आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेमध्ये 10 वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षांचा प्रवासही तेवढाच प्रदीर्घ आहे. सुरुवातीला 10 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनले होते. मनसे मध्ये अनेक पदावर त्यांनी कामे पाहिले. त्याचबरोबर पक्षाची शहरातील स्थिती लक्षात घेता धंगेकर यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या संपर्कात येऊन भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला होता. मात्र, कसबा मतदार संघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही.
काही दिवसांनतर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ओबीसी समाजातील विकास करणारा चेहरा अशी मतदार संघात त्यांनी ओळख निर्माण केली.
रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास
शिवसेना, मनसे आणि आता काँग्रेस असा रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षातील प्रवास राहिला आहे. 2009 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या वेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी मराभव झाला. त्या नंतर 2014 मध्ये त्यांनी कसबा पेठेतून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतांनाही त्यांनी कडवी झुंज दिली होती. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांना 2019 मध्ये काँग्रेसमधून विधानसभेचे तिकिट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या ऐवजी अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली होती.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.