आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • School Boys And Girls Of Kerala Will Wear The Same Dress; Know What Is Gender Neutral Uniform And Why The School Took This Decision

एक्सप्लेनर:शाळेत आता मुले आणि मुली एकसारखा गणवेश घालतील; कसा असेल केरळचा जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म? जाणून घ्या

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

"हे काय मुलांसारखे कपडे घातले आहेत?" जर एखाद्या मुलीने जीन्स-शर्ट घातले असेल तर तुम्ही हे शब्द नक्कीच कधीतरी ऐकले असतील. अनेकदा 'मुलींसारखे' कपडे घातले का? असे असे मुलांबद्दलही ऐकायला तुम्हाला मिळाले असेल.

आता मात्र केरळमधील शाळेतील मुला-मुलींसाठी हे शब्द कोणीही वापरू शकणार नाही. या शाळेने मुला-मुलींसाठी एकसमान ड्रेस लागू केला आहे. शाळेच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये लैंगिक समानतेचा मुद्दा समजून घेण्याचा विचार शाळेमध्येच रुजणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

समजून घ्या, संपूर्ण प्रकरण काय आहे? शाळेने हे पाऊल का उचलले? जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म म्हणजे काय? आणि जगभरातील शाळांमध्ये लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणखी कोणते उपक्रम घेतले जात आहेत?, जाणून घेऊया...

सगळ्यात आधी जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे?
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील वलयंचिरंगरा येथे एक सरकारी शाळा आहे. या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी जेंडर न्यूट्रल यूनिफॉर्म सादर केला आहे. जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म, म्हणजेच एक असा गणवेश जो मुले आणि मुली दोघेही परिधान करू शकतात. शाळेने आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शर्ट आणि 3/4 शॉर्ट्स गणवेश निर्धारित केला आहे. म्हणजेच मुलगा किंवा मुलगी दोघेही आता शर्ट आणि शॉर्ट्स घालूनच शाळेत जातील.

कधी घेण्यात आला होता हा निर्णय...
केरळमधील शाळेने 2018 मध्ये सुमारे 200 पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी न्यूट्रल ड्रेस कोड लागू केला होता. पुढील वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ड्रेस कोड लागू करण्याची योजना होती, परंतु कोरोनामुळे शाळा बंद पडल्याने हे काम होऊ शकले नाही. लॉकडाउननंतर शाळा पुन्हा सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ड्रेस कोड लागू करण्यात आला.

सध्या शाळेत एकूण 746 विद्यार्थी आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांची संमती घेण्यात आली होती. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही खूश असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

नुकतेच केरळमधील एका महाविद्यालयाने एका महिला प्राध्यापिकेला साडी नेसून महाविद्यालयात येण्यास सांगितले होते. प्राध्यापिकेने तसे करण्यास नकार दिला. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर केरळच्या उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी करून महिलांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते.

आता समजून घेऊया शाळेने हा निर्णय का घेतला?
वास्तविक स्त्री-पुरुष समानतेच्या अंतर्गत होत असलेल्या प्रयत्नांचा हा एक छोटासा भाग आहे. लैंगिक समानता म्हणजे लिंग समानता. या उपक्रमांतर्गत स्त्री-पुरुषांमधील लिंगाच्या आधारे होणारा भेदभाव संपुष्टात येणार आहे.

सध्या शाळांमध्ये मुले-मुली वेगवेगळे कपडे घालतात. वेगवेगळे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसून शारीरिक स्वरूप आहे.

मुलींच्या वेगवेगळ्या ड्रेस कोडमुळे त्यांना चालणे, काम करणे कठीण होते. हे लैंगिक असमानतेचेही प्रतीक आहे. यासाठी जेंडर न्यूट्रल ड्रेस कोडची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. याला पुढे नेत शाळेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कौतुक करताना केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवकुट्टी यांनी म्हटले आहे की, लैंगिक समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला आणखी अशा प्रयत्नांची गरज आहे.

हा फोटो केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवकुट्टी यांनी ट्विट केला आहे.
हा फोटो केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवकुट्टी यांनी ट्विट केला आहे.

लैंगिक समानता वाढवण्यासाठी शाळांमध्ये आणखी कोणते उपक्रम घेतले जात आहेत?
लैंगिक समानतेची समज शाळेतूनच मुलांमध्ये रुजवली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जगभरातील विविध शाळांमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स

जगभरातील शाळांमध्ये जेंडर न्यूट्रल टॉयलेटही सुरू करण्यात येत आहेत. जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स, म्हणजेच तीनही लिंगांच्या मुलांना वापरता येणारी शौचालये. शाळांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणीही अशी स्वच्छतागृहे बसवली जात आहेत.

जेंडर सेंसिटिव्ह सिलॅबस
अनेक देश त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करून जेंडर सेंसिटिव्ह वर काम करत आहेत. यामध्ये अभ्यासक्रमातील बदलांपासून ते शिक्षकांच्या प्रशिक्षणापर्यंतच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की लिंग समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमातही बदल केले जातील.

पीरियड बॉक्स

जरी हा उपक्रम भारतातील निवडक शाळांनीच राबवला असला तरी हा एक यशस्वी उपक्रम मानला जातो. त्याअंतर्गत शाळांमध्ये पीरियड बॉक्स बसवण्यात आले. पीरियड्स दरम्यान वापरलेले सॅनिटरी पॅड आणि नॅपकिन या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. यासोबतच शाळांमध्ये पीरियड आणि त्यासंबंधित प्रश्नांवर प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कंसेंट क्लासेस
सर्वप्रथम केनियामधील विद्यार्थ्यांसाठी कंसेंट क्लासेस आयोजित केले गेले. त्यानंतर अनेक देशांनी यासाठी पुढाकार घेतला. अशा वर्गांमध्ये मुलींना कंसेंट क्लासेसचा अर्थ समजावून सांगण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...