आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sakshi From Rajasthan Was Searching For Malik's Caste, AP Telangana Maharashtra Bihar Are Trying Their Best To Know The Caste Of PV Sindhu; News And Live Updates

जाता जात नाही:इंटरनेटवर पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकची जात शोधत आहेत लोक, महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आघाडीवर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुगलवर 2016 पासून सिंधूची शोधली जात आहे 'जात'

जगप्रसिद्ध कवी, नाटककार आणि साहित्यकार विल्यम शेक्सपिअरने 'नावात काय ठेवलं आहे' असं म्हटलं होतं. परंतु, आता 'जातीत काय ठेवलं आहे' असं म्हणायची पाळी आली आहे. कारण सध्या गुगल ट्रेंडमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूची जात शोधली जात आहे.

गुगलवर कोण काय शोधत आहे? सध्या काय ट्रेंड होत आहे याची संपूर्ण माहिती trends.google.com यावर मिळते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने 1 ऑगष्ट रोजी कांस्यपदक जिंकल्यानंतर लोकांनी pv sindhu caste गुगलवर शोधायला सुरुवात केली आहे.

'हे' राज्य आहेत आघाडीवर
सोशल मीडिया वापरकर्त्यांचे आरोप आहे की, पी. व्ही. सिंधूने पदक जिंकल्यानंतर ती कोणत्या प्रतिस्पर्धीसोबत पदक जिंकली. त्याची लाईफ स्टाईल काय आहे? तीचे गुरु कोण? तीने कसे संघर्ष केले यापेक्षा तीची जात काय? हे जाणून घेण्यात लोकांना सर्वात कमी जास्त रस आहे. पी. व्ही. सिंधूची जात शोधण्यात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, अरुणाचल प्रदेश राज्य आघाडीवर आहेत.

Google कीवर्डचा शोध 0 ते 100 दरम्यान मोजतो. सिंधूची जात पहिल्यांदा ऑगस्टमध्ये शोधली गेली आणि 100 च्या प्रमाणात पोहोचली. म्हणजेच तो टॉप ट्रेंडमध्ये होता.
Google कीवर्डचा शोध 0 ते 100 दरम्यान मोजतो. सिंधूची जात पहिल्यांदा ऑगस्टमध्ये शोधली गेली आणि 100 च्या प्रमाणात पोहोचली. म्हणजेच तो टॉप ट्रेंडमध्ये होता.

गुगलवर 2016 पासून सिंधूची शोधली जात आहे 'जात'
गुगलवर सर्वप्रथम पी व्ही सिंधूची जात 2016 मध्ये शोधण्यात आली होती. यावेळी सिंधूने रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. परंतु, 1 ऑगष्टनंतर यामध्ये 90 टक्के वाढ झाली आहे. हे आपल्याला गुगल ट्रेंडच्या काही ग्राफवरुन लक्षात येईल.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताच लोक साक्षीची जात शोधू लागले.
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताच लोक साक्षीची जात शोधू लागले.

हे कीवर्ड करत आहे सर्च
पी व्ही सिंधूची जात शोधण्यासाठी लोक वेगवेगळे कीवर्डचा वापर करत आहे. लोकांना तीची जात जाणून घेण्याबाबत खूप मोठी उत्सुकता लागली आहे. लोक pv sindhu caste, pusarala caste आणि pusarala surname caste असे कीवर्ड टाकून जात शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...