आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • School News; Lockdown Impact On School Students Learning | Report From Madhya Pradesh Bhopal Hoshangabad

शाळा लॉक, अभ्यास डाउन:ऑनलाइन क्लासला आता मुले वैतागली; बर्‍याच कुटुंबांना घ्यावे लागले स्मार्टफोनसाठी कर्ज, तर अनेकांचे शिक्षण थांबले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाइन क्लासमुळे मुलांमध्ये मानसिक ताण वाढतो, पालक देखील काळजीत

कोरोनामुळे देशभरातील शाळा बंद आहेत. मुले जवळपास एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतेक मुले अशीही आहेत जी ऑनलाइन क्लासपर्यंत पोहोचू शकली नाहीत. अनेक मुलांजवळ स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन नाही. ग्रामीण भागात वीज कनेक्शनचा अभाव हे देखील यामागील एक मोठे कारण आहे, ज्यामुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासन वंचित राहिली आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार लॉकडाउनमुळे भारतातील 32 कोटी 7 लाखांहून अधिक मुले शिक्षणापासून दूर गेली आहेत.

अशा परिस्थितीत, एक वर्षापेक्षा जास्त काळ चालू असलेल्या या ऑनलाइन वर्गात मुले आनंदी आहेत का? या व्हर्च्युअल अभ्यासानुसार मुलांच्या वागण्यात काही बदल झाले आहेत का? याचा परिणाम मुलांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर झाला आहे का?, असे अनेक प्रश्न पडतात.

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भास्करने भोपाळच्या 6 मुलांशी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बातचीत केली. यापैकी दोन कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तर दोन मध्यमवर्गीय आणि दोन आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आहेत.

ऑनलाइन क्लासमुळे मुलांमध्ये मानसिक ताण वाढतो, पालक देखील काळजीत

मान्या दहावीची विद्यार्थिनी आहे. तर पृथ्वी जोशी बारावीत शिकत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे या दोघांवर परिणाम झाला आहे.
मान्या दहावीची विद्यार्थिनी आहे. तर पृथ्वी जोशी बारावीत शिकत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे या दोघांवर परिणाम झाला आहे.

मुलांच्या आयुष्यात क्लासरुम आणि ब्लॅकबोर्डची जागा आता संगणक आणि लॅपटॉपने घेतली आहे. भोपाळच्या नामांकित शाळेत दहावीत शिकणारी मान्या या नव्या जीवनशैलीमुळे फारशी खूष नाही. शाळा आणि मित्रांची आठवण काढताना मान्या सांगते, “जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा तिथे डान्स करायचो, तिथे आमचा पेटिंग आणि म्युझिक क्लास असायचा. ऑनलाईन वर्गातही हे सर्व असतं, परंतु त्यात ती मजा नाही. ऑनलाइन क्लासेसमुळे असाइनमेंटचा मानसिक दबाव देखील वाढला आहे. 'व्हर्च्युअल क्लास'चे हे सेटअप वास्तविक वर्गापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे, अॅप वापरताना शिक्षकांना बर्‍याचदा समस्यांचा सामना करावा लागतो. ऑपरेट करणेही अवघड जाते.'

दुसरीकडे, इयत्ता 12 वी मध्ये शिकणारा अर्थव जोशी मात्र व्हर्च्युअल क्सामध्ये मिळणा-या कम्फर्टमुळे आनंदी आहे. मात्र शालेय जीवनाचे शेवटचे वर्ष खराब झाल्याची खंत त्याला वाटते. शहरातील बागसेवनिया भागात राहणारा अर्थव म्हणतो, “व्हर्च्युअल क्लासने मला खूप दिलासा दिला आहे. यात अभ्यास ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात केला जातो, ज्याच्या मदतीने कोठूनही आणि कधीही अभ्यास केला जाऊ शकतो. परीक्षेच्या वेळी रिव्हिजनमध्येही मदत होते, परंतु कोरोनामुळे यावर्षी आमचे गेम्स, स्पोर्ट्स, इव्हेंट्स काहीही होऊ शकले नाहीत.'

ऑनलाईन अभ्यास करणे केवळ मुलांसाठीच नाही तर पालकांसाठीदेखील आव्हानात्मक आहे. अर्थवची आई अपर्णा मुलांच्या वागण्यात बदल झाल्याने नाराज आहेत. त्या म्हणतात, "आता मुलांमधील जिज्ञासा संपुष्टात येत आहे. त्यांनी शिक्षकांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. वर्गात उपस्थित राहणे ही औपचारिकता बनली आहे. मुलांना अभ्यासामध्ये रस राहिला नाही, त्यामुळे त्यांच्यात कौशल्ये विकसित होत नाहीये.'

डिजिटल विभागणी: फीपासून फोनपर्यंत सर्व हप्त्यांमध्ये भरत आहेत पालक

होशंगाबाद येथे राहणा-या प्रमिला सैनी या शाळेत प्युन आहेत, तर त्यांचे पती ड्रायव्हर आहेत. त्यांना मुलांच्या शाळेच्या फीबरोबरच इंटरनेटचा खर्चही उचलावा लागतोय.
होशंगाबाद येथे राहणा-या प्रमिला सैनी या शाळेत प्युन आहेत, तर त्यांचे पती ड्रायव्हर आहेत. त्यांना मुलांच्या शाळेच्या फीबरोबरच इंटरनेटचा खर्चही उचलावा लागतोय.

लॅपटॉप, फोन आणि चांगले नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणार्‍या मुलांना ऑनलाइन क्लासेसमध्ये अडचणी येत नाहीत. मात्र काही मुले अशीही आहेत ज्यांच्याजवळ या सर्व सोयी उपलब्ध नाहीत. संसाधनांच्या अभावामुळे 'शिक्षणाचा हक्क' त्यांच्यापासून हिसकावला जात आहे. दिवस रात्र काम करून पालक मुलांच्या शाळेच्या फीपासून मोबाइल फोनपर्यंतचे हप्ते भरत आहेत. असेच एक कुटुंब म्हणजे प्रमिला सैनी यांचे. होशंगाबाद रोडनजीकच्या बागली या गावात राहणा-या प्रमिला शाळेत प्युन म्हणून काम करतात, तर त्यांचे पती ड्रायव्हर आहेत.

प्रमिला सांगतात, "माझी मुले प्रियंका आणि प्रशांत दोघेही माझ्या फोनवरून ऑनलाईन क्लासेसमध्ये शिक्षण घेतात, परंतु जेव्हा आम्ही कामानिमित्त बाहेर जातो, तेव्हा त्यांचा क्लास सुटतो. प्रियंका महाविद्यालयात असून प्रशांतची यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा आहे. दरमहा इंटरनेट रिचार्ज करणे देखील महाग आहे.' घरातील आर्थिक परिस्थिती बघता आईवडील आता खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत टाकणार असल्याचे प्रमिला यांचा मुलगा प्रशांतने सांगितले.

पिपलिया पेंदे खान भागात राहणा-या रामदेवी हजारिया आणि त्यांची मुलेही या दिवसांत चिंतेत आहेत. घरोघरी काम करून महिन्यात 3500 रुपये कमावणार्‍या रामदेवी सांगतात, 'मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा खासगी शाळेत शिकतो. ऑनलाइन क्लाससाठी त्याला 8500 रुपयांचा फोन घेऊन दिला. त्याचा दरमहा 1800-2000 रुपयांचा हप्ता भरतो. फी भरल्यानंतरही क्लास होत नाही आणि आता फोन ठेवला आहे. मुलाचे शिक्षण थांबू नये, म्हणून मी त्याला घराजवळच शिकवणी लावून दिली आहे.' रामदेवी यांचा दहा वर्षाचा मुलगा सर्वेश सांगतो, 'आई-वडील शिक्षित नाहीत, म्हणून अभ्यासात मदत करू शकत नाही, आता मी ट्युशनमध्ये अभ्यास करतो.'

पिपलिया पेंडे खान भागात राहणा-या रामदेवी हजारिया या घरकाम करतात. गेल्या वर्षी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी त्यांना नवीन फोन घ्यावा लागला होता.
पिपलिया पेंडे खान भागात राहणा-या रामदेवी हजारिया या घरकाम करतात. गेल्या वर्षी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी त्यांना नवीन फोन घ्यावा लागला होता.

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सुटू नये, ही भीती

यापैकीच एक आहे दहावीत शिकणारी मनीषा. ती राजधानी भोपाळपासून 13 किमी अंतरावर असलेल्या मिसरोद येथील सरकारी शाळेत दहावीत शिकत आहे. फोन नसल्यामुळे मनीषाचा अनेक दिवसांचा अभ्यास मागे पडला. त्यानंतर तिचे वडील जैन पाल यांना स्मार्टफोनसाठी कर्ज घ्यावे लागले. मनीषा म्हणाली, "आम्ही ग्रामीण भागात राहतो. नेटवर्क आणि वीज संबंधित समस्या येथे कायम आहेत. मध्यंतरी आम्हाला शाळेत बोलावून शिकवले गेले, त्यामुळे चांगला अभ्यास सुरु झाला. पण कोरोनाची प्रकरणे वाढली तेव्हा शाळा परत बंद झाली.'

मनीषाचे वडील जैन पाल म्हणतात, "मला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे यापुर्वीच नवव्या इयत्ता शिक्षण सुटले. मुलगा सहावीत आहे. त्याचेही शिक्षण थांबले आहे. परंतु लहान मुलगी मनीषा दहावीत आहे, तिचा अभ्यास थांबू नये, म्हणून मी कर्ज घेतले.'

अशीच काहीशी परिस्थिती बांधकाम साइटवर काम करून महिन्याला आठ हजार रुपये कमावणा-या प्रकाश यांच्या मुलांची आहे. प्रकाश यांच्यावर कुटुंबातील पाच सदस्यांची जबाबदार आहे. घरच्या बेताच्या परिस्थितीत अंजली, अनुष्का आणि अजय या तीन मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचा खर्च पेलणे प्रकाश यांच्यासाठी कठीण आहे.

प्रकाश यांनीही मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी कर्ज घेऊन मोबाइल फोन विकत घेतला.
प्रकाश यांनीही मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी कर्ज घेऊन मोबाइल फोन विकत घेतला.

प्रकाश यांना मुलांना पुढे शिकवायचे आहे, परंतु शाळा न उघडल्यामुळे मुले अभ्यासापासून दुरावली आहेत. प्रकाश सांगतात, मी मोठ्या मुलीसाठी ऑनलाइन क्लाससाठी फोन विकत घेतला. पण आणखी मोबाइल फोन नसल्यामुळे लहान मुलगी व मुलाचे शिक्षण बंद झाले आहे. प्रकाश यांची धाकटी मुलगी अनुष्काने चौथ्या वर्गात 92% मिळवले होते. परंतु आता मुलांना पुढील अभ्यासाबद्दल काहीच माहिती नाही.

कोरोना काळातील शिक्षणाची ही अवस्था भयानक आहे. एकीकडे ऑनलाइन शिक्षण घेणा-या मुलांवर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहे, दुसरीकडे देशात अशी अनेक मुले आहेत ज्यांना ऑनलाइन क्लासपर्यंत पोहोचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत देशात ड्रॉप आऊट दर वाढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...