आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Research Reveals – Cannabis Prevents Coronavirus From Entering The Body, It Can Be Used To Make Vaccine

कोरोनापासून संरक्षण करेल भांग:विषाणू शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते भांग, लस तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते - अमेरिकन रिसर्चमध्ये खुलासा

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

भांग हा शब्द ऐकताच आपल्या मनात नशेत धुंद असलेल्यांची प्रतिमा तयार होऊ लागते, पण जंगलात प्रचंड प्रमाणात आढळणारी ही वनस्पती कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते.

जर्नल ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात भांगाची वनस्पती कोरोना संसर्गावर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॅनाबिस सॅटिव्हा नावाच्या भांगाच्या वनस्पतीमध्ये काही कंपाऊंड असे आहेत, ज्याच्या मदतीने विषाणू शरीरात जाण्यापासून रोखले जाऊ शकतात. यापूर्वी लेथब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनीही या विषयावर संशोधन केले होते.

संशोधन काय म्हणते?
भांग आणि कोरोना व्हायरसमधील संबंध समजून घेण्यासाठी अमेरिकेच्या ओरेगन स्टेटच्या ग्लोबल हेम्प इनोव्हेशन सेंटर, कॉलेज ऑफ फार्मसी आणि लिनुस पॉलिंग इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी संशोधनावर एकत्र काम केले आहे.

भांगाच्या वनस्पतीमध्ये आढळणारे कंपाऊंड कोरोना विषाणूला आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.
भांगाच्या वनस्पतीमध्ये आढळणारे कंपाऊंड कोरोना विषाणूला आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.

संशोधनात, भांग वनस्पतीमध्ये सापडलेले दोन कंपाऊंड, कॅनाबिगेरोलिक अॅसिड (CBGA) आणि कॅनाबिडिओलिक अॅसिड (CBDA) यांचा अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, हे कंपाऊंड कोरोना विषाणू (SARS-CoV-2) च्या स्पाइक प्रोटीनला जोडण्यास सक्षम आहेत. इथे लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे विषाणूचे हे स्पाइक प्रोटीन मानवी शरीरात प्रवेश करून त्यांच्या पेशींना नुकसान पोहोचवते.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपण या स्पाइक प्रोटीनला भांगामध्ये सापडलेल्या कंपाऊंडला आधीच जोडले तर ते आपल्या शरीरात संसर्ग होऊ शकणार नाही.

भांगाच्या कंपाऊंडचा मेंदूवर कोणताही परिणाम होत नाही
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की भांगामधील संयुगे जी विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी आहेत ती सायकोएक्टिव्ह नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सेवन केल्याने आपले मन नशेला बळी पडून नियंत्रण गमावत नाही. संशोधनात असेही आढळून आले आहे की, भांगचे हे कंपाऊंड ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या बीटा व्हेरिएंटविरूद्ध तितकीच प्रभावी आहेत.

भांगामधील कंपाऊंड जे विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी आहेत त्यामुळे नशा होत नाही.
भांगामधील कंपाऊंड जे विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी आहेत त्यामुळे नशा होत नाही.

भांगचा वापर कोरोनाची लस तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो
भांगामध्ये असलेले ऍसिड्स आपल्या शरीराला चांगले संरक्षण देतात. म्हणूनच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की भविष्यात त्यांचा उपयोग लस तयार करण्यासाठी आणि कोरोना विषाणूला लक्ष्य करण्यासाठी अँटीबॉडीज विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, भांगीते हे कंपाऊंड तोंडी (तोंडातून) देखील घेतली जाऊ शकतात. मात्र त्याच्या वापराची अद्याप पूर्ण पुष्टी झालेली नाही.

सध्या, भांग वनस्पतीमध्ये आढळणारे कंपाऊंड फायबर आणि प्राण्यांच्या अन्नाचा स्रोत आहेत. ते सामान्यतः सौंदर्यप्रसाधने, बॉडी लोशन आणि आहारातील पूरक पदार्थांच्या निर्मितीमध्ये वापरले जातात.

बातम्या आणखी आहेत...