आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोका:नव्या स्ट्रेनच्या वेगामुळे शास्त्रज्ञ चिंतित, आणखीही प्रकार असण्याची शक्यता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुतांश देशांत जिनोम सिक्वेन्सिंग कमी, त्यामुळे नवे स्ट्रेन सापडणे कठीण

कोरोनाशी लढणाऱ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या असताना नव्या समस्यांनी डोके वर काढले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत दोन नव्या रूपातील विषाणूचा फैलाव झाला आहे. बदलांमुळे ते अधिक संसर्गजन्य बनले आहेत. लसीची मंजुरी, उत्पादन आणि लसीकरणाच्या व्यवस्थेकडे लक्ष लागलेल्या जगाला या नव्या रूपातील विषाणूवर लक्ष ठेवावे लागणार आहे. तथापि, विषाणूंमधील अशा बदलांना जीवशास्त्रज्ञ सामान्य मानतात. विषाणूचे असे नवे प्रकार अधिक फैलावणारे असले, तरी कमी घातक असतात. तरीही सरकारे आणि धोरणकर्त्यांना निष्काळजी राहून चालणार नाही. अधिक संसर्गजन्य असलेल्या कोविड-१९ मुळे रुग्णालयांवर मोठा ताण येऊ शकतो.

युरोप आणि अमेरिकेसह जगातील अन्य भागात लवकरच अशी स्थिती येऊ शकते. डिसेंबरच्या मध्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती संशोधकांनी दिल्यापासून पन्नासहून अधिक देशांनी ब्रिटनमधील प्रवाशांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेसाठी असे निर्बंध लागू केले आहेत. परंतु, अशा उपायांनी केवळ थोडा वेळ संकट टळेल. प्रवास निर्बंध लागू होण्याआधी ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनच्या संसर्गाचे प्रमाण ३० टक्क्यांवर गेले होते. आतापर्यंत जवळपास वीस देशांत संसर्गाचे किरकोळ प्रमाण समोर आले आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेप्रमाणे बहुतांश देशांमध्ये विषाणूच्या बदलावर लक्ष ठेवणारे जिनोम सिक्वेन्सिंग कमी प्रमाणात होते, हे यामागचे एक कारण असू शकते.

लस प्रभावी ठरेल, तत्काळ बदलही शक्य
विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे आजारी पडलेले लोक पुन्हा बाधित होणार नाहीत. ते सध्याच्या लसीमुळेही वाचणार नाहीत. तथापि, अधिक प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर नैसर्गिक परिवर्तनातून ही स्थिती बदलू शकते. लसींमध्ये बदल करून त्यांना अधिक प्रभावी बनवता येऊ शकेल.

अधिक संसर्गजन्य विषाणू आरोग्य सुविधांना आव्हान ठरेल
कोरोनाशी लढणाऱ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या असताना नव्या समस्यांनी डोके वर काढले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत दोन नव्या रूपातील विषाणूचा फैलाव झाला आहे. बदलांमुळे ते अधिक संसर्गजन्य बनले आहेत. लसीची मंजुरी, उत्पादन आणि लसीकरणाच्या व्यवस्थेकडे लक्ष लागलेल्या जगाला या नव्या रूपातील विषाणूवर लक्ष ठेवावे लागणार आहे. तथापि, विषाणूंमधील अशा बदलांना जीवशास्त्रज्ञ सामान्य मानतात. विषाणूचे असे नवे प्रकार अधिक फैलावणारे असले, तरी कमी घातक असतात. तरीही सरकारे आणि धोरणकर्त्यांना निष्काळजी राहून चालणार नाही. अधिक संसर्गजन्य असलेल्या कोविड-१९ मुळे रुग्णालयांवर मोठा ताण येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...