त्यागराजन यांनी आपण पेरारीवलन यांचे म्हणणे बदलल्याचे मान्य केले होते.

18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते. आता 11 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि आरपी रविचंद्रन या इतर सहा दोषींनाही सोडले आहे, ज्यांनी या प्रकरणात 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली आहे.

बातम्या आणखी आहेत...