आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 3 तास चौकशी केली. त्यात त्यांना जवळपास 50 प्रश्न विचारण्यात आले. राहुल यांच्या उत्तरांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे ही चौकशी बराच काळ चालली.
तत्पूर्वी, राहुल चौकशीसाठी 11 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईल फोन आदींविषयी विचारणा केली असता राहुल त्यांना 'तुम्ही चेक करा, हे तुमचे कर्तव्य आहे,' असे म्हणाले.
पण, त्यावेळी राहुल यांच्याकडे मोबाईल नव्हता. त्यांच्या हातात ईडीच्या नोटीसीची प्रत होती.
त्यानंतर राहुल यांना असिस्टंट डायरेक्टर रँकच्या तपास अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. रस्त्यात राहुल यांनी त्यांच्यासोबत चालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना त्यांची नावे विचारली. तसेच तुम्ही येथे किती दिवसांपासून कार्यरत आहात? चौकशीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असेच तपास अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाता का? असे प्रश्नही विचारले. त्यावर सुरक्षा कर्मचारी व ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्मितहास्य केले. पण, उत्तर देणे टाळले. राहुल गांधी तपास अधिकाऱ्यांच्या खोलीत पोहोचले, तेव्हा तिथे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांनी विचारणा केल्यानंतर तुम्ही बसा, साहेब येतीलच असे त्यांना सांगण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल अधिकारी येईपर्यंत उभेच राहिले. अधिकारी पोहोचल्यानंतर त्यांनी राहुल यांना बसण्यास सांगितले. त्यावर मास्क घातलेले राहुल म्हणाले -'थँक्स, मला जे विचारायचे आहे ते विचारा. मी तयार आहे.'
राहुल गांधींना पाणी दिले गेले. त्यांना चहा-कॉफीविषयीही विचारण्यात आले. पण, त्यांनी सर्वच गोष्टींसाठी नकार दिला. त्यांनी एकदाही आपला मास्क काढला नाही.
राहुल गांधींनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव व पदाची विचारणा केली. राहुल अधिकाऱ्यांना म्हणाले -'येथे केवळ काँग्रेसच्याच नेत्यांची चौकशी होते की, तुम्ही अन्य लोकांनाही बोलावता?' त्यांच्या या प्रश्नाचे अधिकाऱ्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
राहुल यांच्या चौकशीसाठी ईडीने 50 हून अधिक प्रश्न तयार केले होते. पण, सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्या उत्तरांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे ही संख्या वाढत गेली.
राहुल गांधींना विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न
राहुल यांची सामान्य आरोपीसारखी हजेरी
ED च्या कार्यालयात राहुल गांधींना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना एखाद्या सर्वसामान्य आरोपीसारखे प्रश्न विचारले. यातून तपास संस्थेने आपल्यापुढे सर्वचजण समान असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधींच्या उत्तरांची तिथे उपस्थित असणारे कर्मचारी संगणकावर नोंद करवून घेत होते. चौकशी संपल्यानंतर राहुल यांना त्यांच्या जबाबाची संपूर्ण प्रत दिली जाईल. ही प्रत वाचल्यानंतर ते त्यावर स्वाक्षरी करतील.
हे आहे प्रकरण
काँग्रेसने 1938 साली असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)ची स्थापना केली. त्याअंतर्गत नॅश्नल हेराल्ड वृत्तपत्र काढले जात होते. त्यावेळी एजेएलवर 90 कोटींहून अधिकचे कर्ज होते. ते कमी करण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली. तिचे नाव होते यंग इंडिया. त्यात राहुल व सोनियांची प्रत्येकी 38 टक्क्यांची भागीदारी होती.
यंग इंडियाला एजेएलचे 9 कोटी समभाग देण्यात आले. त्यामोबदल्यात यंग इंडिया एजेएलचे कर्ज फेडणार होती. पण, शेअर्सचा वाटा जास्त झाल्यामुळे यंग इंडियाला एजेएलची मालकी मिळाली. त्यानंतर एजेएलचे कर्ज फेडण्यासाठी काँग्रेसने 90 कोटींचे कर्ज दिले. हे कर्ज नंतर माफ करण्यात आले.
55 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया व राहुल गांधींविरोधात कोर्टात खटला दाखल केला. त्यात त्यांनी गांधी कुटुंबावर तब्बल 55 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. या खटल्यात 2015 मध्ये ईडीची एंट्री झाली.
प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.