आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:एक शोध.. शाश्वततेच्या अनाठायी अट्टहासाचा...

मयूर भाऊसाहेब थोरात (लेखक, दिग्दर्शक )23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या अशाश्वत अशा भवतालात आज जो तो शाश्वतता शोधण्याचा प्रयत्न करतोय. तसे पाहता हे मृगजळामागे धावण्यासारखं आहे. जे मिळणार नाही, जे असणार नाही, त्यामागे धावण्याने काहीच साध्य होत नाही. जिथे कशाचीच निश्चिती नसते, तिथे भरवसा शोधण्याचा असा अट्टहास केवळ अनाठायी ठरतो. आमचा ‘शाश्वत’ हा लघुपट याचंच प्रयत्यकारी दर्शन घडवतो.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला मन मारुन जगाव लागतं. कारण हा माणसाचा स्वभावच आहे. नोकरी मिळवण्याच्या मुलाखतीतही अनेकदा मला प्रश्न विचारला जायचा, “दहा वर्षांनंतर आपण स्वत:ला कुठे बघता?” तेव्हा मनात यायचं, “नोकरी तर मिळू द्या.. आजचा दिवस तर जगू द्या..!” भविष्याचा विचार करणं नक्कीच चुकीचं नाही. पण, भविष्याची चिंता करत आजचा क्षण न जगणं नक्कीच चुकीचं आहे. एखादी वस्तू विकत घेताना गॅरंटीची विचारणा केली की उत्तर मिळतं, “इथे माणसाचा भरवसा नाही आणि तुम्ही वस्तूची गॅरंटी मागताय..!” इतकं कळूनही आपण नाहक चिंतेत अडकून जीवनाचा आनंद घेत नाही, हे दुर्दैवच.

या जगात काहीच निश्चित नसताना आपण अनेकदा शाश्वततेच्या मागे लागतो. लग्न जमवताना आपण माणसं, घर आणि संपत्ती बघतो. सोबतच मुलगा काम काय करतो आणि किती कमवतो हेही बघितलं जातं. अर्थात नोकरीचीच अपेक्षा असते, त्यातही मुलाला सरकारी नोकरी असावी, हा अनेकांचा अट्टहास असतो. कारण काय, तर रिटायरमेंटनंतरचंहीआयुष्य आरामात जातं. आपण इतका पुढचा विचार करतो. पण खरं तर हे आयुष्य क्षणभंगूर आहे, हे माहिती असतानाही आपण त्याकडे सरळ दुर्लक्ष करतअसतो.. आणि तरी देखील आपल्या अपेक्षा का कमी होत नाहीत, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

असाच एक प्रकार आमच्या मित्र परिवारात घडला. मित्राच्या घरची माणसं म्हणजे अगदी साधी- सरळ, प्रेमळ आणि सुसंकृत. कुणालाही हवीहवीशी वाटणारी माणसं. आता घरात लग्नाचा विषय सुरू झाला, योगायोगाने स्थळही आलं, मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटले, चर्चा झाली, विचार जुळले आणि पसंतीही झाली. आता दोघांच्या घरचे एकमेकांना भेटायला आले. मुलीच्या घरच्यांनाही आपली मुलगी ज्या घरात जाणार आहे, ती माणसं आवडली. सुंदर नात्याला प्रेमळ आणि समजून घेणारी माणसं मिळाली, तर आणखी काय हवं असतं..? स्वत:चं घर, चांगली नोकरी, चांगला पगार हे त्यात भर टाकणारं ठरलं. साऱ्या गोष्टी जुळून आल्या. पण मुलीच्या वडिलांनी नकार दिला. कारण मुलाची नोकरी कायमस्वरुपी नाही. आज क्वचितच कुणी आयुष्यभर एकाच ठिकाणी काम करत असावं. पण नाही.. आम्हाला भविष्याचा विचार करायचा असतो. जिथे आयुष्याची, या सृष्टीची काही शाश्वती नाही, तिथे आम्हाला नोकरीचा भरवसा हवा असतो! कधी कधी हसू येतं या दृष्टिकोनावर.

लेखकाच्या दृष्टीतून मी अशा घटना, प्रसंगांचं निरीक्षण करीत असतो. आपल्या आजूबाजूलाच अनेक घटना घडत असतात, पण त्या एकत्रपणे कुणाच्या लक्षातयेत नाहीत किंवा लक्षात आल्या तरी आपण त्यातून काही बोध घेत नाही. पण, मला त्यावर लिहायला, चित्रीकरण करायलाआवडतं. मित्राच्या घरी घडलेल्या त्या प्रसंगातून ‘शाश्वतते’च्या अतिरेकीआग्रह ाचा विषय असाच डोक्यात घोळत होता. मी लगेच तो टीमला सांगितला आणि सर्वांनाच हा विषय आवडला. टीमचा होकार आला आणि लगोलग स्क्रिप्ट लिहिली. कास्टिंग झालं. पाठोपाठ चित्रीकरणही पूर्ण केलं. अशाश्वत अशा भवतालात आज जो तो शाश्वतता शोधण्याचा प्रयत्न करतोय. तसे पाहता हे मृगजळामागे धावण्यासारखं आहे. जे मिळणार नाही, जे असणार नाही, त्यामागे धावण्याने काहीच साध्य होत नाही. जिथे कशाचीच निश्चिती नसते, तिथे भरवसा शोधण्याचा असा अट्टाहास केवळ अनाठायी ठरतो. आणि आमचा ‘शाश्वत’ हा लघुपट याचंच प्रयत्यकारी दर्शन घडवतो. एका वरकरणी साध्या वाटणाऱ्या विचारातून उभी राहिलेली ही शॉर्टफिल्म प्रत्येकाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही.

जगण्याची उमेद जागवली...ong>...

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच एकीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करण्याचा सल्ला घरचे, बाहेरचे, ओळखी-पाळखीतले असे सगळेच देत होते. मात्र, ‘शाश्वत’ बघितल्यावर ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीची महती लक्षात आली, अशी प्रतिक्रिया अनुप गवरशेट्टीवार या करिअरसाठी धडपडणाऱ्या मित्राने माझ्याजवळ व्यक्त केली. आयुष्यात केवळ सरकारी नोकरी किंवा तत्सम काही असेल, तरच आपले अस्तित्व टिकेल, असे मानण्यापेक्षा जो दिवस जगायला आणि बघायला मिळाला, त्या दिवसात आपलं अवघं आयुष्य सामावलेलं असतं, यावरचा विश्वास दृढ झाला. एका अर्थाने तुमच्या लघुपटाने जगण्याची उमेद नव्याने जागी केली, अशी भावना त्याने व्यक्त केली तेव्हा आमच्या प्रयत्नाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे वाटले.

संपर्क : ९८६०७९७०४७

बातम्या आणखी आहेत...