आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Russia Sputnik V Vaccine Price India Update | Key Things To Know About Russia Coronavius (Covid 19) Vaccine Sputnik V

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:18+ वयोगटाला मिळणार रशियाची स्पुतनिक V लस; जाणून घ्या या व्हॅक्सीनबद्दल सर्वकाही...

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून ही लस तयार केली जात आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतात 1 मे पासून लसीकरणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. देशात आतापर्यंत 45+ वयोगटातील लोकांना लस दिली जात होती. आता 1 मे पासून 18+ वयोगटातील सर्वांचेच लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान, या लसीकरणापूर्वी लसींच्या पुरवठ्याची सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात होती. पण, रशियाची लस स्पुतनिक V ने या सर्व चिंता दूर केल्या आहेत.

रशियाचे राजधानी मॉस्कोतील गामालेया इंस्टीट्यूटसोबत मिळून ही लस तयार करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) चे प्रमुख किरिल दिमित्रेवच्या हवाल्याने रॉयटर्सने सांगितले की, स्पुतनिक V ची पहिली खेप 1 मे पासून भारतात उपलब्ध होणार आहे. दिमित्रेवने दावा केला आहे की, स्पुतनिक V च्या पहिल्या बॅचमधून भारतातील 18+ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात मदत मिळेल. 13 एप्रिलला भारताने इतर देशात मंजुरी मिळालेल्या सर्व लसींना भारतातही मंजुरी दिली आहे.

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची सुरुवात झाली होती. यासाठी कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. कोवीशील्डला ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने मिळून तयार केले आहे. भारतात पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) याचे प्रोडक्शन करत आहे. तर, कोव्हॅक्सिनला भारत बायोटेकने इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरलॉजी (NIV)सोबत मिळून तयार केले आहे.

जाणून घ्या स्पुतनिक V बद्दल ?

 • 4 ऑक्टोबर 1957 ला सोवियत संघ (आताचा रशिया) ने जगातील पहिली सॅटेलाइट 'स्पुतनिक' लॉन्च केली होती. त्यावेळेस सुरू असलेल्या शीत युद्धादरम्यान याला रशियाचे सर्वात मोठे यश मानले जात होते. या सॅटेलाइटच्या नावावरुन रशियाने या व्हॅक्सीनचे नाव स्पुतनिक V ठेवले.
 • मॉडर्ना आणि फायजरची mRNA व्हॅक्सीन 90% परिणामकारक सिद्ध झाली होती. यानंतर, स्पुतनिक V सर्वाधिक 91.6% परिणामकारक ठरली आहे.
 • या व्हॅक्सीनला रशियाच्या गामालेया इंस्टीट्यूटने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF)च्या मदतीने बनवले आहे.
 • ही लस व्हायरस व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारीत म्हणजेच, कोवीशील्डसारखीच आहे.
 • कोवीशील्डमध्ये चिम्पँजीमध्ये मिळणाऱ्या अॅडेनोव्हायरसचा वापर केला आहे. तर, रशियाच्या लसीत दोन वेगवेगळ्या व्हेक्टरचा वापर केला आहे.
 • स्पुतनिक V ला आतापर्यंत जगातील 60 देशात परवानगी मिळाली आहे. सर्वात आधी ऑगस्ट 2020 मध्ये रशियाने याला परवानगी दिली. यानंतर, बेलारूस, सर्बिया, अर्जेंटीना, बोलिविया, अल्जीरिया, फिलिस्तीन, वेनेजुएला, पैराग्वे, यूएई, तुर्कमेनिस्तानमध्ये परवानगी मिळाली.

भारतात कशी ठरणार गेमचेंजर ?

 • भारतात सध्या दोन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हॅक्सिनचा एफिकेसी रेट 81%, तर कोवीशील्डचा 80% आहे. अशात 91.6% इफेक्टिवनेस असलेली रशियाच्या लसीने सर्वाधिक परिणाम पडू शकतो.
 • सध्या दोन्ही व्हॅक्सीनचे प्रोडक्शन 4 कोटी डोस प्रति महिना आहे, यातून फक्त 25 लाख डोस रोज दिला जाऊ शकतात.
 • सध्या 7 कोटी डोस दर महिना मिळण्याची गरज आहे, त्यामुळे भारतातील व्हॅक्सीनची कमतरता रशियाची व्हॅक्सीन भरुन काढू शकते.
 • RDIF चे सीईओ किरिल दिमित्रेवने सांगिल्यानुसार ही लस सर्वांना मिळावी, यासाठी याची किंमत दहा डॉलरपेक्षा कमी ठेवली आहे.
 • जगातील 90% पेक्षा जास्त इफेक्टिवनेस असलेल्या लसींच्या तुलनेत ही खूप स्वस्त आहे.
 • भारतात या व्हॅक्सीनला डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी विकसित करत असून, 1,500 वॉलंटियर्सवर फेज-3 ब्रिजिंग ट्रायल्स झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...