आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषसरनाईकांचा 'प्रतापी' प्रवास:शाळेपासून रश्मी ठाकरेंशी ओळख, आता शिंदेंसोबत, पण अडचणींचा फेरा संपेना

नीलेश भगवानराव जोशी23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ आणि सरनाईक यांना दिलासा अशा अनेक बातम्या गेल्या काही महिन्यांपासून आपण वाचल्या असतील. ठाणे जिल्ह्यातील आमदार असलेले प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तेवर कारवाई करत ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात प्रताप सरनाईक अडकण्याची भीती असल्यामुळेच त्यांनी ठाकरे सोडून शिंदे गटात प्रवेश केला, अशी चर्चा होती.

मात्र, शिंदे गटात गेल्यानंतरही प्रताप सरनाईक यांच्या अडचणी संपलेल्या नाही. शालेय जीवनापासून रश्मी ठाकरेंशी ओळख असलेले प्रताप सरनाईक शिंदे गटात का गेले? त्यांची मालमत्ता का जप्त करण्यात आली? आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

सर्वात आधी प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास

 • 1997 राजकारणात प्रवेश
 • 1997 मध्ये ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले.
 • 2008 राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले.
 • 2008 शिवसेनेत प्रवेश.
 • 2009 ओवळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले.
 • 2014 याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले.
 • 2019 सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.

विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे मालक

प्रताप सरनाईक हे राजकारणात येण्याआधी यशस्वी व्यावसायिक आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांनी मिळवलेले नाव आणि त्यांचा हॉटेलिंग व्यवसाय याचा विस्तार ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. यशस्वी बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. याचबरोबर संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे देखील नेहमीच आयोजन करतात. सरनाईक यांनी आयोजित केलेली दहीहंडी, गणपती उत्सव आकर्षणाचे केंद्र असते. विहंग ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत.

प्रताप सरनाईक आणि वाद,चर्चा

प्रताप सरनाईक यांचे नाव आणि त्यांच्यामुळे होणारी चर्चा नवीन नाही. या आधी देखील अनेक वेळा ते अडचणीत सापडले होते. त्यातील प्रमुख वाद पाहूयात....

 1. एका भाविकांने सिद्धिविनायक मंदिराला दान म्हणून दिलेला रत्नजडीत मोबाइल प्रताप सरनाईक यांनी लिलावात विकत घेतला होता. आणि नंतर हा मोबाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना भेट दिला. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी चांगलाच वाद ओढावून घेतला होता.
 2. विहंग ग्रुपच्या माध्यमातून उभारलेल्या विहंग गार्डन प्रकल्पात बांधकाम चटई क्षेत्र निर्देशांक प्रकरणी मंत्रिमंडळाने दिलेल्या सवलतीमुळे देखील प्रताप सरनाईक चर्चेत आले होते. यावेळी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळेच प्रताप सरनाईक यांना ही सवलत देण्यात आली असल्याचा आरोप झाला होता.
 3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांना होणारा त्रास कमी होईल, असे त्यांनी आपल्या पत्रात जाहीरपणे सांगितले होते.
 4. आपल्या मतदारसंघात भाजप एका स्थानिक नेत्याचा प्रचार करत असल्याचा आरोप करत प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाद घातल्याच्या बातम्या आल्या होत्या. या वादानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये वाद नसल्याचा खुलासा केला होता.
 5. टॉप्स ग्रृप सर्व्हिसेस अँड सोल्युशन लिमिटेड च्या माध्यमातून एमआयडीसी सोबत झालेल्या करारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे सरनाईक यांच्या पर्यंत गेल्यामुळे ईडीने सरनाईक यांची चौकशी केली होती.

आता खालील ग्राफिक्समध्ये सरनाईक यांच्याशी संबंधित नेमके प्रकरण समजून घ्या...

बातम्या आणखी आहेत...