आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • RSS And Muslims: RSS | Mohan Bhagwat | Muslims | Internal Disagreement Over The Rashtriya Swayamsevak Sangh Chief Mohan Bhagwat Statement

संघ, हिंदुत्व, मु्स्लिम आणि वाद:सरसंघचालक मोहन भागवतांच्या विधानावर का होतोय वाद? गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांच्या विचारांवरही होती मत-मतांतरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुस्लिम आणि हिंदूंवर दिलेल्या विधानावर वैचारिक मतभेद समोर येत आहेत. त्यांच्या विचारांना संघातूनच विरोध होत असल्याचे सांगितले जात आहे. संघातून विरोध करणाऱ्यांच्या मते, माधव गोळवलकर गुरुजी यांच्या काळात हिंदुत्वावर संघाचे विचार यापेक्षा वेगळे होते.

गाझियाबाद येथील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, की "एखादा हिंदू म्हणत असेल की मुस्लिमांनी देशात राहू नये, तर तो हिंदू नाहीच. गाय एक पवित्र जनावर आहे, पण गाईंच्या नावे जे लोक इतरांना मारत आहेत ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. अशा प्रकरणांमध्ये कायद्याने आपले काम करायला हवे." एवढेच नव्हे, तर कुठल्याही धर्माचा असला तरी प्रत्येक भारतीयाचा डीएनए एकच आहे असेही सरसंघचालक म्हणाले.

भागवत यांच्या विचारांना संघातूनच विरोध
सरसंघचालकांच्या विचारांवर संघातूनच विरोध होण्याची 5 दशकातील ही दुसरी वेळ म्हणता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. भागवत यांच्या विचारांना प्रामुख्याने नागपूर, आसाम आणि पश्चिम बंगालमधून विरोधाचे स्वर येत आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये संघाने खूप मेहनत घेतली. आसामातील मुस्लिम बहुल भागांमध्ये तर प्रत्येक मतदान केंद्र परिसरात 20-20 लोकांची समिती स्थापित करण्यात आली होती. तरीही त्या परिसरातून सरासरी 5 पेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत. पश्चिम बंगालमध्ये कठोर मेहनत घेऊन सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा विजय झाला.

मुस्लिमांविना हिंदुत्व अपुरे
मुस्लिम समाजावर सरसंघचालक डॉ. भागवत यांनी पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले असे नाही. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये दिल्लीत 3 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना डॉ. भागवत म्हणाले होते, की मुस्लिमांविना हिंदुत्व अपुरे असून हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदुस्थानी आहे. कुणाला हिंदुस्थान या शब्दावर आक्षेप असेल तर त्यांनी भारतीय म्हणावे. यात काहीच हरकत नाही. पण, सरसंघचालकांच्या या विचाराचा नंतर प्रसार करण्यात आला नाही. अर्थातच त्याला अंतर्गत विरोध करण्यात आला.

संघ विचारक दिलीप देवधर यांच्या मते, मुस्लिमांवर संघात नेहमीच मतभेद राहिले आहेत. "सरसंघचालक डॉ. भागवत यांचे विचार डॉ. हेडगेवार आणि देवरस यांच्या विचारांना पुढे नेणारे आहेत. त्यांना यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे. पण, गोळवलकर गुरुजींचे विचार यापेक्षा वेगळे होते. संघाचा इतिहास पाहिल्यास संघात हिंदुत्व या संकल्पनेवरूनही अनेकदा मतभिन्नता झाली. डॉ. हेडगेवार म्हणायचे, की हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. अमेरिकेत राहणारे जसे अमेरिकन आहेत आणि जर्मनीत राहणारे जर्मन आहेत. हिंदू शब्द खूप जिव्हाळ्याचा आहे असे नाही. पण, ते 10 हजार वर्षांपासूनच्या हिंदू परमपरा आणि विचारांसोबत चालतात.

मुस्लिमांचा हेतू केवळ धर्मांतर: गोळवलकर
संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी लिहिले होते, की भारताचा 1200 वर्षांचा इतिहास धार्मिक युद्धाचा राहिला आहे. यामध्ये हिंदूंना संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले. गोळवलकरांच्या मते, 1200 वर्षांपूर्वी मुस्लिमांनी या देशात पाऊल ठेवले तेव्हा त्यांचा हेतू फक्त धर्मांदर करणे आणि त्यांना आपले गुलाम करणे होते. परंतु, संघाच्या बंच ऑफ थॉट्स यामध्ये गुरुजींच्या विचारांचे खंडन करण्यात आले.

सावरकर आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारात भिन्नता
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मुस्लिमांना ताकीद दिली होती की त्यांनी आपले रक्त हिंदूंमध्ये मिसळावे, हिंदू धर्म स्वीकारावा तेव्हाच ते हिन्दुस्थानात राहण्यास पात्र होतील. पण, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार वेगळे होते. मुस्लिमांना स्नेहपूर्वक आत्मसाद करा असे ते म्हणायचे. डॉ. भागवत यांच्यासोबत प्रचारक बनलेले रमेश शिलेदार सांगतात, की हिंदुत्वचा अर्थच धर्मनिरपेक्ष असणे असे आहे. त्यावर वारंवार भर देण्याची गरज नाही. अशात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

देवरस यांना मिळाला होता नवीन आरएसएस बनवण्याचा सल्ला

मुस्लिमांवर यापूर्वी संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यावेळी मुस्लिमांवर चर्चा रंगली होती. 1977 मध्ये मुस्लिम आणि संघाच्या प्रश्नावर वाद-विवाद झाले. त्यावेळी सरसंघचालकांना वेगळे संघ स्थापित करण्याचे सल्ले मिळाले होते. प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्ये बाळासाहेब देवरस यांना विचारण्यात आले, की संघात मुस्लिमांना प्रवेश दिला जाणार आहे का? त्यावर उत्तर देताना म्हटले होते, की उपासना पद्धती वेगळी असतानाही मुस्लिम सुद्धा राष्ट्र जीवनमध्ये समरस होऊ शकतात हे आम्ही तत्वतः मान्य केले. त्यांना व्हावे. पण, देवरस यांच्या विधानावर महाराष्ट्रातील संघ प्रमुख केबी लिमये यांनी नाराजी व्यक्त केली होती.

लिमये यांनी देवरस यांना एक पत्र पाठवले होते. त्यामध्ये लिमये यांनी लिहिले, तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांचे आसन देण्यात आले, त्या आसनावर एकेकाळी डॉ. हेडगेवार बसायचे. कृपा करून त्याच संघाला चालवा आणि त्यालाच पुढे नेण्याचे मार्ग तयार करा. त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला वाटत असेल की यात बदल करायचे आहेत, तर तुमच्यासाठी एक नवीन RSS तयार करा. हिंदूंना एकजूट ठेवण्याचे डॉक्टरजींचे कार्य आमच्यावर सोडून द्या. या संघाला बदललात तर मी संघाशी नाते ठेवू शकणार नाही. यानंतरही देवरस यांनी आपले विचार बदलले नाहीत.

सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास
देवरस यांच्यानंतर संघ प्रमुख केएस सुदर्शन यांच्या नेतृत्वात 2002 मध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाची सुरुवात करण्यात आली. इन्द्रेश कुमार यांना त्याचे मार्ग निर्देशक म्हणून जबाबदारी देण्यात आली. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून या मंचला दूरच ठेवण्यात आले. या मंचाच्या माध्यमातून मुस्लिमांना गोळा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन भाजपच्या संसदीय समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास हे घोषवाक्य दिले होते. पण, भाजपशासित राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व किती हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे ही गोष्ट वेगळी. संघाच्या विरोधकांच्या मते, संघाने मुस्लिमांवर बोलणे म्हणजे हत्तीच्या दातांसारखे आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. मग, मोहन भागत यांच्या विधानाचा अर्थ काय काढावा हे समजत नाही.

बातम्या आणखी आहेत...