आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Russia Sputnik V Vs Covaxin Covishield; Which COVID 19 Vaccine Is Better? Benefits, Side Effects And Efficacy

एक्सप्लेनर:कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुतनिक V?, कोणती लस आहे सर्वात चांगली, जाणून घ्या याविषयी A to Z

रवींद्र भजनीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वसामान्यांना या तिन्ही लसींची माहिती असणे गरजेचे आहे....

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. 1 मे पासून तिस-या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात देशातील 18+ नागरिकांना लस दिली जाणार आहे. अनेक राज्यांत पुढील एक दोन दिवसांत लसीकरण सुरु होईल. मात्र जी लस वापरली जात आहे किंवा वापरली जाणार आहे त्याबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. दरम्यान, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन यापैकी कोणती लस चांगली? यावर चर्चादेखील सुरु झाली आहे. याशिवाय आता रशियन लस - स्पुतनिक V देखील उपलब्ध होणार आहे.

वृत्तानुसार, तिन्ही लसी भारताच्या कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होतील. तसं पाहता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर देशातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणापासून म्हणजे 16 जानेवारीपासून केला जातोय. चांगली गोष्ट अशी की, तिन्ही लसी कोरोनाची गंभीर लक्षणे रोखण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यास 100% प्रभावी आहेत. म्हणूनच जगभरातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, जी लस उपलब्ध असले त्याचा डोस नक्की घ्या. आपला जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु तरीही आपल्याला या तिन्ही लसींची माहिती असणे गरजेचे आहे....

तिन्हीपैकी कोणती लस चांगली आहे?
तिन्ही लसी चांगल्या आहेत. ज्या तुम्हाला उपलब्ध असेल, त्याचा डोस नक्की घ्या. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा वापर 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण माहिमेत केला जातोय. कोव्हॅक्सिन ही लस संपूर्णपणे भारतात विकसित आणि उत्पादित होत आहे. तर कोविशिल्ड ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेका यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे आणि आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्याचे उत्पादन घेतले जात आहे.

तर कोरोना युद्धात 1 मेपासून सामील झालेली रशियन लस स्पुतनिक V ही मॉस्कोच्या गामालेया इन्स्टिट्यूटने रशियाच्या विकास आणि गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) च्या सहकार्याने तयार केली आहे. भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डी प्रयोगशाळेच्या देखरेखीखाली 6 कंपन्या त्याचे उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला 1.25 कोटी डोसची आयात होणार आहे.

या तीन लसींमध्ये काही असमानता तसेच फायदे आहेत. कोविशिल्ड जगातील सर्वात लोकप्रिय लसींपैकी एक आहे, बहुतेक देशांमध्ये ती वापरली जात आहे. डब्ल्यूएचओने देखील याच्या वापरासाठी तातडीची मंजुरी दिली आहे. त्याच वेळी, कोव्हॅक्सिन सध्या फक्त भारतात वापरली जात आहे, परंतु म्युटेंट स्ट्रेन्सविरोधात ही सर्वात प्रभावी लस असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे स्पुतनिक Vला भारतासह 60 हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.

ही लस कशी तयार केली जाते?
कोव्हॅक्सिन ही पारंपारिक इनएक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. म्हणजेच, याच मृत विषाणू शरीरात सोडले जाते. ज्यामुळे अँटीबॉडी रिस्पॉन्स देतात आणि शरीरात विषाणूला ओळखून त्याच्याविरोधात लढण्यासाठी अँडीबॉडीज तयार करतात.

कोविशिल्ड ही एक व्हायरल वेक्टर लस आहे. यात चिंपांझीत आढळणा-या ChAD0x1 चा वापर करुन कोरोना व्हायरस सारखे स्पाइक प्रोटीन बनवले जाते. हे शरीरात टाकून कोरोना विषाणूविरोधातील प्रोटेक्शन तयार केले जाते.

स्पुतनिक V ही देखील व्हायरल वेक्टर लस आहे. परंतु फरक इतका आहे की ती एकाऐवजी दोन विषाणूंपासून बनविली गेली आहे. यामध्ये दोन्ही डोसचे प्रमाण भिन्न आहेत. तर, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन डोसमध्ये कोणताही फरक नाही.

डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेला शनिवारी हैदराबादमध्ये स्पुतनिक Vच्या दीड लाख डोसची पहिली खेप मिळाली. मेच्या अखेरीस आणखी 30 लाख डोस येणार आहेत.
डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेला शनिवारी हैदराबादमध्ये स्पुतनिक Vच्या दीड लाख डोसची पहिली खेप मिळाली. मेच्या अखेरीस आणखी 30 लाख डोस येणार आहेत.

किती आठवड्यांच्या फरकाने किती डोस घ्यावेत?
तिन्ही लस दोन डोसचे आहेत. म्हणजेच, इम्युन रिस्पॉन्ससाठी दोन डोस घेणे गरजेचे आहे. या सर्व लसी इंट्रामस्क्युलर आहे. म्हणजेच, खांद्याजवळ हातावर इंजेक्शन दिले जाते.

कोव्हॅक्सिनचे दोन डोस 4 ते 6 आठवड्यांच्या फरकाने दिले जातात. तर कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये 6-8 आठवड्यांचा फरक ठेवला गेला आहे. स्पुतनिक Vच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचे अतंर ठेवले गेले आहे.

सुरुवातीला भारतात, कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये 4-6 आठवड्यांचे अंतर ठेवले गेले, परंतु चाचण्यांमधून हे समोर आले की, कोविशिल्डचा दुसरा डोस जेवढ्या जास्त अंतराने दिला जाईल, तितका त्याचा प्रभाव वाढेल.

या तिन्ही लसी भारताच्या मेडिकल सेटअपसाठी योग्य आहेत. या लसी 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात साठवल्या जाऊ शकतात. त्या तुलनेत अमेरिकेसह बर्‍याच देशांमध्ये वापरल्या जाणा-याफायझर आणि मॉडर्नाची mRNA (मेसेंजर आरएनए) लस स्टोअर करण्यासाठी तापमान -70 डिग्री सेल्सियस असणे आवश्यक आहे.

या सर्व लसी किती प्रभावी आहेत?
जेव्हा या लसींच्या इफेक्टिव्हनेसचा विचार केला जातो तेव्हा तिन्ही लस फार प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तिन्ही लसी डब्ल्यूएचओचे मानके पूर्ण करतात. अद्याप क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा येतोय आणि या लसींच्या परिणामांवर अभ्यास चालू आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोविशिल्डच्या चाचण्या संपल्या. त्याची एफिकेसी अर्थातच इफेक्टिव्हनेस रेट 70% आहे, हा प्रभाव डोसमध्ये अंतर वाढवल्यावर वाढतो. लस गंभीर लक्षणांना प्रतिबंधित करतेच सोबतच रिकव्हरीचा वेळही कमी करते.

कोव्हॅक्सिनच्या चाचण्या यावर्षी पूर्ण झाल्या आहेत. एप्रिलमधील दुसर्‍या अंतरिम निकालात ही लस 78% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. विशेष गोष्ट अशी की, ही लस गंभीर लक्षणे रोखण्यासोबतच मृत्यूचे प्रमाण 100% कमी करते.

स्पुतनिक व्ही ही भारतातील सर्वात प्रभावी लस आहे. मॉडर्ना आणि फायझरच्या mRNA लस 90% अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तर स्पुतनिक V 91.6% सर्वात प्रभावी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. हे छायाचित्र त्यांनी जेव्हा लसीचा दुसरा डोस घेतला तेव्हाचे आहे. 8 एप्रिल रोजी मोदींनी दुसरा डोस घेतला होता. त्यावेली कोव्हॅक्सिनच्या ट्रायल्सचे आकडे आले नव्हते. आणि त्याच्या परिणामावर संशय व्यक्त केला गेला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. हे छायाचित्र त्यांनी जेव्हा लसीचा दुसरा डोस घेतला तेव्हाचे आहे. 8 एप्रिल रोजी मोदींनी दुसरा डोस घेतला होता. त्यावेली कोव्हॅक्सिनच्या ट्रायल्सचे आकडे आले नव्हते. आणि त्याच्या परिणामावर संशय व्यक्त केला गेला होता.

या लसींची किंमत व उपलब्धता किती आहे?
कोव्हॅक्सिन आणि कोव्हशिल्ड लवकरच खुल्या बाजारात उपलब्ध होतील. राज्य सरकार देखील या लसी खरेदी करुन वापरण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर, स्पुतनिक V लवकरच बाजारात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्डच्या एका डोसची किंमत राज्य सरकारसाठी 300 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये निश्चित केली आहे. त्याच वेळी, कोव्हॅक्सिन थोडी महाग आहे. राज्य सरकारांना ही 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1,200 रुपये प्रति डोस उपलब्ध होईल.

त्याचबरोबर, स्पुतनिक V विकसित करण्यास मदत करणारे RDIF चे प्रमुख दिमित्रेव यांच्या म्हणण्यानुसार, ही लस 10 डॉलर म्हणजे 700 रुपयांना उपलब्ध असेल. सध्या राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी दर जाहीर केलेले नाहीत.

या लसींसाठी तुमच्या खिशातून किती पैसे जातील, हे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर तसेच तुम्हाला खासगी की सरकारकडून लस घ्यायची आहे या तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल. 18+ नागरिकांना विनामूल्य लस दिली जाईल असा निर्णय 24 राज्यांनी घेतला आहे.

नवीन व्हेरिएंट्ससाठी ही लस किती प्रभावी आहे?
कोरोना विषाणूचे अनेक नवीन म्युटेंट स्ट्रेन्स अनेक देशांमध्ये आहेत. यूकेत केंट स्ट्रेन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत स्ट्रेन्ससह डबल म्युटेंट आणि ट्रिपल म्युटेंट स्ट्रेन बर्‍याच देशांमध्ये आढळून आले आहेत. या म्युटेंट्सने शास्त्रज्ञांची चिंता वाढविली आहे. आतापर्यंत हे सिद्ध झाले आहे की कोव्हॅक्सिन या सर्व व्हेरिएंट्सविरोधी प्रभावी आहे.

कोविशिल्ड आणि स्पुतनिक V यांच्या संदर्भात अद्याप असे कोणतेही दावे किंवा अभ्यास समोर आलेला नाही. तरीही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आपल्याकडे जी लस उपलब्ध असेल तिचा डोस घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण नवीन म्युटेंट स्ट्रेन्स आणि व्हेरिएंट्सचा प्रसार होण्यापासून प्रतिबंधित करू शकू.

भारतात कोविशिल्डची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII) तून जेव्हा पहिल्यांदा व्हॅक्सिन तयार होऊन बाहेर काढल्या तेव्हा कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी स्वत: हे छायाचित्र घेतले सोशल मीडियावर पोस्ट केले.
भारतात कोविशिल्डची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII) तून जेव्हा पहिल्यांदा व्हॅक्सिन तयार होऊन बाहेर काढल्या तेव्हा कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी स्वत: हे छायाचित्र घेतले सोशल मीडियावर पोस्ट केले.

या लसींचे दुष्परिणाम काय आहेत?
तिन्ही लसांचे समान दुष्परिणाम आहेत. तिन्ही लस इंट्रामस्कुलर आहेत आणि हातात इंजेक्शनद्वारे खोलवर दिली जाते. यामुळे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी वेदना, सूज येते. त्याचप्रमाणे, सौम्य ताप, सौम्य डोकेदुखी, अंगदुखी देखील ही लक्षणे उद्भवू शकतात. यामुळे घाबरु नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लक्षणांनुसार औषधे घ्या.

कोणत्या लोकांना कोणती लस घेऊ नये आणि का ?
ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचे पदार्थ किंवा औषधांपासून एलर्जी असते त्यांनी लस घेऊ नये. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे, पहिला डोस घेतल्यानंतर काही अडचण आली असेल तर, दुसरा डोस घेण्यापूर्वी थांबा. डॉक्टरांशी बोला, मग निर्णय घ्या.

ज्या लोकांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा थेरपी दिली गेली आहे त्यांनी देखील सध्या लस घेऊ नये. ज्या लोकांचे प्लेटलेट्स कमी आहेत किंवा स्टिरॉइड उपचार घेत आहेत त्यांना लस घेतल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीत राहण्यास सांगितले गेले आहे. 18 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान देणा-या महिलांना सध्या लसीचा डोस घेण्यास मनाई आहे. तसेच, ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आहेत किंवा जे पुर्णपणे बरे झालेले नाहीत, त्यांनी थोडा काळ थांबून डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या लसींचा प्रभाव किती काळ टिकेल?

माहित नाही. या सर्व लसी फारच कमी वेळात तयार झाल्या आहेत. या लसींचा प्रभाव किती काळ राहिल, याच्या चाचण्या केल्या गेल्या नाहीतय या कारणास्तव, त्यांचा किती काळ परिणाम होईल हे सांगणे फार कठीण आहे. तर काही तज्ज्ञ असा दावा करतात की, कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज कमीतकमी 9 ते 12 महिन्यांपर्यंत प्रभावी असतील. तसे, अलीकडेच फायझरच्या लसीसंदर्भात विधान जारी केले गेले आहे की, एका वर्षात तिस-या डोसची आवश्यकता भासू शकते. हे पाहता याक्षणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य दिसत नाही. याक्षणी, केवळ माहिती इतकी आहे की, सध्याच्या संकटापासून दूर राहण्यासाठी ही लस प्रभावी आहे.

आणि शेवटी…
चांगली गोष्ट अशी आहे की, तिन्ही लस गंभीर कोरोना लक्षणे आणि मृत्यूपासून बचाव करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. दोन डोस घेतल्यास, आपल्या शरीरात कोरोना संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी पुरेशा अँटीबॉडीज असतात. दोन डोस घेतल्यास संसर्ग झाल्यास देखील तो सामान्य सर्दी आणि खोकल्याप्रमाणे असेल. आणि कोरोनातून अल्पावधीतच मुक्त होता येईल.

बातम्या आणखी आहेत...