आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरपटेलांनी आजच घातली होती RSSवर बंदी:संघ प्रेरित हिंसाचाराने घेतले अनेकांचे प्राण, महात्मा गांधीही ठरले बळी

आदर्श शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आरएसएसच्या सदस्यांनी धोकादायक कामे केली आहेत. देशाच्या काही भागात जाळपोळ, दरोडा, खून आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यवहारात ते सामील आहेत. संघ प्रेरीत हिंसाचाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. राष्ट्रपिता बापू त्यांचे ताजे बळी ठरले आहेत.’

RSS वर बंदी घालण्यासाठी 4 फेब्रुवारी 1948 रोजी जारी करण्यात आलेल्या गृह मंत्रालयाच्या नोटीसचा हा भाग आहे. त्यावेळी देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. मात्र, 16 महिन्यांनंतर 11 जुलै 1949 रोजी काही अटींसह संघावरील बंदी उठवण्यात आली.

30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला मंदिरातून या कथेला सुरुवात झाली

30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी महात्मा गांधी दिल्लीतील बिर्ला भवन येथील प्रार्थनागृहाकडे चालले होते. त्याचवेळी गर्दीतून नथुराम गोडसे बाहेर आले. त्यांनी दोन्ही हात दुमडून हातामध्ये रिव्हॉल्व्हर लपवलेले होते.

काही सेकंदातच नथुरामने रिव्हॉल्व्हर काढून गांधीजींवर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गांधीजींच्या तोंडातून 'हे राम...' असे शब्द बाहेर पडले आणि ते जमिनीवर पडले. नथुरामला जागीच अटक करण्यात आली. तर त्यांचे दोन साथीदार नारायण आपटे आणि विष्णू करकरे दिल्लीतून पळून गेले.

नथुराम हे आरएसएसचे सदस्य असल्याचे मानले जात होते, त्यामुळे गांधींच्या हत्येला आरएसएसला जबाबदार मानून तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घातली होती.

हे छायाचित्र 30 जानेवारी 1948 रोजी बापूंच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेचे आहे. गांधीजी येथे बसून संध्याकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहायचे आणि नंतर लोकांशी संवाद साधायचे. हे छायाचित्र प्रसिद्ध फ्रेंच छायाचित्रकार आंरी कार्तिये-ब्रेन्सो यांनी काढले आहे.
हे छायाचित्र 30 जानेवारी 1948 रोजी बापूंच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेचे आहे. गांधीजी येथे बसून संध्याकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहायचे आणि नंतर लोकांशी संवाद साधायचे. हे छायाचित्र प्रसिद्ध फ्रेंच छायाचित्रकार आंरी कार्तिये-ब्रेन्सो यांनी काढले आहे.

RSS ला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी 4 फेब्रुवारी 1948 रोजी नोटीस जारी

4 फेब्रुवारी 1948 रोजी केंद्र सरकारने आरएसएसवर बंदी घालण्याची नोटीस जारी केली. ही गृह मंत्रालयाच्या अभिलेखागारात आहे. त्यात लिहिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी...

संघाच्या सदस्यांनी धोकादायक कामे केली आहेत. RSS सदस्य देशाच्या काही भागात जाळपोळ, दरोडा, खून आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यवहारात सामील आहेत. संघ प्रेरीत हिंसाचाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. राष्ट्रपिता बापू त्यांचे ताजे बळी ठरले आहेत.

संघाच्या सदस्यांनी लोकांना दहशतवादी पद्धतींचा अवलंब करण्यास, शस्त्रे गोळा करण्यासाठी, सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणारी पत्रके वाटली. या सर्व गोष्टी गुप्तपणे केल्या जात होत्या.

भारत सरकार देशातील द्वेष आणि हिंसाचाराच्या शक्तींना उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे. या धोरणांतर्गत सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बेकायदेशीर घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पावलावर सरकारला सर्व कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचे सहकार्य लाभले आहे.

5 फेब्रुवारी 1948 चे इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र. त्यात म्हटले आहे की, सरकारने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून RSS ला देशात बेकायदेशीर घोषित केले आहे.
5 फेब्रुवारी 1948 चे इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र. त्यात म्हटले आहे की, सरकारने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून RSS ला देशात बेकायदेशीर घोषित केले आहे.

RSS वरून बंदी हटवण्यासाठी 16 महिन्यांचा संघर्ष

जुलै 1948 मध्ये सरदार पटेल यांनी हिंदू महासभेचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले होते की, माझा विश्वास आहे की हिंदू महासभेचे अतिरेकी गांधींच्या हत्येच्या कटात सामील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारवाया देश आणि सरकारसाठी धोकादायक आहेत. आमच्या वृत्तानुसार, बंदीनंतरही आरएसएसच्या हालचाली थांबलेल्या नाहीत.

ही बंदी हटवण्यासाठी आरएसएसचे लोक प्रयत्न करत राहिले. सप्टेंबर 1948 मध्ये तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी गृहमंत्री सरदार पटेल यांना पत्र लिहून संघावरील बंदी हटवण्याची मागणी केली होती.

याला उत्तर देताना पटेल यांनी पत्रात लिहिले की, 'हिंदू समाजाला संघटित करणे आणि त्यांना मदत करणे ही एक गोष्ट आहे, परंतु निरपराध आणि असहाय लोकांच्या दुःखाचा बदला घेणे ही दुसरी गोष्ट आहे. आरएसएस सदस्यांच्या भाषणांमध्ये जातीय विष आहे. हिंदूंना एकत्र करण्यासाठी विष पसरवण्याची गरज नाही. या विषामुळे देशाने राष्ट्रपिता बापूंना गमावले. गांधीजींच्या निधनानंतर आरएसएसच्या लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

आरएसएसशी संलग्न पत्रकार एस. गुरुमूर्ती द हिंदूमधील एका लेखात लिहितात की, अटकेनंतर सहा महिन्यांनी तत्कालीन सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर गोळवलकरांनी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना पत्र लिहून RSS वरील बंदी उठवण्याची विनंती केली. प्रत्युत्तरात सरकारने म्हटले की, त्यांच्याकडे गांधींच्या हत्येमध्ये आरएसएसचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत.

त्यानंतर गोळवलकर यांनी पुरावे सार्वजनिक करून आरएसएसवर खटला चालवण्याचे आव्हान सरकारला दिले. मात्र, सरकारने कोणताही पुरावा जाहीर केला नाही. यानंतर गोळवलकरांनी बंद केलेल्या शाखा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरकारने त्यांना पुन्हा अटक केली.

11 जुलै 1949 च्या रात्री RSS वरील बंदी उठवण्यात आली आणि 13 जुलै रोजी सरसंघचालक एम एस गोळवलकर यांची तुरुंगातून सुटका झाली.
11 जुलै 1949 च्या रात्री RSS वरील बंदी उठवण्यात आली आणि 13 जुलै रोजी सरसंघचालक एम एस गोळवलकर यांची तुरुंगातून सुटका झाली.

9 डिसेंबर 1948 रोजी आरएसएसने सत्याग्रह सुरू केला. त्यांची मागणी होती- आरोप सिद्ध करा, बंदी उठवा आणि गुरुजी म्हणजेच गोळवलकर यांची सुटका करा. एका महिन्यात आरएसएसच्या 80 हजारांहून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली.

गोडसे कोर्टात म्हणाले- गांधी हत्येच्या वेळी मी आरएसएसचा सदस्य नव्हतो

धीरेंद्र कुमार झा यांच्या ‘Gandhi's Assassin’ या पुस्तकानुसार नथुरामने 8 नोव्हेंबर 1948 रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन गांधींची हत्या झाली तेव्हा मी आरएसएसचा सदस्य नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी अनेक वर्षे आरएसएसमध्ये काम केले. नंतर मला वाटले की हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राजकारणात भाग घेणे आवश्यक आहे. म्हणूनच मी संघ सोडला आणि हिंदू महासभेचे सदस्यत्व घेतले.

महात्मा गांधी यांच्या हत्येतील आरोपींचा कोर्टात बसलेला फोटो. नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे पहिल्या रांगेत (डावीकडून उजवीकडे). दिगंबर रामचंद्र बडगे, शंकर किस्तैय्या आणि गोपाल गोडसे (डावीकडून उजवीकडे) दुसऱ्या रांगेत. सावरकर तिसर्‍या रांगेत मध्यभागी काळी टोपी घालून बसले आहेत.
महात्मा गांधी यांच्या हत्येतील आरोपींचा कोर्टात बसलेला फोटो. नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे पहिल्या रांगेत (डावीकडून उजवीकडे). दिगंबर रामचंद्र बडगे, शंकर किस्तैय्या आणि गोपाल गोडसे (डावीकडून उजवीकडे) दुसऱ्या रांगेत. सावरकर तिसर्‍या रांगेत मध्यभागी काळी टोपी घालून बसले आहेत.

गांधींच्या हत्येच्या वेळी आपण आरएसएसचा सदस्य नव्हतो, असे गोडसे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले असले तरी यावर प्रश्न उपस्थित झाले

नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतीतून या प्रश्नांना अधिक चालना मिळाली. महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी गोपाळ गोडसेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 1994 मध्ये त्यांनी फ्रंटलाइन मासिकाला मुलाखत दिली.

त्यात गोपाल म्हणाले की, 'नथुरामने न्यायालयात संघ सोडण्याविषयी बोलले कारण गांधींच्या हत्येनंतर संघ आणि गोळवलकर मोठ्या अडचणीत सापडले होते. वास्तविक नथुरामने संघ कधीच सोडला नव्हता. संघात ते बौद्धिक कार्यवाहक बनले होते. आम्ही सर्व भाऊ - नथुराम, दत्तात्रेय, मी आणि गोविंद संघाशी संबंधित होतो. आपण घरापेक्षा संघात वाढलो असे म्हणता येईल. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते.

नथुराम गोडसे यांचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे मुलाखत देताना.
नथुराम गोडसे यांचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे मुलाखत देताना.

गोपाल पुढे म्हणाले की, आरएसएसने गांधींच्या हत्येचा आदेश दिला नव्हता, पण संघ त्यांना स्वतःचा म्हणून स्वीकारण्यास नाकारू शकत नाही. हिंदू महासभेने त्यांना नेहमीच आपले मानले.

खरं तर, नोव्हेंबर 1993 मध्ये लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, गोडसे हे आरएसएसचे कट्टर टीकाकार होते आणि संघाचा गोडसेशी काहीही संबंध नाही. अडवाणींच्या या विधानाने नथुरामचा भाऊ संतापले होते. त्यांनी याला भ्याडपणा म्हटले होते.

महात्मा गांधींच्या हत्येच्या गुन्ह्यात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्तैय्या, गोपाळ गोडसे आणि दत्तारीह परचुरे या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नंतर उच्च न्यायालयाने किस्तैय्या आणि परचुरे यांची निर्दोष मुक्तता केली.

नथुराम आणि आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली. लेखक धीरेंद्र कुमार झा, ज्यांनी गांधींवर एक पुस्तक लिहिले आहे, त्यांनी द कारवांमधील एका लेखात म्हटले आहे की, नथुरामने फाशी देण्यापूर्वी प्रार्थना वाचली…

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते

ही आरएसएसची अधिकृत प्रार्थना आहे. 1939 मध्ये लिहिलेली ही प्रार्थना आरएसएसच्या शाखांमध्ये पाठ केली जाते. जर नथुराम यांनी संघ सोडला असता तर त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी संघाची प्रार्थना का केली, असा प्रश्न उपस्थित होतो.

सप्टेंबर 2016 मध्ये, नथुराम गोडसेचे भाऊ गोपाळ गोडसे यांचे पणतू सात्यिक सावरकर यांनीही असा दावा केला होता की, नथुराम यांनी कधीही संघ सोडला नव्हता. नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांची सर्व पत्रे आमच्या कुटुंबाने जपून ठेवली आहेत, असे सात्यिक यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्यामुळे नथुराम यांचा थेट आरएसएसशी संबंध असल्याचे स्पष्ट होते.

संविधान आणि तिरंग्याशी विश्वासू राहण्याच्या अटीवर बंदी उठवली

बंदीला एक वर्ष पूर्ण होऊनही सरकारकडे आरएसएसविरोधात कोणतेही ठोस पुरावे नव्हते. सरकार हळूहळू बॅकफूटवर जात होते. अखेरीस, 11 जुलै 1949 रोजी सरकारने RSS वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

14 जुलै 1949 रोजी प्रकशात झालेले द हिंदू वृत्तपत्राचे कटिंग आहे. सरकारने RSS वरील बंदी उठवली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. संविधान, तिरंग्याचा आदर करणे आणि सांस्कृतिक संघटना म्हणून काम करण्याची अटही यात नमूद करण्यात आली आहे.
14 जुलै 1949 रोजी प्रकशात झालेले द हिंदू वृत्तपत्राचे कटिंग आहे. सरकारने RSS वरील बंदी उठवली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. संविधान, तिरंग्याचा आदर करणे आणि सांस्कृतिक संघटना म्हणून काम करण्याची अटही यात नमूद करण्यात आली आहे.

1949 मध्ये बंदी उठवताना जारी करण्यात आलेल्या सरकारी नोटीसनुसार सरकारने संघावरील बंदी उठवली, पण अनेक अटीही घातल्या. संघाने सरकारला वचन दिले की, ते संविधान आणि तिरंग्याशी एकनिष्ठ राहतील. संघटनेत हिंसक लोकांना स्थान असणार नाही. संघ स्वतःची राज्यघटना तयार करेल ज्या अंतर्गत संघटनेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील. तसेच संघ सांस्कृतिक संघटना म्हणून काम करेल आणि राजकारणात पाऊल ठेवणार नाही.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आणखी काही बातम्या वाचा...

अदानींची JPC कडून चौकशी करून घेण्यावर विरोधक ठाम:यामुळे केंद्र सरकार 3 वेळा उलथले; सरकार टाळाटाळ करण्याचे कारण काय?

6 कोटी वर्षांपूर्वी झाडे दबून बनले दगड:त्यातून तयार होणार अयोध्येत रामललाची मूर्ती; श्रद्धा- शापामुळे विष्णू बनले होते शालिग्राम

आसारामच्या अटकेची फिल्मी कहाणी:9 तास चकवा दिल्यावर म्हटले आत्महत्या करेन; ACP चंचल म्हणाल्या- दार उघडा, नाहीतर तोडून टाकू

बातम्या आणखी आहेत...