आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Russia Ukraine War Prolonged War Is Difficult, Because No European Country Has The Courage To Fight Russia | Marathi News

युक्रेनवर रशियन हल्ला:दीर्घकाळ युद्ध चालणे कठीण, कारण एकाही युरोपीय देशात रशियाचा मुकाबला करण्याची हिंमत नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेनमधील युद्ध किती काळ चालेल?
अमेरिकेने काहीही म्हटले तरी रशियाशी मुकाबला करण्याच्या स्थितीत एकही युरोपीय देश नाही. त्यामुळे युद्ध दीर्घकाळ चालू शकत नाही. हे देश रशियाला भडकावणार नाहीत आणि युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला ‘चोख प्रत्युत्तर’ मिळण्याची शक्यता नाही.

त्याला जागतिक युद्धाचे रूप येऊ शकते का?
अमेरिका किंवा नाटो उघडपणे भाग घेत नाहीत तोपर्यंत युद्धाला जागतिक युद्धाचे रूप येणार नाही.

हे युद्ध स्वत:ला महाशक्ती सिद्ध करण्यासाठी आहे का?
२१ व्या शतकात सर्व युद्धे अमेरिकी आणि त्याच्या सहकारी देशांनी लढली आहेत. युद्ध करणाऱ्या आणि इतर देशांवर लष्करी इरादे थोपवणाऱ्या देशांनाच महाशक्ती मानले जाते. अशा स्थितीत रशियाने या हल्ल्याद्वारे आपणच खरी महाशक्ती आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाची लष्करी शक्ती आणि चीनच्या आर्थिक शक्तीची आघाडी त्यांना संयुक्त महाशक्तीचा दर्जा देत आहे. बहुधा त्यामुळे चीनची १२ विमाने गुरुवारी तैवानच्या सीमेत घुसली, कारण तैवानच्या मागेही अमेरिका उभा आहे.

अमेरिका व रशियापैकी भारत कोणाची निवड करेल?
भारतावर मोठा कूटनीतिक दबाव आहे. त्याचा अनुचित फायदा चीन आणि पाकिस्तानला मिळेल. युक्रेनवरील लष्करी कारवाईच्या पृष्ठभूमीवर रशिया जास्त पाठिंबा मिळवण्यासाठी इच्छुक आहे. अशा प्रकारे रशिया आता चीनच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिलेला दिसेल. ही स्थिती भारतासाठी चांगली नाही.

या युध्दाचे काय किंमत मोजावी लागेल?
तेलाच्या किमती गगनाला भिडतील. यामुळे अनेक उद्योगांवर विपरित परिणाम होईल. महागाईचा फटका केवळ रशियालाच नव्हे तर अमेरिका,युरोपलाही बसणार आहे.रशियाची गॅस पाइपलाईन युक्रेनपासून ते थेट जर्मनी आणि अन्य युरोपिय देशांपर्यंत जाते. सध्या हा व्यापारच संकटात आहे. जर्मनीने नॉर्ड स्ट्रीमला मंजूरी देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. याव्दारे रशियन गॅसचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव होता. युक्रेनमधून नाझीवादाचे उच्चाटन करण्यासाठी लष्करी कारवाई केल्याची मखलाशी रशियाने केली आहे. अर्थात जर्मनीवरही वक्रदृष्टी पडली आहे. पाइपलाइनवर ५०० कोटी डॉलर्सचा खर्च झालेला आहे.ती जवळपास तयार झाली होती यामुळे युरोपियन युनियनला गॅसचा पुरवठा होणार होता.

अमेरिकेसमोरील आर्थिक आव्हाने काय आहेत ?
इराक आणि अफगानिस्तानातील युद्धामुळे अमेरिकेला फटका बसला होता. ९-११ च्या घटनेनंतर अमेरिकेने या युद्धांवर ७ ट्रिलीयन डॉलर्स खर्च केले आहेत. अफगणिस्तानमधून माघार घेण्यामागे ते एक कारण होते. त्यामुळे युद्धाच्या भानगडीत अमेरिका पडणार नाही.

चीनला या युद्धामुळे काय फायदा ?
यूक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे चीन स्वत:चे महत्व वाढवून घेईल. तैवान ते दक्षिण चीन समुद्रापर्यंत चीनची दादागिरी वाढू शकते. भारतविरुद्ध सरहद्दीवरील लष्करी तणाव निवळण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या चर्चांमध्ये अधिक पेच निर्माण होऊ शकतो. माॅस्को येथे चीनचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांसोबत भारतीय मंत्र्यांच्या चर्चेअंती एलएसीचा तोडगा दृष्टीपथात होता.विद्यमान परिस्थितीत चीनला रशियाचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

भारतावर काय परिणाम होईल?
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सारीपाट बदलेल. आर्थिक महाशक्ती असूनही चीनच्या तुलनेत रशिया एक मोठी शक्ती म्हणून उदयास येईल. भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे. रशियासोबतची भारताची जुनी मैत्री अधिक दृढ होईल. त्याचा फायदा रशियालाही होईल. अमेरिकी शस्रास्र बाजारापेक्षा रशियासोबतचे लष्करी संबंध नव्याने मजूबत होतील.

माजी परराष्ट्र सचिव शशांक, माजी राजनयिक भास्वती घोष, माजी सैन्य संचालन महासंचालक ले. जन. विनोद भाटिया

बातम्या आणखी आहेत...