आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या मर्सिडीजने ताशी 150 किमी वेगाने येणाऱ्या कारला मागे टाकले. तेवढ्यात समोर एक खड्डा आला. त्यामुळे त्यांची कार 5 फुटांपर्यंत उडी मारून सर्वात आधी बसला धडकली... त्यानंतर दुभाजकावरून पुढे जात असताना कारला आग लागली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉ. रवींद्र सिंह आणि गंगा डेअरीमध्ये काम करणाऱ्या आर्यन यांनी ही माहिती दिली आहे.
घटनास्थळाजवळच दुध डेअरी आहे. येथे काम करणारा कर्मचारी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचला. यामुळे रुग्णवाहिका बोलविण्यात आणि ऋषभ पंत याला रुग्णालयात नेण्यात मदत झाली. अपघातानंतर दिव्य मराठी नेटवर्कच्या टीमने घटनास्थळ गाठून त्यांच्याशी चर्चा केली. सर्वात आधी वाचा.. या दोघांनी प्रत्यक्ष पाहिलेली घटना :-
पहिला प्रत्यक्षदर्शी: संपूर्ण शरीर सोललेले होते, कपडे फाटलेले होते
गंगा डेअरीत काम करणाऱ्या आर्यन यांनी सांगितले की, सकाळचे 5 वाजून 15 मिनीटे झाले असतील. मी गेटवर होतो तेव्हाच मला मोठा स्फोट ऐकू आला. मी बाहेर आलो तेव्हा एक गाडी जळत असल्याचे दिसले. धावत धावत त्याच्यापर्यंत पोहोचलो, कारमधून ऋषभ पंत बाहेर पडलेले दिसले. ते खूप जखमी झाले होते. संपूर्ण शरीर जळाले होते, कपडे फाटले होते. काहीतरी शाल सारखे ओढून बाहेर बसलेले होते.
आर्यन यांनी सांगितले की, पंत कारपासून 50 मीटर अंतरावर पडलेले होते. जखमी क्रिकेटपटूला पाहून मी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. एक रुग्णवाहिका आली आणि त्यांना रुग्णालयात पाठवले. ऋषभच्या गाडीजवळून काही लोक पैसे गोळा करत होते, तेव्हा हरियाणा डेपोच्या बसच्या कंडक्टरने पैसे गोळा करून ऋषभजवळ ठेवले.
दुसरा प्रत्यक्षदर्शी : तीन लेन रस्ता अचानक सिंगल लेन झाला
अपघाताच्या वेळी डॉ. रवींद्र सिंह रस्त्याच्या कडेने जात होते. त्यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी कारचा वेग 150 किमी प्रती तास असावा. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी महामार्गावर अनेक खड्डे पडलेले आहेत. तीन मार्गांचा रस्ता नंतर एकमार्गी होतो. अशा स्थितीत गाडी खड्ड्यात उडी मारून दुभाजकाला धडकली, नंतर खांबाला धडकली.
पूर्णपणे अनियंत्रित मर्सिडीज रस्त्याच्या पलीकडे असलेल्या हरियाणा डेपोच्या बसला धडकली. यानंतर, कार महामार्गावर सुमारे 200 मीटर पुढे गेली आणि आग लागली.
ऋषभ गाडीला ओव्हरटेक करत होता
NH-58 हायवेच्या दिल्ली रोड आणि रुरकी रोडच्या दिशेने गंगा मिल्क फूडच्या प्लांटमध्ये दोन कॅमेरे बसवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून घेतला आहे. मिल्क फूडच्या मालकाने सांगितले की, NH-58 वर तेथे रस्त्यावर एक खड्डा आहे. जो दुरून सपाट दिसतो.
पहाटे 5:15 च्या सुमारास ऋषभ जेव्हा त्या रस्त्यावर पोहोचला तेव्हा त्याच्या गाडीसमोरून एक वाहन जात होते, ज्याला त्याने ओव्हरटेक केले, त्यानंतर त्याची कार खड्ड्यातून असंतुलित झाली. ही कार सुमारे 150 किंवा 200 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने असल्याचे सांगितले जात आहे. कार उडून दुसऱ्या लेनवर पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
कारने सुमारे 5 फूट उंच झेप घेतली
ऋषभ पंतच्या गाडीचा वेग जास्त असल्याने त्याला गाडीवर ताबा ठेवता आला नाही. दुभाजकाला धडकल्यावर कारने सुमारे 5 ते 6 फूट उंच उडी मारली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली.
हरियाणा रोडवेजची बस हरिद्वार मार्गावरुन येत असताना समोरून धडकली. हरियाणा रोडवेज बसच्या चालकाने ब्रेक लावले आणि वाहन थांबवले. या गोंधळात बसमधील सर्व सहप्रवासी खाली उतरले आणि चालकही खाली उतरला.
पैशांनी भरलेली बॅग बाहेर काढली तेव्हा नोटा विखुरल्या
ऋषभ पंत स्वत: कारमधून उतरला आणि त्याने पैशांनी भरलेली बॅगही बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने बॅग बाहेर काढताच त्याच्या काही नोटा रस्त्यावर विखुरल्या. हरियाणा रोडवेजच्या ड्रायव्हरने नोटा जमा करून ऋषभ पंतला दिल्या. रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून माहिती देण्यात आली.
रस्त्याच्या दुतर्फा विखुरलेले कारचे भाग
दिल्ली आणि हरिद्वार मार्गावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला कारचे पार्ट्स विखुरलेले आहेत. त्यांना पाहून अंदाज बांधता येतो की गाडी किती वेगात असेल.
ऋषभ पंतच्या घरी कसे वातावरण आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.