School Reopening Status Latest News; Madhya Pradesh Rajasthan Delhi | Schools Open In Maharashtra Gujarat Bihar Haryana; Schools Reopening Status In India, Know Status Of Each State
एक्सप्लेनर:भारतात 60 आठवड्यांपासून बंद आहेत शाळा, जाणून घ्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत काय आहे राज्यांची तयारी आणि तज्ज्ञांचे मत
2 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
जाणून घ्या याविषयी सविस्तर...
कोरोनामुळे गेल्या 15 महिन्यांपासून भारतातील शाळा बंद आहेत. कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या चांगल्या विकासासाठी शाळेच्या वातावरणात घेतलेले शिक्षण अधिक महत्वाचे आहे. तसेच ऑनलाइन वर्गांमुळे शालेय मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार शाळा बंद झाल्याने जगभरातील सुमारे 160 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. भविष्यात, त्याचे नकारात्मक परिणाम मुलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्थितीवर दिसतील.
कोरोनाची घटती प्रकरणे लक्षात घेता अनेक राज्यांत शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर काही राज्यांनी देखील शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. काही राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. जगाविषयी सांगायचे तर 50 हून अधिक देशांमध्ये शाळा पूर्ण किंवा अंशतः उघडल्या आहेत.
भारतातील कोणत्या राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत? कुठे कशी तयारी आहे? आपल्या मुलास आता शाळेत पाठविणे सुरक्षित आहे का? शाळांनी मुलांसाठी सुरक्षित वातावरण कसे तयार करावे? जगभरातील शाळांची स्थिती काय आहे? शाळा सुरू करण्याबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? चला जाणून घेऊया ...
महाराष्ट्र, गुजरात, बिहार, हरियाणा येथे शाळा सुरू आहेत
महाराष्ट्र: ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे 5,900 शाळांमध्ये 15 जुलैपासून ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या सर्व शाळा अशा क्षेत्रात आहेत जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे येत नाहीत. या शाळांमध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळांमध्ये कोविड प्रोटोकॉल पाळला जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या बड्या शहरात सध्या शाळा बंद राहतील.
गुजरातः इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपासून ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालये आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट देखील 50% क्षमतेसह सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे हे पर्यायी आहे आणि पालकांची संमती आवश्यक आहे. ज्या मुलांना आता शाळेत यायचे नाही अशा मुलांसाठी ऑनलाईन वर्गदेखील सुरू राहतील.
हरियाणा: 9 वी ते 12 वी पर्यंत शाळा 16 जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत. 6 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा देखील 23 जुलैपासून सुरू केल्या जातील. पालकांच्या लेखी परवानगीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल. ऑनलाईन वर्गही सुरू राहतील. शाळेत कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक असेल.
पंजाब: ज्या विद्यार्थ्यांनी लसीचा किमान एक डोस 15 दिवस अगोदर घेतला आहे त्यांना ऑफलाइन वर्गात प्रवेश घेण्याची परवानगी आहे. चंदीगडमध्ये 19 जुलैपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र यासाठी पालकांची संमती आवश्यक असून ऑनलाईन वर्गदेखील सुरू राहतील.
बिहारः 12 जुलैपासून 11, 12 वी, पदवी महाविद्यालये, सरकारी व खासगी विद्यापीठे व टेक्निकल इन्स्टिट्यूट 50% क्षमतेसह उघडण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता उर्वरित वर्गांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
कर्नाटक: वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये उघडली गेली आहेत. लसीचा एका डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाइन वर्गात हजेरी लावू शकतात. लवकरच इतर महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
हिमाचल प्रदेशः 19 जुलैपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र यासाठी पालकांची संमती आवश्यक असून ऑनलाईन वर्गदेखील सुरू राहतील.
ती राज्ये, जिथे शाळा लवकरच सुरू होणार आहेत
मध्य प्रदेश: अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठी 26 जुलैपासून शाळा सुरू होतील. 15 ऑगस्टनंतर तिसरी लाट लक्षात घेऊन उर्वरित वर्गांसाठी देखील शाळा सुरू केल्या जातील. यासह 1 ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची तयारीही सुरू आहे. निम्म्या क्षमतेसह शाळा व महाविद्यालये दोन्ही सुरू केली जातील. विद्यार्थ्यांना दोन तुकड्यांमध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक बॅचला एक दिवसाआड शाळेत यावे लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांची एक बॅच पहिल्या दिवशी आणि दुसर्या दिवशी दुसर्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित राहतील.
ओडिशा: 26 जुलैपासून दहावी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सोबतच, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गदेखील सुरू राहतील आणि शाळेत येणे पर्यायी असेल.
आंध्र प्रदेश: राज्यातील 16 ऑगस्टपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय नाही.
राजस्थानः राज्यात ऑगस्टपासून शाळा सुरू करता येतील. मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शाळा कशा सुरू होतील याबाबत शिक्षण विभागाने प्रस्ताव ठेवला आहे.
उत्तर प्रदेशः शिक्षक आणि इतर कर्मचार्यांसाठी 1 जुलैपासून शाळा सुरू झाल्या आहेत, परंतु विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन अभ्यास करावा लागेल. राज्यात सध्या शाळा केव्हा उघडतील या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.
दिल्लीः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सध्या दिल्लीत शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. केजरीवाल म्हणाले आहेत की, लसीकरण पूर्ण होईपर्यंत शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना नाही.
यासह छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, तामिळनाडू, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, पुडुचेरी येथेही शाळा बंद आहेत.
आता शाळा उघडणे सुरक्षित आहे का?
जुलैच्या सुरुवातीस जगातील 170 देशांमध्ये शाळा उघडल्या गेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, प्री-प्राइमरी, प्राइमरी आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांचे वय म्हणजे ज्यांचे वय सुमारे 2 ते 11 वर्षे आहे, त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. त्यांना शाळेत पाठविले जाऊ शकते.
वेगवेगळ्या सिरो सर्वेक्षणात मुलांमध्ये 80% पर्यंत सिरोपोसिटिव्हिटी दर आढळला आहे. म्हणजेच, त्यांना कोरोना होण्याचा धोका खूप कमी आहे.
अनेक देशांमध्ये कोरोना पीकवर असताना फार कमी कालावधीसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. प्रकरणे कमी होऊ लागताच शाळा पुन्हा सुरू झाल्या.
कोरोनाचा लहान मुलांना किती धोका?
महामारी रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते…
मुलांसाठी तिसरी लाट अधिक धोकादायक असेल याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जर आपण पहिली आणि दुसरी लाट पाहिली तर मुलांवर कमी परिणाम दिसून आला. एकूण गंभीर रूग्णांपैकी केवळ 10 ते 11% लोक 18 वर्षांखालील होते.
मुलांना असणारा धोका कमी असण्यामागे वैज्ञानिक आधारही आहे. हा विषाणू फुफ्फुसात एसीई -2 नावाच्या रिसेप्टर्सला जोडतो. मुलांमध्ये हे रिसेप्टर्स कमी विकसित असतात. या कारणास्तव, मुलांमध्ये संक्रमणानंतरही गंभीर लक्षणे उद्भवत नाहीत.
तिसरी किंवा चौथी लाट असलेल्या देशांमध्येही मुलांवर फारसा परिणाम झालेला नाही. नवीन व्हेरिएंट देखील मुलांवर फारसा परिणाम करीत नाहीत. म्हणजेच त्या तुलनेत मुलांना कोणताही धोका नाही.
शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलायला हवीत?
व्हेंटिलेशन आणि सामाजिक अंतर यासारख्या सुरक्षा उपायांचे अनुसरण करण्यासाठी शाळांमध्ये स्ट्रक्चरल बदल करावे लागतील. वर्ग खुल्या व हवेशीर ठिकाणी घ्यावे लागतील.
पूर्ण नियोजन करून शाळा टप्प्याटप्प्याने उघडल्या पाहिजेत. सुरुवातीला, रोजऐवजी एक किंवा दोन दिवसाआड वर्ग घेतले पाहिजे.
मुलांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून ऑल्टरनेट दिवशी बोलावले पाहिजे. आठवड्याचे तीन दिवस एक बॅच आणि इतर तीन दिवशी दुसरी बॅच घ्यायला हवी.
इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शाळा उघडण्याऐवजी प्रथम लहान वर्ग सुरु केले पाहिजेत, कारण लहान मुलांना कोरोना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे.
तसेच मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय पालकांच्या हाती असावा.
जगभरात शाळा कोठे उघडल्या?
वर्ल्ड बँक, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि युनिसेफ यांनी संयुक्तपणे ग्लोबल एज्युकेशन रिकव्हरी ट्रॅकर तयार केले आहे. त्यांच्या मते, चीन, यूके, फ्रान्स आणि स्पेनसह जगातील 51 देशांमध्ये शाळा पूर्णपणे उघडण्यात आल्या आहेत. यासह, असे 90 देश आहेत जेथे शाळा अंशतः उघडल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी शिकवले जात आहे. कुठे ऑनलाईन क्लासेस आहेत तर कुठे विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलावले जाते.
जगातील बर्याच देशांमध्ये कोरोना पीकवर असताना शाळा फक्त काही काळासाठीच बंद ठेवण्यात आली होती. इतर वेळी शाळा सुरु होत्या. मात्र याकाळात मुलांनी सामाजिक अंतर आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक होते. या काळात बर्याच देशांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल केले आहेत.