आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला NH 58 राष्ट्रीय महामार्गावर (दिल्ली-हरिद्वार) रुडकीजवळ अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी 50 मीटरपर्यंतचा रस्ता खचलेला आहे. खड्डे आहेत, गिट्टी विखुरलेली आहे. प्रशासनाने ही जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली आहे. मात्र, अपघात होण्यापूर्वी या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारा फलक लावण्यात अलेला नव्हता. आता अपघातानंतर प्रशासनाने येथे फलक लावला आहे. घटनास्थळी मोजणी करण्यासाठी रस्ते वाहतूक विभागाचे अधिकारीही पोहोचले आहेत. आज दिल्ली आणि डेहराडूनचे काही अधिकारीही तपासासाठी येथे पोहोचले आहेत.
अपघातानंतर दैनिक दिव्य मराठी नेटवर्कचे रिपोर्टर घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण घटनेची चौकशी केली. वाचा संपूर्ण रिपोर्ट...
पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला, मात्र येथे अपघात होत असल्याचे सांगितले
नारसन चौकीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "महामार्गावर दर महिन्याला या खड्ड्यांमुळे या ठिकाणी 7 ते 8 अपघात होतात. अनेकदा तर लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच येथे मोठा अपघात झाला होता. ज्यामध्ये मृत्यू झाला.
हे खड्डे ऋषभ पंतच्या कारच्या अपघाताचे कारणही आहेत. कारण येथे वेगावर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. पंत यांच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी या घटनास्थळाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दर महिन्याला या ब्लॅक स्पॉटवर 2 ते 3 अपघात होतात.
लोकांनी सांगितले - तक्रार करूनही पोलीस ऐकत नाहीत
या रस्त्यावर दर महिन्याला 7 ते 8 अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात 2 जणांना जीव गमवावा लागला. ब्लॅक स्पॉटमुळे हा अपघात झाला. याबाबत आम्ही अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. आता पंत यांच्या अपघातानंतर प्रशासन सतर्क झाले आहे.
हे ठिकाण ब्लॅक स्पॉट का आहे?
महामार्गावर या ठिकाणी थोडासा वळण रस्ता आहे. येथूनच एक छोटा कालवा जातो. या ठिकाणी सुमारे 50 मीटरपर्यंत रस्ता खचलेला आहे. गिट्टीही रस्त्यावर पसरलेली आहे. याला ब्लॅक स्पॉट असेही म्हणतात कारण येथून 3 मार्ग जोडतात. तिन्हींच्या मधोमध एक छोटासा ढिगारा आहे. प्रशासन अशा अपघात प्रवण क्षेत्रांना ब्लॅक स्पॉट म्हणून चिन्हांकित करते. आता वेगमर्यादेचे फलकही लावले आहेत, मात्र पंत यांचा अपघात होईपर्यंत या ठिकाणी असा कोणताही फलक नव्हता.
सुबोध म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी माझ्या गावातील तीन लोकांचा मृत्यू
स्थानिक नागरिक सुबोध येथे शेजारीच राहतात. ते म्हणाले की, "हायवेला रस्ता खचलेला आहे. येथे खड्डे देखील पडलेले आहेत. येथे नेहमीच अपघात होतात. दर महिन्याला 2 ते 3 लोकांचा मृत्यू होतो. याबाबत प्रशासनाला अनेकदा पत्र लिहूनही त्यांनी ऐकले नाही."
सुबोध यांनी सांगितले की, "नारसन रोडवर डिव्हायडर बसवल्यामुळे लोक विरुद्ध बाजूने गाड्या चालतात. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो ब्लॅक स्पॉट आहे, इथे लोक विरुद्ध बाजूने येतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नारसन रस्त्यावर दुभाजक बनवण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना 5 ते 7 किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे, असे सुबोध सांगतात. गेल्या दोन महिन्यांत आमच्या गावातील 3 लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा अपघात याच ठिकाणी झाला आहे.
ब्लॅक स्पॉटमुळे अपघात - परिवहन कर अधिकारी
रुडकी आरटीओ ट्रान्सपोर्ट टॅक्स ऑफिसर अखिलेश चौहान म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी ऋषभ पंतचा अपघात झाला. ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी ऋषभ पंतची गाडी 150 ते 200 च्या वेगाने असावी. या मार्गावर जास्त वेगाने गाडी चालवणाऱ्यांना दंड आकारला जातो.’
अनेकदा वाहने किंवा दुचाकीचांही तोल जातो
या घटनास्थळाजवळ राहणारे प्रवींद्र कुमार म्हणाले की, "सकाळी सुमारे 5.15 वाजले असावेत. माझे घर राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे. या महामार्गावर नेहमीच अपघात घडतात. याचे कारण म्हणजे जवळील ब्लॅक स्पॉट. हा स्पॉट ओबड-धोबड आहे.
त्यामुळे अनेकवेळा वाहन किंवा दुचाकीचांही तोल बिघडतो. याबाबत अधिकाऱ्यांना अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत त्यावर कारवाही झालेली नाही. पंतची गाडी वेगात असल्याने त्याचे संतुलन बिघडले आणि गाडी रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली.
एसपी म्हणाले- ही जागा ब्लॅक स्पॉट, मला माहिती नाही
रुडकीचे एसपी म्हणतात की, "हे ठिकाण ब्लॅक स्पॉट आहे. मला याची माहिती नाही. या ठिकाणी किती अपघात झाले आहेत त्यांची माहिती मागितली आहे. माहिती गोळा केल्यानंतरच सांगू शकेन. आत्तापर्यंत, याबद्दल माहिती नाही."
पंतला 5 महिन्यांपूर्वीच ओव्हर स्पीडिंगसाठी लावला दंड
सूत्रांचे म्हणणे आहे की, पंत हा कार भरधाव वेगाने चालवतो. त्यामुळेच पाच महिन्यांपूर्वी दिल्लीतही त्याला ओव्हर स्पीडिंगसाठी दंड लावण्यात आला होता.
संपूर्ण NH-58 वर 36 ब्लॅक स्पॉट्स
NH-58 वर 36 ब्लॅक स्पॉट्स आहेत. रुडकी ते नारसन सीमेपर्यंत महामार्गावर सर्वाधिक अपघात होतात. बहादराबाद परिसरातील शनिदेव मंदिर, सल्फर मोड गाव, दौलतपूर आणि बाँगला, रुडकी परिसरातील बेलडा ते बेलडी या गावादरम्यान, मिलिटरी चौक, रेल्वे उड्डाणपूल मोहनपुरा, रामपूर चुंगी, सालियर चेकपोस्ट ते सालियर गाव, नरसन ते झबरेडा दरम्यान ब्लॅक स्पॉट आहेत. साखर कारखाना ते लिबरखेडी, मंगळूर शहरातील देवबंद तिराहा, गंगानहर पुल ते पीर पर्यंत, शिकारी वाला पीर ते दीप शिखा आणि देवपुरा ते कसबा मार्केट दरम्यान हे स्पॉट आहेत.
पंतशी संबंधित खालील बातम्याही वाचा.
ऋषभ पंतचा अपघात, प्रत्यक्षदर्शींच्या शब्दांत:हायवेवरील खड्ड्यामुळे 5 फूट उसळून उलटली मर्सिडीझ, पंत स्वतः बाहेर आला... रस्त्यावर बसला
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या मर्सिडीजने ताशी 150 किमी वेगाने येणाऱ्या कारला मागे टाकले. तेवढ्यात समोर एक खड्डा आला. त्यामुळे त्यांची कार 5 फुटांपर्यंत उडी मारून सर्वात आधी बसला धडकली... त्यानंतर दुभाजकावरून पुढे जात असताना कारला आग लागली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉ. रवींद्र सिंह आणि गंगा डेअरीमध्ये काम करणाऱ्या आर्यन यांनी ही माहिती दिली आहे.
घटनास्थळाजवळच दुध डेअरी आहे. येथे काम करणारा कर्मचारी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचला. यामुळे रुग्णवाहिका बोलविण्यात आणि ऋषभ पंत याला रुग्णालयात नेण्यात मदत झाली. अपघातानंतर दिव्य मराठी नेटवर्कच्या टीमने घटनास्थळ गाठून त्यांच्याशी चर्चा केली. सर्वात आधी वाचा.. या दोघांनी प्रत्यक्ष पाहिलेली घटना... वाचा पूर्ण रिपोर्ट....
झोपेमुळे ऋषभ पंतचा अपघात:दुपारी 12 ते 3, रात्री 2 ते 5, या वेळेत झोपेमुळे भारतात होतात सर्वाधिक अपघात
25 वर्षीय ऋषभ पंत एकटाच कार चालवत होता. कार भरधाव वेगात होती, त्याचवेळी झोप लागल्याने कार दुभाजकावर आदळली. यामुळे आग लागली आणि कारची खिडकी तोडून तो कसाबसा बाहेर पडला. रस्ते अपघात हे भारतातील मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमुख कारण आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 4,50,000 अपघात होतात. यामध्ये सुमारे 1,50,000 लोकांचा मृत्यू होतो. तर अनेक जण कायमचे अपंग होतात. कामाची गोष्टमध्ये आम्ही अपघातांच्या मुख्य कारणांबद्दल माहिती देत आहोत, ज्याबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असेल. यासोबतच मी एक स्मार्ट ड्रायव्हर आहे, माझ्याबाबतीत असे होऊ शकत नाही, असाही विचार केला असावा. अगदी बरोबर, पण सुरक्षितपणे गाडी चालवून तुमचा स्मार्टनेस दाखवला तरच हे घडेल. वाचा पूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.