आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरराऊतांकडे 11 लाख तर अर्पिताकडे 50 कोटी:कायद्यानुसार किती रक्कम आणि सोने घरात ठेवता येते? वाचा सविस्तर

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या एका आठवड्यातील 3 बातम्या वाचा...

1. अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने सुमारे 50 कोटी रक्कम आणि 6 किलो सोने जप्त केले आहे.

2. पश्चिम बंगालमधून काँग्रेसच्या 3 आमदारांना 49.8 लाख रुपयांसह ताब्यात घेण्यात आले.

3. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकून ईडीने 11 लाखांची रक्कम जप्त केली.

सरकारी यंत्रणांच्या या छाप्यांमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – आपण घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो? आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये कायदा आणि तज्ञांशी चर्चा करून या प्रश्नांची उत्तरे देत आहोत…

सगळ्यात आधी रोख रकमेविषयी:

कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात हवी तितकी रक्कम ठेऊ शकतो, परंतु या रकमेची अधिकृत माहिती असणे आवश्यक आहे. समजा तुमच्या घरात 5 कोटी रुपये ठेवले आहेत आणि तपास यंत्रणांनी छापा टाकला तर अशा परिस्थितीत तुम्हाला या रकमेशी संबंधित अधिकृत पुरावे दाखवावे लागतील.

तपासादरम्यान तुम्ही तुमच्या घरातून जप्त केलेल्या रकमेची अधिकृत माहिती न दिल्यास, तुम्हाला 137% पर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या म्हणजेच CBDT च्या 26 मे 2022 पासून देशात लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, एक व्यक्ती एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करू शकत नाही.

आता सोन्याविषयी:

सोन्याला पैशाप्रमाणेच महत्त्व आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कितीही सोने घरात ठेवू शकता.मात्र जितके सोने आहे त्याची अधिकृत माहिती आणि पुरावे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

घरात जास्त सोने असल्यास कोणती कागदपत्रे दाखवावी लागतील?

जर तपास यंत्रणेने घरातून जास्त प्रमाणात सोने जप्त केले, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 132 नुसार, आयटी अधिकार्‍यांना त्याची अधिकृत माहिती विचारण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत, प्रामुख्याने 3 प्रकारांपैकी कोणतीही कागदपत्रे दाखवावी लागतात.

पहिले: तुम्ही सोने खरेदी केले असेल तर तुम्हाला त्यासंबंधीची कागदपत्रे दाखवावी लागतील.

दुसरे: कुटुंबाकडून सोने मिळाल्यास कौटुंबिक सेटलमेंटशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतात.

तिसरे: जर तुम्हाला भेटवस्तूमध्ये सोने मिळाले असेल, तर त्याच्याशी संबंधित गिफ्ट डीड दाखवावे लागेल.

सुवर्ण नियंत्रण कायदा 32 वर्षांपूर्वी रद्द

स्वातंत्र्यानंतर, देशात एखादी व्यक्ती त्याच्याकडे किती सोने ठेवू शकते यासाठी 1968 सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने घरात ठेवण्यावर या कायद्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. 1990 नंतर, हा कायदा रद्द करण्यात आला आणि लोकांना अधिकृत माहितीसह कितीही सोने बाळगण्याची मुभा देण्यात आली.

अधिकृत पुरावा नसतानाही घरात सोने ठेवता येते का?

भारतीय समाजात लग्नापासून प्रत्येक सणात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत कोणताही कागद किंवा पुरावा नसतानाही ठराविक प्रमाणात सोने घरात ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. जाणून घेऊया सरकारी नियमानुसार किती सोने ठेवता येते...

  • विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते.
  • अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेवू शकते.
  • विवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने ठेवू शकतात.
  • अविवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतात.

बेकायदेशीर सोने किंवा रोख रक्कम आढळल्यास तपास यंत्रणा काय कारवाई करतात?

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील विराग गुप्ता यांचे म्हणणे आहे की, प्राप्तिकर विभाग, कस्टम विभाग आणि ईडी या तिन्ही तपास यंत्रणांना वेगवेगळ्या कायद्यांतर्गत बेकायदेशी किंवा अवैध सोने, मालमत्ता किंवा पैसा जप्त करण्याचा अधिकार आहे.

  • ईडीबद्दल बोलायचे झाल्यास मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 म्हणजेच PMLA अंतर्गत बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचा ईडीला अधिकार आहे.
  • सीमाशुल्क विभागाच्या बाबतीत, सीमाशुल्क कायद्यांतर्गत, तस्करीतून मिळवलेले पैसे किंवा मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.
  • जर आयकर विभाग असेल तर प्राप्तिकर कायद्यानुसार मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.

जर तुमच्या घरात ज्याची तुमच्याकडे अधिकृत माहिती किंवा पुरावा नाही असे सोने किंवा रोख रक्कम सापडल्यास तर कोणत्या कायद्याद्वारे कारवाई होऊ शकते याबद्दल जाणून घेऊ.. यासह खाली दिलेल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून कर चुकवणे आणि मनी लाँड्रिंग संबंधित कायद्याबद्दल देखील जाणून घ्या...

जप्त केलेल्या रकमेचे आणि सोन्याचे काय होते?

सर्व प्रथम, जप्त केलेल्या रोख रकमेचा पंचनामा केला जातो. एकूण किती रक्कम जप्त करण्यात आली, 200, 500 किंवा इतर किती नोटा आहेत, असे पंचनाम्यात नमूद केले जाते.जप्त केलेल्या नोटांवर काही खुणा किंवा काहीही लिहिलेले असल्यास ते तपास यंत्रणेकडे जमा केले जाते, जेणेकरून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येईल.

जप्त केलेली रक्कम पुरावा म्हणून आवश्यक नसल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या मान्यतेनंतर ती रक्कम बँकेत जमा केली जाते, असे विराग सांगतात. तपास यंत्रणा जप्त केलेली रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केंद्र सरकारच्या खात्यात जमा करतात.काही वेळा काही रक्कम तापासाठी ठेवण्याची गरज भासते, तर तपास यंत्रणा अंतर्गत आदेशाने खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते स्वतःकडे जमा ठेवतात.

तसेच पुरावे दाखवले नाही तर तपास यंत्रणा जे सोने जप्त करते त्याचा आधी पंचनामा केला जातो. त्यानंतर ते विभागीय कोठडीत किंवा सरकारच्या तिजोरीत जमा केले जाते.

ईडीने 6 वर्षांत किती छापे टाकले ते जाणून घ्या...

घरात बेकायदेशीर रोख रक्कम आणि सोने सापडल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद

2005 मध्ये PMLA कायदा 2002 संपूर्ण देशात लागू करण्यात आला. या कायद्यात आतापर्यंत 3 वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 3 वर्षापासून 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. एवढेच नाही तर यंत्रणा या कायद्यानुसार आरोपींची मालमत्ता जप्त करू शकतात.

फेमा कायद्यानुसार दोषी आढळल्यास, काही प्रकरणांमध्ये 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. याशिवाय बेकायदेशीर मालमत्ता आढळल्यास तिप्पट दंड होऊ शकतो.

आयकर कायदा 1961 अंतर्गत, दोषींकडून त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जप्त झाल्यास 4 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास हे देखील जाणून घ्या की जगातील एकूण सोन्यापैकी 11% सोने भारतीय महिलांकडे आहे. चीन आणि अमेरिकेतील महिलांकडे किती सोने आहे ते खाली दिलेल्या ग्राफिक्समध्ये पहा...

बातम्या आणखी आहेत...