आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2018 मध्ये आलिया भट्ट आणि विक्की कौशलचा एक सिनेमा आला होता. त्याचे नाव होते राजी. या चित्रपटात आलियाने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती, जिने एका मोहिमेसाठी पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केले. लग्नानंतर आलियाने बरीच गुप्त माहिती भारतात पाठवली.
मात्र हा चित्रपट बनण्यापूर्वी खूप वर्षे आधी वास्तवात असे झाले आहे. ब्लॅक टायगर नावाने प्रसिद्ध रॉ एजंट रविंद्र कौशिक यांनी पाकिस्तानात जाऊन सैन्य अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केले आणि तिथल्या सैन्यात मोठे अधिकारीही झाले. मात्र नंतर ते पकडले गेले आणि पाकिस्तानात कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानात ज्या मुलीवर त्यांनी प्रेम केले होते, ती आजही तिथे आहे. त्यांना एक मुलगा आहे, ज्याच्याविषयी जगाला जास्त माहिती नाही.
23 वर्षांचे असताना नेहमीसाठी पाकिस्तानात गेले
ब्लॅक टायगर नावाने प्रसिद्ध रॉ एजंटचे खरे नाव रविंद्र कौशिक होते. मात्र पाकिस्तानात जाण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलून नबी अहमद शकीर असे केले. त्यांनी ऊर्दू आणि इस्लामी साहित्याचे शिक्षण घेतले.
वास्तविक, राजस्थानात जन्मलेल्या रविंद्र कौशिक यांना नाटकांची आवड होती. एकदा रॉच्या एका अधिकाऱ्याने त्यांना नाटक करताना बघितले. रविंद्र हे पात्राशी पूर्णपणे समरस झाल्याचे पाहून त्यांना वाटले की हा मुलगा पाकिस्तानात जाऊन एक नवे पात्र जगू शकतो. यानंतर 23 व्या वर्षीच रविंद्र रॉ साठी काम करायला लागले.
लाहोर विद्यापीठात शिक्षण, सैन्य अधिकाऱ्याच्या मुलीशी प्रेम
आपल्या नव्या नावासह रविंद्र पाकिस्तानात गेल्यावर कुणालाही त्याची खबर लागली नाही. भारतातील त्यांच्या सर्व नोंदी मिटवण्यात आल्या. पाकिस्तानात जाऊन रविंद्र यांनी नवे जीवन सुरू केले. लाहोर विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथून वकिलीचे शिक्षण घेतले.
शिक्षणानंतर रविंद्र पाकिस्तानी सैन्यात सामील झाले. यादरम्यान पाकिस्तानी सैन्यातील एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलीवर त्यांचे प्रेम जडले. नंतर दोघांनी लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव अमानत होते. दोघांना एक मुलगाही झाला.
अनेक वर्षे पाकिस्तानी सैन्यात काम करताना रविंद्र महत्वाची माहिती भारतात पाठवत राहिले.
पत्नीला सत्यता माहिती नव्हती
पाकिस्तानात रविंद्र यांचे पत्नी आणि मुलासह छोटे कुटुंब होते. अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतरही रविंद्र एजंट असल्याचे त्यांच्या पत्नीला कळाले नाही. त्यांचा मुलगा अरीब अहमद खान शाळेत जायला लागला होता.
मात्र पाकिस्तानातील एक ज्युनियर एजंटने अटक झाल्यावर रविंद्र यांच्याविषयी सर्व सत्यकथन केले. तोपर्यंत रविंद्र पाकिस्तानी सैन्यात मेजर रँकपर्यंत पोहोचले होते.
तुरुंगात झाला ब्लॅक टायगरचा मृत्यू, पत्नी आणि मुलाविषयी माहिती नाही
1983 मध्ये गुपित उघड झाल्यावर रविंद्र कौशिक यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा खूप छळही करण्यात आला. तब्बल 18 वर्षे ते पाकिस्तानी तुरुंगात कैद राहिले. 2011 मध्ये तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानात त्यांची पत्नी अमानत आणि मुलगा अरीब अहमद खान आजही राहतात. मात्र ते कुठे आणि कोणत्या स्थितीत आहेत, हे कुणालाही माहिती नाही.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.