आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Real Stroy Of Taj Mahal Vs Tejo Mahalay Controversy । Shah Jahan Mumtaz Story; Shiv Mandir Under Tajmahal | 22 Secret Chambers Of Tajmahal

मिसाल-ए-मोहब्बतवर विशेष:कधी इंग्रजांनी लुटले, कधी 22 खोल्या उघडण्यासाठी अर्ज; प्रत्येक संकटाला पुरून उरलेल्या ताजमहालची कहाणी

लेखक: देवांशु तिवारी3 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

शाहजहान गादीवर बसून चार वर्षे उलटून गेली होती. राजवाड्यात नेहमी व्यग्र असणारा शाहजहान आता मुमताजसोबत दिवस-रात्र घालवू लागला. त्याचे कारण म्हणजे त्यांची सतत खालावलेली तब्येत. शेवटच्या क्षणी मुमताजने बादशहाकडून वचन घेतले. 391 वर्षांनंतर मुमताजचे हे वचन आज देशातील वृत्तपत्रांची हेडलाइन बनले आहे. या वचनाचा साक्षीदार असलेल्या ताजमहालच्या 22 खोल्या पुन्हा उघडण्याचा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला आहे, परंतु आम्ही तुम्हाला यामागची संपूर्ण कथा सांगत आहोत.

ही कथा सुरू होते 391 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1631 पासून...

मुमताज खूप अशक्त झाली होती. 14व्या मुलाला जन्म देण्यापूर्वी मुमताजने सम्राटाकडून एक नव्हे तर दोन वचने घेतली. पहिले, ती निघून गेल्यानंतर बादशहाला इतर कोणत्याही स्त्रीपासून मूल होऊ नये. दुसरे, मुमताज म्हणाली, "मी माझ्या स्वप्नात एक अतिशय सुंदर राजवाडा आणि बाग पाहिली आहे, जी या जगात कुठेही नाही. मी तुम्हाला विनंती करते की माझ्या स्मरणार्थ असा महाल बांधा." मुलाला जन्म देताना मुमताजचा मृत्यू झाला. याच्या पुढच्या कहाणीपासून 12 मेच्या निर्णयापर्यंत आम्ही 10 ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगितले आहे.

याचे 3 भाग आहेत. पहिला- निर्मितीचे कारण, दुसरा- आर्किटेक्ट आणि डिझाइन आणि तिसरा- वाद. चला एकेक करून सर्व पाहूया...

1. ताजमहालचा इतिहास

2. ताजमहालचे आर्किटेक्ट

3. ताजमहालशी संबंधित वाद

ताजमहाल आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी इथे संपतात, शेवटी प्रसिद्ध कवी शकील बदायुनीच्या या सुंदर कवितेने निरोप घेऊयात...

"इक शहंशाह ने बनवा के हसीं ताज-महल,
सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है।
इस के साए में सदा प्यार के चर्चे होंगे,
खत्म जो हो न सकेगी वो कहानी दी है।‌"

संदर्भ

 1. शाहजहानच्या दरबारी इतिहासकार इनायत खान यांचे 'शाहजहानमा' हे पुस्तक.
 2. जयपूर सिटी पॅलेस म्युझियममध्ये ठेवलेली राजा जय सिंह यांच्या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे.
 3. पीटर मंडी यांचे पुस्तक 'The Travels of Peter Mundy in Europe and Asia'
 4. फर्गुस निकोल यांचे पुस्तक 'Shah Jahan – The Rise and Fall of the Mughal Emperor'
 5. डायना आणि मायकल प्रेस्टन यांचे पुस्तक 'Taj Mahal: Passion and Genius at the Heart of the Moghul Empire'
 6. इतिहासकार राजकिशोर राजे यांचे पुस्तक 'Tavarikh-a-Agra'
 7. पीएन ओक यांचे पुस्तक 'Tajmahal:The True Story'

ग्राफिक डिझायनर: राजकुमार गुप्ता

बातम्या आणखी आहेत...