आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरआज युक्रेनचा स्वातंत्र्यदिन:रशिया मोठा हल्ला करण्याची शक्यता; पुतिन यांनी पाठवली क्षेपणास्त्रे

अभिषेक पांडे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'या आठवड्यात रशिया काहीतरी खूप वाईट करण्याचा प्रयत्न करू शकतो, विशेषत: काहीतरी विषारी.'

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ही भीती व्यक्त केली आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या 4 दिवस आधी आपल्या भाषणात त्यांनी देशातील जनतेला सावध केले होते.

'घरी राहा आणि इशाऱ्यांचे पालन करा'

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवच्या गव्हर्नरने तेथील नागरिकांना हा इशारा दिला आहे. खार्किवमध्ये रशियन गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्टपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

झेलेन्स्की आणि खार्किवचे गव्हर्नर यांची ही भीती निराधार नाही. अनेक रिपोर्टमध्ये या भीतीच्या कारणाची पुष्टी झाली आहे....

सध्या रशिया युक्रेनच्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे आणि अधिक शस्त्रे जमा करत आहे. युक्रेनवर S-300 क्षेपणास्त्रांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार होण्याचा स्पष्ट धोका आहे. 20 ऑगस्टपूर्वी अनेक रशियन गाड्या युक्रेनच्या सीमेवर पोहोचल्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

युक्रेनियन एनजीओ स्टार्टकॉमचा याच आठवड्यात आला अहवाल

“आम्हाला याची जाणीव आहे की रशिया आगामी काळात युक्रेनियन नागरी पायाभूत सुविधा आणि सरकारी इमारतींवर हल्ले सुरू करण्याचे प्रयत्न तीव्र करत आहे. युक्रेनमधील रशियाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता, आम्हाला रशियन हल्ल्यांमुळे नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना असलेल्या धोक्यांची चिंता आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्थांचा या आठवड्यातील अहवाल

24 ऑगस्टलाच युक्रेनवर रशियन हल्ला होण्याची शक्यता का आहे, हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.. याची दोन मोठी कारणे आहेत, चला जाणून घेऊया…

पहिले कारण: युक्रेन 24 ऑगस्ट रोजी सोव्हिएत रशियापासून मुक्त झाले

31 वर्षांपूर्वी 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेनने सोव्हिएत रशियापासून स्वातंत्र्य घोषित केले होते.

पुढील तीन स्लाईड्समध्ये जाणून घ्या रशियन साम्राज्यापासून युक्रेनच्या स्वातंत्र्याची रंजक कहाणी...

दुसरे कारण: 24 ऑगस्ट रोजी युक्रेनवरील रशियन हल्ल्याला 6 महिने पूर्ण होत आहेत

या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले होते. रशिया हे युद्ध एका आठवड्यात संपवेल असा विश्वास होता. मात्र 6 महिन्यांनंतरही रशिया पूर्व युक्रेनपुरताच मर्यादित राहिला आहे.

युद्धाच्या सुरुवातीला रशियाने राजधानी कीव्हच्या आसपासच्या परिसराचा ताबा मिळवला होता, परंतु एप्रिलपर्यंत युक्रेनने यातील जवळपास सर्व भाग पुन्हा ताब्यात घेतला होता. यानंतर रशियाने कीव्हकडेचा मोर्चा थांबवला.

रशियाने पश्चिमेकडील लेव्ह शहराच्या दिशेने काही क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, परंतु तेथे त्याला फारसे यश मिळालेले नाही.

रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमधील सर्वात भयंकर लढाया पूर्व युक्रेनमध्ये म्हणजे डोनबास प्रदेश आणि दक्षिण युक्रेनमध्ये झाल्या आहेत.

दक्षिण युक्रेनमधील झापोरिझिया पॉवर प्लांटच्या आसपास गेल्या अनेक दिवसांपासून रशियन आणि युक्रेनच्या सैन्यांमध्ये युद्ध सुरू आहे.

पूर्व युक्रेन म्हणजेच डोनबासच्या लुहांस्कवर रशियाने कब्जा केला आहे आणि डोनेट्स्कच्या दिशेने मोर्चा वळवला आहे.

डोनबास व्यतिरिक्त, रशियाचे एकमेव यश दक्षिणेकडील खेरसोन शहर ताब्यात घेण्यात आले आहे, जे युक्रेन पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या हल्ल्यापूर्वी, रशियाने क्रिमियासह युक्रेनच्या 7% भूभागावर नियंत्रण मिळवले होते. रशियाने आता युक्रेनचा सुमारे 22% भूभाग व्यापला आहे. तथापि, 2022 मध्ये सुरू झालेल्या युद्धात रशियाचे यश केवळ डोनबास क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिले आहे.

6 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात किती नुकसान झाले ते आता जाणून घेऊया…

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारी रोजी रशियाच्या हल्ल्यानंतर 10 दशलक्षाहून अधिक युक्रेनियन लोकांनी देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले आहेत कारण 18 ते 60 वयोगटातील युक्रेनियन नागरिकांना देशात राहण्यास आणि लढाईत सामील होण्यास सांगितलेले आहे.

रिपोर्ट्सनुसार, या युद्धामुळे रशियाचे सुमारे 300 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 24 लाख कोटी रुपये आणि युक्रेनचे 600 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 48 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

युक्रेनच्या दाव्यानुसार, युद्धात त्यांच्या 38,000 निवासी इमारती, 1900 शैक्षणिक संस्था नष्ट झाल्या आहेत. याशिवाय 50 रेल्वे पूल, 500 कारखाने आणि 500 रुग्णालये उद्ध्वस्त झाली आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमधील रुग्णालये, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर 296 रशियन हल्ले झाले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला का केला ते जाणून घेऊया?

स्वतंत्र होताच युक्रेनने रशियन प्रभावापासून मुक्त होण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी पाश्चात्य देशांशी जवळीक वाढवली. 2010 मध्ये रशिया समर्थित व्हिक्टर यानुकोविच युक्रेनचे अध्यक्ष झाले.

यानुकोविचने रशियाशी घनिष्ठ संबंध ठेवले आणि युक्रेनचा युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय नाकारला, ज्याला युक्रेनमध्ये तीव्र विरोध झाला. यामुळे व्हिक्टर यानुकोविचला 2014 मध्ये पायउतार व्हावे लागले होते.

त्याच वर्षी, पेट्रो पोरोशेन्को, जे युक्रेनचे अध्यक्ष झाले, त्यांनी युरोपियन युनियनशी करार केला. 2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमिया शहरावर हल्ला करून कब्जा केला होता.

डिसेंबर 2021 मध्ये, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोमध्ये सामील होण्याची घोषणा केली, ज्यामुळे रशिया संतप्त झाला. 24 फेब्रुवारी 2022 रोजी, युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याची शक्यता लक्षात घेऊन रशियाने युक्रेनवर हल्ला केला.

वास्तविक, युक्रेनची रशियाशी 2 हजार किलोमीटरहून अधिक मोठी सीमा जोडलेली आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटोचे सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल, अशी भीती रशियाला आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाची राजधानी मॉस्कोचे पश्चिमेकडील देशांपासूनचे अंतर 1600 किमी ऐवजी केवळ 640 किमी होईल.

बातम्या आणखी आहेत...