आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Russian Poison Name Vs Ukraine Viktor Yushchenko । Ricin Thallium, Dioxin, Novichok । Russias Poisons History

मंडे मेगा स्टोरी:रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्जाधीशावर विषप्रयोग; 101 वर्षांपासून विरोधकांना असेच संपवतोय रशिया

लेखक: आदित्य द्विवेदी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमधील रशियाच्या तांडवाला 39 दिवस पूर्ण झाले आहेत. सर्वत्र विध्वंसाचे दृश्य आहे. ना युक्रेन हार मानायला तयार आहे, ना रशिया माघार घ्यायला तयार आहे. असे असले तरी दोन्ही देशांमध्ये संवादाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अशीच एक शांतता चर्चा 3 मार्च रोजी कीव्ह येथे झाली. बैठकीनंतर मध्यस्थी करणारे रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच यांची प्रकृती अचानक बिघडली. डोळ्यासमोर अंधार पसरला होता, चेहऱ्याची आणि हाताची त्वचा सोलायला लागली होती. या लक्षणांमुळे त्यांना विषबाधा झाल्याचे दिसून आले.

ही बातमी येताच सर्व रशियाकडे बोट दाखवू लागले. रशियाने तत्काळ विष देण्याचे नाकारले असेल, परंतु असे हल्ले करण्याचा त्यांचा इतिहास आहे. कधी छत्रीला रिसिन लावून, कधी तांदळात डायऑक्सिन टाकून, कधी थॅलियम मिसळलेली कॉफी पाजून, तर कधी नोविचोक एजंट्सद्वारे.

मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांची अशाच रासायनिक विषाने रशिया विल्हेवाट लावतो. आजच्या मंडे मेगा स्टोरीमध्ये आम्ही रशियन विष आणि त्याच्या हल्ल्यांची संपूर्ण कथा सादर करत आहोत. काही चर्चित प्रकरणांपासून सुरुवात करूया...

बातम्या आणखी आहेत...