आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टझोपडीत राहणाऱ्याने नाकारली रतन टाटांची ऑफर:म्हणाला, आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी घासली, मला पैसे नको, काम हवे

नीरज झा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय 30. तो जन्मापासूनच गरिबीने त्रस्त. कुलाबा, मुंबईच्या झोपडपट्टीत घर आणि घरात वृद्ध आई, पत्नी तसेच 3 वर्षाचा मुलगा. शिडीच्या कडेला बांधलेली दोरी पकडून घरात चढलो नाही तर कधीही खाली पडण्याची भीती.

अशा परिस्थितीत मुंबईसारख्या महानगरात घर खरेदीसाठी उद्योगपती रतन टाटा यांच्याकडून बंद लिफाफ्यात सुमारे 70 लाख ते एक कोटी रुपयांचा धनादेश आला तर.... तो घेण्यास कोणी नकार देईल का...?

कदाचित तुम्ही म्हणाल, नाही. पण कलाकार नीलेश मोहिते यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. नीलेशने रतन टाटा यांना चेकच्या बदल्यात काम देण्यास सांगितले.

नीलेशची 8x8 ची खोली बघितली तर सर्वत्र फक्त पेंटिंग्ज दिसतात

मुंबईच्या ज्या ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीमध्ये नीलेशने 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते, जिथे फक्त करोडपती आणि अब्जाधीशच जाऊ शकतात.
मुंबईच्या ज्या ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीमध्ये नीलेशने 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते, जिथे फक्त करोडपती आणि अब्जाधीशच जाऊ शकतात.

बायकोसोबत बसलेले नीलेश जेव्हा क्रमवार त्यांची गोष्ट सांगू लागतात तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते.

ते म्हणतात की, गावात इतकी गरिबी होती की 2009 च्या सुमारास महाराष्ट्रातील रायगडहून मुंबईत आलो. पप्पांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात रोज भांडणे होत होती. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. मात्र, ते मनाने चांगले होते.

माझ्या आई आणि बहिणीसोबत मी कुलाब्याच्या मच्छिमार कॉलनीतील झोपडपट्टीत भाड्याने राहत होतो. वडिलांच्या नशेमुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली. पाण्यासोबत बिस्किटे खावून दिवस काढावे लागत होते.

घर चालवण्यासाठी आईने इतरांच्या घरी स्वयंपाक करणे, झाडू मारणे, भांडी धुणे ही कामे सुरू केली. या कष्टाचा परिणाम आईच्या शरीरावर झाला. तीची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे तीचे ऑपरेशन करावे लागले. डॉक्टर म्हणाले की, आता आईला काम सोडावे लागेल.

तेव्हा मी 9वीत होतो. घरात कमावणारे कोणी नव्हते. मी माझा अभ्यास सोडला. शालेय दिवसांपासून चित्रकलेचा छंद जोपासला होता. मला ते दिवसही आठवतात जेव्हा मी फळ्यावर खडूने रेखाटन करायचो. वर्ग बंक करून चित्रकलेचे प्रदर्शन पाहायला जायचा.

एकदा मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रसिद्ध कलाकार एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो, तिथून मला चित्रकलेचे व्यसन लागले.

आई आजारी पडल्याने शाळा सोडावी लागली. घर चालवण्यासाठी ऑफिस बॉय म्हणून काम करू लागलो. सकाळी काही तास हे काम केल्यानंतर दुसऱ्या कार्यालयात सुरक्षा रक्षक आणि शिपाई म्हणून काम करायचो. हे काही वर्षे चालले.

जेव्हा लोक म्हणाले की, मी अजून थोडे शिकायला हवे होते. त्यानंतर कामाबरोबरच पुढील शिक्षणासाठी मी रात्रशाळेत प्रवेश घेतला. मात्र, अनेकवेळा असे घडले की, पैसे कमवण्यासाठी ते क्लासही बुडवावे लागत होते.

नीलेश सांगतो, मला चित्रकलेची आवड होती, पण ऑफिस बॉय म्हणून काम केल्यामुळे चित्रकलेसाठी वेळ काढता येत नव्हता.
नीलेश सांगतो, मला चित्रकलेची आवड होती, पण ऑफिस बॉय म्हणून काम केल्यामुळे चित्रकलेसाठी वेळ काढता येत नव्हता.

त्यामुळे ऑफिस बॉयचे काम सोडून मी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागलो. रात्री येथे काम करायचे आणि दिवसा रंगकाम करायचे. हळूहळू चित्रकला माझी आवड बनली. त्यात मी एवढा प्रवीण झालो की मी राजे-महाराजावांची चित्रे काढायला सुरुवात केली.

एका संध्याकाळची घटना आहे. हॉटेलमध्ये एका ग्राहकाला चहा देत असताना मी ट्रेमध्ये ठेवलेल्या पेपर नॅपकिनवर समोर बसलेल्या ग्राहकाचे रेखाटन करू लागलो. हॉटेलच्या सुपरवायझरने मला पाहिल्यावर तो ओरडतच आला. मला शिव्या देऊ लागला म्हणाला- तुला ह्यासाठी पैसे मिळतात का?

पण जेव्हा त्याने माझे रेखाटन पाहिले तेव्हा तो थक्क झाला. तो म्हणाला की, मी तुला काही मोठ्या लोकांशी ओळख करून देतो. तुम्ही उत्तम चित्रे बनवू शकता. तुम्ही त्यांची विक्रीही करू शकता.

इथून माझ्या छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले. हळूहळू चित्रकलेच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या.

आता नीलेशची रतन टाटा यांच्या भेटीची कहाणी…

मी रतन टाटा यांच्यापासून खूप प्रेरित आहे. 2017 हे वर्ष होते. मी रतन टाटा यांची काही पेंटिंग्ज बनवली होती, जी मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यायची होती.

कित्येक महिने आठवड्यातून दोन-तीन दिवस त्याच्या बंगल्याबाहेर जाऊन उभा असायचाे. टाटा निघताना गाडीत बसलेले मला दिसले. थेट त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग नव्हता. माझी एक ओळखीची व्यक्ती टाटांच्या बंगल्यावर जायची. मी त्याला माझी टाटाशी ओळख करून देण्यास सांगितले. दादा म्हणाले येत्या काही दिवसात 28 डिसेंबरला सरांचा बर्थडे आहे त्या दिवशी मी तुला कसं घेऊन जाता येइल यांचा मी प्रयत्न करतो.

रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त नीलेश पहिल्यांदा भेटायला गेले होते. ते म्हणतात, मी माझ्यासोबत टाटांची पेंटिंगही घेतली होती. टाटांनी पेंटिंग पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला.
रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त नीलेश पहिल्यांदा भेटायला गेले होते. ते म्हणतात, मी माझ्यासोबत टाटांची पेंटिंगही घेतली होती. टाटांनी पेंटिंग पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला.

28 डिसेंबरला 2017 ला मी दादांसोबत साहेबांना पहिल्यांदा भेटलो तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता टाटा सरांना ज्यावेळेस ते पेंटिंग दाखवलं. त्यावेळी टाटा सरांनी माझे खूप प्रशंसा केली माझ्या पाठीवर शाबासकी दीली व म्हणाले खूप छान काढले आहेस हे तु कसं केलेस मी म्हणालो गुगलमधून फोटो कॉपी करून केला आहे, त्यानंतर सरांना मी चार वेळा भेटलो,

28 डिसेंबर 2018 मध्ये मी टाटा सरांना मी भेटलो. त्यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून 6×6 फूट ची पेंटिंग घेऊन गेलो त्यांना ती दाखली तिच्यामध्ये असलेला अर्थ प्राचीन कालीन राजा कशा पद्धतीने जगायचे आणि त्यांच्या जीवनाची वाटचाल प्रजा कशी जगायची याबद्दल सरांना थोडक्यात स्पष्टीकरण दिले. सर खूप खूश झाले आणि मला म्हणाले युवर ग्रेट आर्टिस्ट हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा अचीव्हमेंट, आवॉर्ड सारखा आहे,

त्यावेळी सरांना मी सहज बोलून गेलो, सर ही पेंटिंग बनवण्यासाठी मला खूप त्रास झाला कारण माझे घर 10×10चे आहे त्यामध्ये बाथरूम, किचन, 1 कबाट आणि घरच्या काही इतर वस्तू आणि जागा उरायची 4×6 ची यामुळे रोल करून थोडी थोडी पेंटिंग करायचो,

मला माहिती नव्हते हे सर पुढे विचारपूस करतील सर म्हणाले तू कुठे राहतोस , फॅमिली मध्ये कोण कोण आहेत, जे काय परिस्थिती आहे ते सांगितले असता सर म्हणाले निलेश तू मला उद्या येऊन भेट, दुसऱ्या दिवशी मी गेलो सर बिझी होते. आणि चौथ्या दिवशी सर मला भेटले सर म्हणाले निलेश मी तुला काही देऊ इच्छितोय जेणेकरून तु मुंबईमध्ये कुठे घर घेऊ शकतोस .तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

हे ऐकताच मी सरांचे पाय पकडले आणि सरांना बोललो सर मला चुकीचं समजू नका पण हे जे पेंटिंग मी तुम्हाला दिला आहे हे बर्थडे चे गिफ्ट आहे. आणि त्याचे मी पैसे घेऊ शकत नाही तुम्हाला मला मदत करायची आहे तर मला पेंटिंगची काम द्या आणि जो पैसा तुम्ही द्याल तो मी नक्कीच घेईन.

सर मला काम देणारच होते पण त्याआधी लॉकडाऊन लागले.
यामुळे 2.5 वर्ष त्यामध्ये गेली2.5 वर्षानंतर सरांना मी कॉन्टॅक्ट केले सर म्हणाले निलेश मै आपका एक्जीबिशन ताज हॉटेल में लगाना चाहता हु ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, विचारांच्या पलीकडे, सरांना मी थँक्यू बोलून पुढच्या पेंटिंग च्या तयारीत लागलो. पण त्यासाठी आर्ट मटेरियल हे आणणार कुठून म्हणून मी माझी ताई ज्योती बडेकर यांना कॉन्टॅक्ट केले आणि ताईंनी चार लाखाची मला मदत केली.

हे जणू स्वप्नच..
त्यामधून दोन महिने दिवस रात्र काम करून मी 19 पेंटिंग तयार केल्या. त्याचबरोबर काही गोष्टींसाठी मला मर्जी पारख सरांनी खूप मदत केली.
जे काही चालले आणि जे काही होणार आहे हे जणू स्वप्नच आहे. हे मला जाणवत होते. कारण ताज हॉटेलच्या बाहेरचा पॅसेज जो रोडला टच आहे, तिथूनही जाण्यासाठी मला भीती वाटायची. कारण तिथल्या सेक्युरिटी गार्ड ने कधी हाकलले तर...ही भिंती असायची

मी एक झोपडपट्टी मधला...
पण ज्यावेळी माझे आर्ट एक्जीबिशन ताज आर्ट गॅलरीमध्ये लागले. तिथला स्टाफ मग तो सफाई कामगार, असो वेटर असो या मॅनेजर त्यांनी कधीही मला अशी जाणीव होऊ दिली नाही की मी एक झोपडपट्टी मधला आहे. खूप खूप सपोर्ट केला मला

खरंतर टाटा साहेबांचे संस्कार हे पूर्ण टाटा फॅमिलीमध्ये रुतलेले आहेत. याचं जिवंत उदाहरण मला ताज हॉटेल पॅलेसमध्ये जाणवलं. ताज हॉटेल पॅलेस मधले प्रत्येक क्षण, आठवणी, हे माझ्या जीवनातले खूप मोठं क्षण आहेत.

'रतन'जी टाटा सरांनी माझ्यावर जो विश्वास , आणि जो प्लॅटफॉर्म मला दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन

बातम्या आणखी आहेत...