आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर डेटा स्टोरी:कोरोनामुळे 29 कोटी भारतीय मुलांचे शिक्षण सुटले, मुलांच्या पोषणापासून ते कमाईपर्यंत भविष्यात दिसून येतील परिणाम

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

भारतात कोरोनामुळे 29 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. त्यापैकी 13 कोटी मुली आहेत. UNESCO च्या मते, भारतातील एकूण शाळा सोडणाऱ्या मुलींपैकी निम्म्याहून अधिक मुली शाळेत परतत नाहीत. कोरोनामुळे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील 11 कोटींहून अधिक मुले अजूनही शालेय शिक्षणापासून दूर आहेत. जगातील एकूण विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण 7.5% आहे.

कोरोनामुळे जगभरातील शाळा सरासरी 4.5 महिने बंद होत्या. याचा परिणाम मुलांच्या पोषणावर आणि त्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर देखील होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतासह जगातील कोणत्या देशात किती दिवस शाळा बंद होत्या? त्यामुळे किती मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला? आणि त्याचा परिणाम भविष्यात कुठे-कुठे दिसेल? हे जाणून घेऊया...

प्रथम भारताची स्थिती समजून घेऊ
कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर मार्च 2020 मध्ये भारतातही शाळा बंद करण्यात आल्या होत्या. भारतातील शाळा गेल्या 18 महिन्यांपासून बंद आहेत. या कालावधीत शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी, डिजिटल डिव्हाईड आणि इतर कारणांमुळे ऑनलाइन वर्गांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोटोकॉलसह शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

भारत हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे शाळा सर्वात जास्त काळ बंद आहेत. शाळा बंद झाल्यामुळे 29 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यामध्ये 14 कोटी मुली आणि 15 कोटी मुले आहेत. यापैकी सर्वाधिक 13 कोटी मुले माध्यमिक शाळांमध्ये आहेत.

भारतात अर्ध्यावर शाळा सोडणाऱ्यांची संख्या अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक आहे. अरुणाचल प्रदेशातील स्कूल डॉपआउट रेट 34.3 आहे, जे देशात सर्वाधिक आहे. त्याच वेळी, ते पंजाबमध्ये सर्वात कमी (1.6) आहे. ही आकडेवारी 2019-20 सत्रातील आहे. लॉकडाऊननंतर हे आकडे वाढले आहेत. त्रिपुरा, आसाम, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँडमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट रेट 25% पेक्षा जास्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...