आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Rohini Acharya Interview; Lalu Prasad Yadav Daughter | Kidney Transplant | Bihar Politics | Rohini Acharya

दिव्य मराठी इंटरव्ह्यूराजकारणात येण्याचा विचार नाही:लालू यादव यांची मुलगी रोहिणी म्हणाली, मला राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती, आताही नाही

अंकित शुक्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किडनी प्रत्यारोपणानंतर राजद सुप्रीमो लालू यादव यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या ते सिंगापूरमध्येच राहणार आहेत. त्यांना किडनी दान करणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांची प्रकृतीही पूर्वीपेक्षा चांगली आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या रोहिणी त्यांच्या रुटीन लाईफमध्ये परतत आहेत.

आपल्या वडिलांना किडनी दान केल्याबद्दल रोहिणी यांचे खूप कौतुक झाले. मात्र, त्या याला मोठी गोष्ट मानत नाहीत. दिव्य मराठी नेटवर्कसोबत झालेल्या संवादात त्यांनी सांगितले की, कुटुंबासाठी आणि समाजासाठी असे काम मी आई-वडिलांकडूनच शिकले आहे. जर कोणी कुटुंबाबद्दल बोलले तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देईल.

वाचा रोहिणी आचार्य यांच्याशी दिव्य मराठी नेटवर्कने साधलेला विशेष संवाद....

प्रश्न: किडनी दान करताना कॉम्प्लिकेशन होऊ शकते, तरीही तुम्ही त्यास सहमती दर्शवली. यासाठी प्रेरणा आणि शक्ती कुठून आली?

उत्तरः माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान माझे वडील आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यापासून प्रेरित आहोत. घरी कोणीही समस्या घेऊन आले तरी ते नेहमी उपाय शोधायचे, मदत करायला तयार असायचे. त्यांनी मला अशी व्यक्ती बनवले की, मी अस्पृश्यता, उच्च-नीच विरुद्ध गरजूंचा आवाज बनू शकेन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि संस्कृती मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी त्यांना कसे विसरु?

प्रश्नः प्रत्यारोपणासाठी किडनी जुळली पाहिजे. फक्त तुमचीच टेस्ट झाली की इतरांचीही. तुमच्या नावावर सहमत कसे झाले?

उत्तरः पापा 10 ऑक्टोबरला येथे (सिंगापूर) आले. 18 ऑक्टोबर रोजी किडनी प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे कळले. डॉक्टरांनी कोण दान करणार ते ठरवायला सांगितले. यावर मी, माझे पती आणि जीजाजीने टेस्ट केली. तिघांची आठवडाभर चाचणी करण्यात आली. भारतात सगळ्यांना घरी सांगितल्यावर सगळे तयार झाले. काही भावा-बहिणींनी देखील चाचण्या केल्या, पण डॉक्टरांना फक्त मी तंदुरुस्त असल्याचे आढळले.

प्रश्‍न : तुम्ही पती आणि त्यांच्या घरच्यांना कसे तयार केले?

उत्तर : माझे पती समरेश सिंह सुरुवातीपासून माझ्यासोबत होते. हा एकमेव पर्याय असल्याचे आम्हाला समजताच त्यांनी स्वतःची किडनी दान करण्याचे मान्य केले. माझा भाऊही तयार झाला. 18 नोव्हेंबरला मी किडनी दान करायचे ठरवले तेव्हा आम्ही मुलांना त्याबद्दल सांगितलं. सुरुवातीला ते घाबरले.

समजावून सांगितल्यावर त्यांनी नेटवर पाहिले की, किडनी दान केल्यानंतर जीवनशैली बदलून आणि काही खबरदारी घेतल्यास निरोगी राहता येते, म्हणून त्यांनी होकार दिला.

प्रश्न : तुम्ही किडनी दान करत आहात हे ऐकल्यावर लालूजींची पहिली प्रतिक्रिया काय होती?

उत्तर : त्याच्या डोळ्यात अश्रू आले. अभिमान वाटत असावा. आम्ही त्यांच्यासोबत क्लिनिकमध्येच होतो. सुरुवातीला ते नकार देत होते. म्हणाले, नाही, मी औषधाने बरे होईल. कुणाला किडनी-विडनी देण्याची गरज नाही. घरी आल्यावर समजावले. मुलांचे उदाहरण दिले की, जेव्हा ते माझ्याबद्दल निश्चिंत आहेत, तर तुम्ही कशाला काळजी करता... मग कुठे ते सहमत झाले.

प्रश्न: निवड आणि प्रत्यारोपण यामध्ये बराच वेळ होता, या काळात तुम्ही स्वत:ला सकारात्मक कसे ठेवले?

उत्तर : ही गोष्ट नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मीडियात आली, पण आम्ही संयम राखला. मी सुट्ट्या मुलांसोबत आरामात घालवल्या. मित्रांसोबत पार्टी केली. आनंदी राहिले. या निर्णयावर पुन्हा चर्चाच केली नाही. हे धाडस मला माझ्या वडिलांकडूनच मिळाले की, एकदा ठरवलं की मग मागे हटत नाही.

प्रश्न: तुमच्या वडिलांशी संबंधित तीन घटना सांगा, ज्या तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत?

उत्तर : लहानपणापासून अनेक घटना आहेत. मी माझ्या वडिलांशी खूप जोडलेली आहे. ते मुख्यमंत्री होते. ते आले तोपर्यंत रात्रीचे दोन-तीन वाजत होते. जेव्हा ते यायचे तेव्हा एक एक करून सर्व मुलांच्या खोलीत जाऊन लाईट बंद आहेत की नाही, पंखा चालू आहे की नाही, थंडी आहे की नाही, सर्वांनी चादर पांघरलेली आहे की नाही, हे पाहायचे. थंडीत अचानक कधी जाग आली तर दिसायचे की, आई मोहरीच्या तेलाची वाटी घेऊन उभी आहे आणि वडील आमच्या पायाला तेल चोळत आहे.

जो पर्यंत ते जेवत नाही मी जेवत नव्हते. रात्री 9.30 पर्यंत त्यांनी जेवायला यावे, असा नियम मी केला. मी वसतिगृहात जाईपर्यंत हे वेळापत्रक चालू होते. माझे वडील दाढी करताना कापायचे तेव्हा मी खूप रडायचे. एकदा माझ्या पायात हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्यावर मी घाबरले.

घरच्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी चुन्नूला (घराचं नाव) सांगायचं नाही. तेव्हापासून आजतागायत मला बहुतांश बातम्या माध्यमांतूनच मिळतात. पप्पांना स्वयंपाकाची खूप आवड होती. ते मला स्वयंपाकघरात घेऊन जात पण मला काही करू देत नव्हते. ते म्हणत, तुला चटका बसेल. दूरुन शिक, आजही मुलांसाठी स्वयंपाक करताना मी त्यांना फोन करून अनेक पदार्थांची रेसिपी विचारते.

प्रश्न : तुमची लोकप्रियता खूप वाढली आहे. सामाजिक जीवनात प्रवेश करण्याची काही योजना आहे का?

उत्तर : मी मुलगी होण्याचे कर्तव्य पार पाडले, आता मला आई होण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे. मुलं आता शाळेत आहेत. त्यांचे शिक्षण झाले की, मग काय करायचे ते विचार करुयात.

प्रश्न : तुमच्या चेहऱ्यामुळे राजदला मोठा फायदा होऊ शकतो. पक्षाला गरज पडल्यास राजकारणात यायला आवडेल का?

उत्तर : माझी कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती आणि नाही. पण मी जिथे राहिले तिथून बिहार आणि तिथल्या जनतेला जमेल तशी मदत करेन. भविष्यात पक्षाला माझी गरज आहे का ते पाहिले जाईल. सध्या कोणताही हेतू नाही. भविष्यात काय होणार कुणास ठाऊक. पप्पाला गरज पडेल आणि मी किडनी देईन.. असा तरी कधी विचार केला होता का?

प्रश्न : बिहारच्या राजकारणावर लक्ष ठेवता का?

उत्तर: लहानपणापासूनच आहे. बिहारच्या राजकारणावर लक्ष ठेवते. विशेषतः कौटुंबिक विषयांवर. जेव्हा जेव्हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा मी नेहमीच उत्तर देते. कोणी ज्या भाषेत बोलतो, मी त्याच भाषेत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करते.

प्रश्न: भावंडांमध्ये तुम्ही कोणाच्या सर्वात जास्त जवळ आहात?

उत्तर: वास्तविक सर्वांच्याच... मिसा दीदी आईसारखी राहिली आहे. माझे आई-वडील व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी माझी नेहमी काळजी घेतली. मात्र, लहानपणापासूनच मी तेजस्वीच्या (तुट्टू) जवळ आहे. तो शाळेतून आला की, मी त्याची आणि लहान मुलांची काळजी घ्यायचे. एकदा माझ्या मुलीचा हात मोडला. कळताच तो दुसऱ्या दिवशीच पोहोचला. माझी मुलंही त्याच्या खूप जवळ आहेत.

प्रश्न : तेजस्वीकडे राजकारणी म्हणून तुम्ही कसे पाहता?

उत्तरः तेजस्वीमध्ये क्षमता आहे. तो बिहारसोबत चालणारा एक मुलगा आहे.

प्रश्न: भविष्यात भारतात येण्याची काही योजना आहे का?

उत्तर: (हसतात...) माझ्या पतीला तिथे नोकरी द्या, मग मी येईन. आपल्या देशाची उणीव कोणाला भासत नसते?

प्रश्न: मुलींना त्यांच्या पात्रतेचा दर्जा मिळाला आहे असे तुम्हाला वाटते का?

उत्तर : समाज माणसांपासूनच तयार होतो. आजही अनेक घरांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींना दडपले जाते. सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत मुलींचे शिक्षण पूर्ण करावे. मुलींनी अभ्यास केला तरच त्यांची प्रगती होईल.

आणखी अशाच बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

आई म्हणायची- चेहऱ्यावर जखम झाली तर लग्न होणार नाही:बॉक्सिंगला नकार द्यायची, निखत म्हणाली- काळजी करू नकोस.. वरांची रांग लागेल

पेपरच्या तुकड्यावर वाचली मोहम्मद अलीची स्टोरी:तिथूनच लवलिनाला बॉक्सिंगची ओळख झाली, मेरी कोमकडूनही शिकले; ऑलिम्पिक ब्रॉन्झ जिंकले

गुजरातमध्ये मुस्लिमांनीच मुस्लिमांना हरवले:एकमेव मुस्लिम आमदार म्हणाले-उलेमांनी सांगितल्यानंतरही ओवेसींनी त्यांचे ऐकले नाही

बातम्या आणखी आहेत...