आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दैनिक भास्करसोबत विशेष करारांतर्गत
हीथर मर्फी
कोरोनावरील लसीची प्रतीक्षा जगभरात सुरू आहे. मात्र, जगभरात अनेक शास्त्रज्ञांनी डीआयवाय (डू इट युवरसेल्फ) म्हणजे स्वत: बनवलेल्या लसीचा वापर सुरू केला आहे. हे शास्त्रज्ञ स्वत:वर लसीचा प्रयोग करत आहेत, तसेच आपले कुटुंब, मित्र, नातेवाईक आणि त्यांच्या लसीमध्ये रस दाखवणाऱ्यांनाही लस देण्याचा दावा करत आहेत. मात्र, अशा लसीबद्दल सावधही केले जात असून ती घातक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक शास्त्रज्ञ लहान लहान गट बनवून अशी लस तयार करत आहेत, जिला मान्यताही मिळालेली नाही व ती प्रमाणितही नाही.
अशा गटात सर्वात प्रभावी गट ‘रॅपिड डिप्लॉयमेंट व्हॅक्सिन कोलॅबोरेटिव्ह’ किंवा ‘रॅडवॅक’ आहे, ज्यात हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध जेनेटिसिस्ट जॉर्ज चर्च यांच्यासह २३ सहकारी आहेत. मात्र, चर्च यांनी दावा केला आहे की, रॅडवॅकचे काम हार्वर्ड परिसरात केले जात नाही. अशाच प्रकारे गुपचूपपणे कोरोनोप नावाचा प्रकल्पही सुरू आहे. एफडीएकडून अडचण नको म्हणून ते गुपचूप लसीवर काम करत आहेत. अशाच प्रकारच्या डीआयवाय लसीचे समर्थक, फ्रायडे हार्बर शहराचे महापौर फरहाद घाटन सांगतात, कोणतीही सुरक्षा नसण्यापेक्षा थोडी सुरक्षा असणे मला जास्त आवडेल.
डीआयवाय लस धोकादायक
डीआयवाय लसीच्या विरोधकांना वाटते की, या शास्त्रज्ञांची भावना चांगली असली तरी त्यांना त्यांच्या प्रयोगापासून खूप फायदा होणार नाही. कारण त्यांच्या लसींची खरी परीक्षा होत नाहीये. तसेच अशी लस नुकसानही करू शकते. जसे तिच्यापासून गंभीर इम्यून रिअॅक्शन, साइड इफेक्ट होऊ शकतो व ती सुरक्षेची खोटी भावना निर्माण करते. जॉन हाफकिन्स बर्मन इन्स्टिट्यूट आॅफ बायोअॅथिक्सचे संचालक जेफरी काह्न सांगतात, शास्त्रज्ञांनी त्यांची लस स्वत: घेतली तरी जेव्हा अशी प्रमाणित लस दुसऱ्यांना देतील तेव्हा ती उपचारात फसवणूक होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.