आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Remdesivir Injection Controversy; Maharashtra Coronavirus News | How Many Companies Are Making Antiviral Drug Remdesivir In India?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:सरकार म्हणाले- 'रेमडेसिवीर' हे जीवनरक्षक औषध नाही, तरीही देशात सुरु आहे त्यावरुन राजकारण, साठेबाजी आणि काळाबाजार; जाणून घ्या या इंजेक्शनबद्दलची सर्व माहिती

18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्यभर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊन ही परिस्थिती ओढवली आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग आणि त्यामुळे रुग्णसंख्या इतकी वाढत आहे की, 'रेमडेसिवीर' इंजेक्शनची मागणीही वाढलीय. भारतात, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत प्रत्येक लहान मोठ्या शहरांत-गावांत 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण होऊन ही परिस्थिती ओढवली आहे. यावरुन आता राजकारण तापत आहे. अनेक लोकांना ब्लॅकमध्ये जास्त पैसे देऊन हे इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे.केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनरक्षक औषध नाही, हे अनावश्यक आहे आणि त्याचा वापर केल्यास काही फायदा होणार नाही. आता यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला प्रश्न विचारला आहे की, ही इंजेक्शन्स कोणत्या आधारावर राज्यात दिली जात आहेत? जेव्हा देशातील कोरोनाचे 40% रुग्ण महाराष्ट्रात आहे, तेव्हा रेमडेसिवीर देखील त्याच प्रमाणात द्यायला हवे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलादेखील फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले की, जिल्ह्यांना मनमानी पद्धतीने रेमडेसिवीर वितरित केले जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारने मागील आठवड्यात रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या इंजेक्शनचा वापर कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी केला जातोय. डॉक्टरदेखील मोठ्या प्रमाणात हे इंजेक्शन प्रिस्क्राइब करत आहेत आणि त्यामुळे याचा काळाबाजार आणि साठेबाजी सुरु झाली आहे. सध्या देशातील सात कंपन्या हे इंजेक्शन तयार करत असून दर महिन्याला 39 लाख डोस तयार केले जात आहेत. याचाच अर्थ म्हणजे दर दिवसाला 1.30 लाख डोस तयार करण्याची या कंपन्यांची क्षमता आहे.

चला तर मग जाणून घेऊयात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यावरुन निर्माण झालेल्या संकटाविषयी..

'रेमडेसिवीर' म्हणजे काय?

 • 'रेमडेसिवीर' हे एक अँटी-व्हायरल औषध आहे, जे संसर्गाचा फैलाव रोखण्याचे काम करते. 2009 मध्ये अमेरिकेच्या गिलिड सायन्सेसने हेपेटायटीस सीवर उपचार करण्यासाठी हे औषध तयार केले होते. यावर 2014 पर्यंत संशोधन केले गेले होते आणि नंतर ते इबोलाच्या उपचारात वापरले जात होते. त्यानंतर 'रेमडेसिवीर'चा वापर कोरोना व्हायरसच्या मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मर्स - MERS) आणि सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स - SARS) च्या उपचारात केला जात आहे.
 • हा फॉर्मुला शरीरात पसरणा-या विषाणुसाठी आवश्यक असलेल्या एंजाइमवर मात करतो. 28 ऑक्टोबर 2020 रोजी अमेरिकन नियामक यूएस-एफडीएने कोविड - 19 च्या उपचारांसाठी 'रेमडेसिवीर'ला मान्यता दिली. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना संसर्ग झाला होता तेव्हा त्यांनादेखील 'रेमडेसिवीर' देखील देण्यात आले होते.

'रेमडेसिवीर' खरोखर प्रभावी आहे का?

 • माहित नाही. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त देश 'रेमडेसिवीर' हे औषध कोविड - 19 च्या उपचारांत वापरत आहेत. तथापि, WHO ने चाचण्यांमध्ये या दाव्याची पुष्टी केली नाही.
 • WHO ने म्हटले आहे की 'रेमडेसिवीर'ने रुग्णाच्या गंभीर लक्षणे किंवा जीवघेणा परिस्थितीवर कोणताही परिणाम दर्शवला नाही. दुष्परिणाम नक्कीच पाहिले गेले आहेत. यामध्ये लिव्हर एंजाइम्सची वाढलेली पातळी, अॅलर्जीक रिअॅक्शन, रक्तदाब आणि हृदय गती बदलणे, ऑक्सिजन रक्ताची पातळी कमी होणे, ताप, श्वास घेण्यात अडचण, ओठ आणि डोळ्यांना सूज येणे, रक्तदाबही वाढला असल्याचे दिसून आले आहे.
 • भारत सरकारने हे इंजेक्शन जीवनरक्षक औषधांमध्ये सामील केलेेले नाही. हे इंजेक्शन घरी घेता येत नाही. मागील आठवड्यात केंद्राने रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या इंजेक्शनची किंमत 3500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलच्या अखेरीस त्याचे उत्पादनही दुप्पट होईल, असेही यात म्हटले आहे. यासाठी, आणखी सहा कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी मान्यता देण्यात आली आहे.
 • सध्या देशात दर महिन्याला 38.80 लाख इंजेक्शन तयार केले जात आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत 80 लाख इंजेक्शन तयार होतील. मंत्रालयानुसार, सध्या देशात हे औषध तयार करणा-या सात कंपन्या आहेत. आता आणखी सहा कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दरमहिन्याला आणखी 10 लाख इंजेक्शन्स तयार होऊ शकतील.

'रेमडेसिवीर'चे संकट अचानक कसे उद्भवले?

 • डिसेंबर 2020 आणि फेब्रुवारी 2021 याकाळात दररोजच्या प्रकरणांची संख्या 30 हजारांपेक्षा कमी झाली होती. फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होऊन काही काही हजारांवर आली होती. जणू ही महामारी संपत आली आहे, असे चित्र उभे झाले होते. नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने डिसेंबरपासून औषध कंपन्यांनी 'रेमडेसिवीर'चे उत्पादन कमी केले होते. गेल्या सहा महिन्यांत भारताने 100 हून अधिक देशांना 11 लाख इंजेक्शनची निर्यातदेखील केली आहे.
 • त्यावेळी यूरोप-अमेरिकेसह जगातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली होती. अशा परिस्थितीत भारताला सजग राहायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. लोक बेफिकिर झाले आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि तिने भयावह रुप घेतले. पहिल्या लाटेमध्ये 98 हजारांचा आकडा पीकवर होता. तर दुस-या लाटेत एका दिवसात 1.80 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 • दरम्यान, गरज नसतानाही रुग्णालयांमध्ये रुग्णांना 'रेमडेसिवीर' इंजेक्शन देणे, त्याचे वाढलेले दर, काळाबाजार आणि इतर अनेक कारणांमुळे 'रेमडेसिवीर'चे संकट ओढवले आहे. मागणी वाढल्याने औषध कंपन्यांना तातडीने त्याचे उत्पादन वाढवता येणे सोपे नाही. कारण कंपन्यांची कच्चा मालासाठी पुर्व तयारी नव्हती.

प्रत्येक कोरोना रुग्णाला 'रेमडेसिवीर'ची आवश्यकता असते का?

 • नाही.. 'रेमडेसिवीर' फक्त अशा रुग्णांना दिले जावे, जो रुग्णालयात दाखल असेल आणि ऑक्सिजनची गरज असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जे लोक घरी आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना या इंजेक्शनची मुळीच गरज नाही. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, घरी क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांना या इंजेक्शनची मुळीच गरज नाही. लोक औषधांच्या दुकानांबाहेर का गर्दी करत आहेत आणि डॉक्टरदेखील हे इंजेक्शन का प्रिस्क्राइब करत आहेत, हे समजण्यापलीकडे आहे.

भारतात 'रेमडेसिवीर' किती कंपन्या बनवतात?

 • 30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी देण्यात आली. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत. या कंपन्यांची एकुण उत्पादन क्षमता दर महिन्याला 39 लाख कुप्या बनवण्याची आहे. झायड्सने मार्च महिन्यात 100 ग्रॅम कुपीची किंमत 2,800 वरुन कमी करुन 899 रुपये केली आहे.
बातम्या आणखी आहेत...