आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉलेज:48.5 ते 50.2 हर्ट‌्झमध्ये फ्रिक्वेन्सी हवी, अन्यथा पॉवरग्रीड फेल होते, देशात पाच पॉवरग्रीड, 3.72 लाख मेगावॅट वीजनिर्मिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 8 वर्षांपूर्वी मोठे वीज संकट होते

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोमवारी पॉवरग्रीड फेल झाल्याने सुमारे अडीच तास वीजपुरवठा खंडित होता. वीजनिर्मितीपासून ते पुर‌वठ्यापर्यंतच्या पूर्ण यंत्रणेला पॉवरग्रीड म्हटले जाते. याचे पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन आणि पॉवर डिस्ट्रिब्युशन असे ३ तीन टप्पे आहेत. पॉवर स्टेशन, उद्योग, घरे व इतर ठिकाणाचा वीजपुरवठा याच्याशी संबंधित आहे.

क्षमता : देशात पाच पॉवरग्रीड, ३.७२ लाख मेगावॅट वीजनिर्मिती
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक व वापर करणार देश आहे. सध्या देशात सुमारे ३.७२ लाख मेगावॅट वीजनिर्मिती होते. देशात पाच पॉवरग्रीड आहेत. याद्वारे विविध राज्यांमध्ये वीजपुरवठा केला होता. वेस्टर्न ग्रीडमधून महाराष्ट्राला वीजपुरवठा होतो.

मानक : विजेचे ट्रान्समिशन ४९-५० हर्ट‌्झ फ्रिक्वेन्सीवर असते
भारतात विजेचे ट्रान्समिशन ४९-५० हर्ट‌्झ फ्रिक्वेन्सीवर असते. पॉवर स्टेशनमध्ये ४८.५ ते ५०.२ हर्ट‌्झ फ्रिक्वेन्सी असणे गरजेचे असते. अन्यथा ट्रान्समिशन लाइन ब्रेकडाऊन होऊ शकते. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरकडून यावर निगराणी ठेवली जाते.

देशात 8 वर्षांपूर्वी मोठे वीज संकट
परिणाम झालेल्या लोकसंख्येच्या आधारे देशातील सर्वात मोठे वीज संकट ३० आणि ३१ जुलै २०१२ ला उद्भवले होते. तेव्हा ४०० केव्हीशिवाय बीना-ग्वाल्हेर लाइनवर सर्किट ब्रेकर्स लागले होते. यामुळे उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भारतातील २२ राज्यांमध्ये ६० कोटी लोकांवर याचा परिणाम झाला होता. सुमारे १० तास वीजपुरवठा खंडित होता. ३२ गीगावॅट वीजनिर्मिती क्षमता ऑफलाइन झाली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser