आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरसौदीत 10 दिवसांत 12 जणांचा शिरच्छेद:मृतांपैकी 3 पाकिस्तानी; भारतात या गुन्ह्यासाठी फक्त 6 महिन्यांची शिक्षा

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 नोव्हेंबर 2022 रोजी सौदी अरेबियात गुलजार खान नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीचा शिरच्छेद करण्यात आला. या आठवड्यातील गुलजार हा तिसरा पाकिस्तानी व्यक्ती होता, ज्याला सौदीमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. गेल्या 10 दिवसांत येथे 12 जणांचा शिरच्छेद करून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

आज दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये जाणून घेऊया की, सौदी अरेबियामध्ये कोणत्या आरोपांत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, त्याची पद्धत किती भयानक आहे? यासोबतच जाणून घेऊया की या आरोपांसाठी भारतात काय शिक्षा आहे?

आधी जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?

1 सप्टेंबर 2022 रोजी, सौदी अरेबिया पोलिसांनी रियाधमधील एका गोदामातून 4.60 कोटी नशेच्या गोळ्यांसह 8 लोकांना अटक केली. यातील 2 लोक पाकिस्तानचे आणि 6 सीरियाचे होते. यावर सौदी प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

त्यानंतर दोन महिन्यांनी गुलजार खानसह 12 जणांविरुद्ध अनेक प्रकरणांत येथील सुप्रीम कोर्टात खटला चालवला गेला. 14 नोव्हेंबर रोजी, न्यायालयाने त्यांना बंदी घातलेल्या औषधांच्या तस्करीप्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

सौदी अरेबियाच्या प्रेस एजन्सीनुसार, मृत्युदंड सुनावण्यात आलेल्यांमध्ये 3 पाकिस्तानी, 4 सीरियन, 2 जॉर्डन आणि 3 सौदी नागरिकांचा समावेश आहे.

वास्तविक, शरिया कायदा आणि इस्लामिक कायद्यानुसार, येथे कोणत्याही प्रकारचा नशेचा पदार्थ ठेवणे किंवा खरेदी आणि विक्री करणे गुन्हा आहे. सौदीमध्ये अशा आरोपांत दोषी ठरल्यास मृत्यूदंडाची शिक्षा आहे.

शरियामुळे सौदीमध्ये कडक कायदा

ब्रिटन सरकारने आपल्या अधिकृत वेबसाइटवरील ट्रॅव्हल अॅडव्हायझरीत म्हटले आहे की सौदी अरेबिया जगातील सर्वात कठोर कायदे असलेल्या देशांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे येथे शरिया कायद्याची अंमलबजावणी हे आहे.

शरिया कायद्यातील प्रत्येक शब्दाला धार्मिक महत्त्व आहे, असे सौदी प्रशासनाचे मत आहे. येथील शरिया कायद्यात देवाच्या हवाल्याने अनेक कायद्यांनुसार शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत येणारे गुन्हे थेट देवाची अवहेलना करणारे मानले जातात. शरिया कायद्यात जीवन जगण्याचा मार्ग सांगण्यात आला आहे. या कायद्यांनुसार सर्व मुस्लिमांनी आपले जीवन जगणे अपेक्षित आहे.

एका मुस्लीमाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट, म्हणजेच त्याने केव्हा काय करावे आणि काय नाही याचा मार्ग शरिया कायदा आहे. शरियामध्ये कुटुंब, वित्त आणि व्यवसायाशी संबंधित कायदे समाविष्ट आहेत.

मद्यसेवन, नशेच्या पदार्थांचा वापर किंवा तस्करी करणे हा येथील शरिया कायद्यानुसार सर्वात मोठा गुन्हा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हा कायदा मोडते तेव्हा तो देवाविरूद्ध गुन्हा मानला जातो. यामुळेच या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेचे नियम आहेत.

आता ग्राफिकमधून जाणून घ्या सौदी अरेबियामध्ये कोणत्या आरोपात दोषींना मृत्यूदंड दिला जातो...

आता जाणून घ्या सौदी अरेबियाशिवाय जगाती कोणत्या देशांत प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मृत्यूदंड दिला जातो...

सौदी अरेबियात गेल्या 5 वर्षांत किती लोकांना मृत्यूदंड देण्यात आला...

सौदी अरेबियाच्या कायद्यात तीन प्रकारे मृत्यूदंड दिला जातो

सौदी अरेबियामध्ये शरियाच्या हुदुद कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. येथे ताजिर कायद्यात मृत्यूदंडाच्या शिक्षा देण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्यानुसार 3 प्रकारे मृत्यूदंड दिला जातो...

1. धारदार शस्त्राने धडापासून शीर वेगळे करणे

2. फासावर लटकवून

3. गोळी मारून

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सौदीमध्ये गोळीबार करून मृत्यूदंडाची शिक्षा केवळ विशेष प्रकरणांमध्येच दिली जाते. येथे मृत्यूदंडासाठी ही पद्धत वापरली जाते-

  • सर्वप्रथम, ज्या स्त्रीला किंवा पुरुषाला फाशीची शिक्षा झाली आहे, डॉक्टर त्याच्या आरोग्याची तपासणी करतात.
  • यानंतर त्याला न्यायालयाच्या प्रांगणात किंवा ज्या चौकात मृत्यूदंड दिला जाणार आहे तेथे नेले जाते.
  • मग ज्याला मृत्यूदंड द्यायचा आहे तो तिथेच गुडघ्यावर बसतो.
  • यानंतर एक प्रशासकीय अधिकारी तेथे उपस्थित लोकांना त्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यांची माहिती देतो.
  • शेवटी, मृत्यूदंड देणारा, ज्याला सुलतान म्हणतात, तो धारदार शस्त्राने गुन्हेगाराचे डोके धडापासून वेगळे करतो.

सौदी अरेबियामध्ये ज्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाते त्या गुन्ह्यांसाठी भारतात काय शिक्षा आहे?

सौदी अरेबियामध्ये अमली पदार्थ बाळगणे आणि तस्करी हे गंभीर गुन्हे मानले जातात. तुमच्याकडे 2 ग्रॅम अफू किंवा हेरॉईन जरी सापडले तरी त्याची शिक्षा मृत्युदंडच आहे. प्रतिबंधित अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करणे याबाबत भारतात वेगवेगळे कायदे आहेत.

भारतात, जर तुमच्याकडे हेरॉईन किंवा अफूचे थोडेसे प्रमाण आढळले, तर न्यायालय तुम्हाला 6 महिने तुरुंगवास आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड करू शकते. त्याचबरोबर बंदी असलेला पदार्थ जास्त प्रमाणात आढळल्यास 10 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, परंतु अशा प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची तरतूद नाही.

आता ग्राफिक्समध्ये पहा भारतात प्रतिबंधित ड्रग्सची तस्करी करणाऱ्याला किती शिक्षा होऊ शकते...

आता शेवटी जाणून घ्या मृत्यूदंडाच्या बाबतीत सौदीच्याही पुढे कोणता देश आहे...

बातम्या आणखी आहेत...