आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीचर आर्टिकल:ResMed च्या वतीने #WakeUpToGoodSleep अभियानासमवेत गाढ झोपेचे महत्त्व अधोरेखित

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झोपेच्या विकरासंबंधी ग्राहक तसेच डॉक्टरांना शिक्षित करण्यासाठी डिजीटल कॅम्पेन

ResMed, हे डिजीटल आरोग्य आणि झोप तसेच श्वासोच्छवास देखभाल उपकरणांचे ग्लोबल लिडर असून #WakeUpToGoodSleep या नवीन स्लीप एज्युकेशन कॅम्पेन लॉन्चची घोषणा करण्यात आली. गाढ झोप ही सुदृढ आरोग्यासाठी फार महत्त्वाची असते. भारतात झोपेसंबंधी विकाराविषयी फारशी जागरुकता नसून निगडीत समस्यांमध्ये वाढ होते आहे. हे अशापद्धतीचे कॅम्पेन उपचाराच्या उपलब्ध पर्यायांना अधोरेखित करून जनजागृती करण्यासाठी मदतीचे ठरेल.

आजच्या तारखेत असंख्य भारतीयांना झोपेशी निगडीत विकारांचा सामना करावा लागतो. त्यापैकी अनेक विकारांचे निदान होत नाही. 2019 लान्सेट रेस्पिरेटरी मेडीसीन अभ्यासानुसार, स्लीप अपेना नावाच्या विकाराने लक्षावधी भारतीयांना ग्रासले आहे. हे विकार दुर्लक्षित झाल्यास, झोपेच्या विकारांचे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतात. ज्यामुळे आपल्याला हृदयविकार, मधुमेह, औदासिन्य ग्रासते. निद्रा विकारांविषयी जागरुकता अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.

ग्राहक तसेच डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या कॅम्पेनचा भाग म्हणून ResMed द्वारे short educational film (शैक्षणिक लघुपट)ची सुरुवात केली. ज्यामध्ये स्लीप अपेना हा बऱ्यापैकी अनभिज्ञ असलेला विकार हाताळण्यात आला. या विकाराचे सामान्य परिणाम म्हणजे गरगरणे, मानसिक ताण, चिडचिड आणि अगदी वाहतूक अपघात असू शकतात. त्यामुळेच रात्री चांगली झोप लागणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते.

रुग्णाला रात्री चांगल्या झोपेचा आनंद घेता यावा, यासाठी ResMed ने स्लीप कोच असिस्टंस सादर केला आहे. ज्याद्वारे रुग्णाला झोपेच्या प्रत्येक पायरीवर झोपेच्या विकारावर मार्गदर्शन मिळेल. स्लीप अपेना निदानासाठी घरगुती निद्रा चाचणीची सोय आहे. रुग्णामध्ये स्लीप अपेनाचे निदान झाल्यास सीपीएपी (कंटीन्यूअस पॉझीटीव्ह एअरवे प्रेशर)चा उपचार पर्याय उपलब्ध असतो. हे उपकरण बसविणे देखील किचकट नाही. या उपकरणासाठी ईएमआय पर्याय आहेत, सर्वोत्तम ऑफरही देऊ करण्यात येतात.

“भारत देश मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या दृष्टीने दक्ष बनतो आहे, आहार बदल, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. झोप हा एकंदर आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाचा सहयोगी मानला जातो. मात्र त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही”, असे ResMed एशिया आणि लॅटीन अमेरिकेच्या नॅशनल मार्केटिंग हेड सीमा अरोरा म्हणाल्या. “भारत भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आहे. मात्र या देशात निद्रा जागृती त्यामानाने कमीच आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात थोड्याफार स्लीप लॅब आहेत. या जनजागृती अभियानाद्वारे ResMed हा निद्रा उपचारातील संस्थापक ठरला. आमचे उद्दिष्ट “क्यूंकी नींद अच्छी तो दिन अच्छा” (कारण झोप चांगली तर दिवस चांगला) या एका सोप्या विचारासह भारतीयांसमवेत वैद्यकीय समुदायात जनजागृती करण्याचे आहे, शरीराच्या एकंदर आरोग्यावर निद्रा विकाराचा कसा परिणाम होतो, हे अधोरेखित होते.”

वैद्यकीय क्षेत्रात निद्रा जनजागृती उपक्रम तसेच शिक्षणाला पाठबळ देण्यासाठीच्या प्रयत्नात ResMed द्वारे डॉ. मानवीर भाटीया आणि त्यांची स्लीप सोसायटी – एएसएसए, एस स्कूल ऑफ स्लीप सायन्स आणि डॉ. सुजित राजन यांच्यासारख्या देशातील काही महत्त्वाचे निद्रा तज्ज्ञांच्या साथीने वेब-एज्युकेशन सिरीजचे आयोजन करण्यात आले.

“पाच ते दहा टक्के भारतीयांना निद्रा विकार आहे, मात्र त्यांना हा विकार आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याची फारशी माहिती नाही,” असे भारतातील अग्रगण्य निद्रा तज्ज्ञ डॉ. मानवीर भाटीया म्हणाले. “आपण एकूण जीवनात आपला एक-तृतीयांश वेळ हा झोपेसाठी खर्च करतो. नियमित झोपेमागची कारणमीमांसा येथे अधोरेखित करण्यात आली. झोपेमुळे शरीराची झीज भरून निघायला मदत होते. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी झोप फार महत्त्वाची ठरते. निद्रा आरोग्य हा महत्त्वाचा घटक प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे, याकरिता निद्राविषयक जनजागृती फार महत्त्वाची ठरते. प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने झोपेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. या विकाराशी निगडीत अन्य वैद्यकीय विकारांची माहिती घेतली पाहिजे. डॉक्टर, सार्वजनिक जनजागृती अभियाने आणि स्लीप कोच असिस्टंस यांच्याद्वारे जनजागृतीची पूर्तता होऊ शकते. चांगल्या दर्जाच्या झोपेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत”, त्या म्हणाल्या.

आजची परिस्थिती पाहता समाजात वावरताना शारीरिक अंतर राखणे महत्त्वाचे ठरते. ResMed’चे कल्पक आणि झोपेशी निगडीत पर्याय डॉक्टरांना रुग्ण देखभाल करण्यासाठी चांगल्याप्रकारे साह्यकारी ठरतात. त्यासाठी रुग्णालय भरतीची आवश्यकता नसते. या नेटवर्कमध्ये 10 दशलक्षहून अधिक क्लाऊड-आधारीत उपकरणे आहेत, ज्याद्वारे डॉक्टर दूरवरून रुग्णावर देखरेख ठेवू शकतात. आरोग्यविषयक माहितीची देवाण-घेवाण होऊ शकते आणि निद्रा विकाराचे अचूक निदान शक्य होते.

तुमचा स्लीप कोच असिस्टंस नोंदवण्यासाठी किंवा निद्रा चाचणी करून घेण्यासाठी या टोल-फ्री क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा - 1800-103-3969 .

बातम्या आणखी आहेत...