आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Announcing The Name Of Draupadi Murmu, How The BJP Will Benefit From Nominating A Tribal Leader For The Presidency

NDA च्या शर्यतीत होत्या 3 महिला:द्रैापदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा, आदिवासी नेत्याला राष्ट्रपती केल्यास भाजपला फायदा काय?

प्रेम प्रताप सिंह7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील महिन्याच्या 25 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. यासाठी नामंकन प्रक्रिया सूरू असून 29 जुन फॅार्म भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून झारखंडच्या राज्यपाल द्रैापदी मुर्मू यांना उमेदवारी दिली. दिव्य मराठी नेटर्वकने सर्वात प्रथम सांगितले होते की, भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी तीन महिलांचा विचार केला जात असून यामध्ये झारखंडच्या राज्यपाल द्रैापदी मुर्मू, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि छत्चीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके यांचा समावेश आहे.

लोकसभेच्या 60 पेक्षा जास्त जागांवर लक्ष्य:
द्रैापदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. झारखंडच्या नवव्या राज्यपाल द्रैापदी मुर्मू या ओडिशातील रायरंगपूरमधून आमदार आहेत. राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या ओडिशा नेत्या आहेत. यापूर्वी 2002 ते 2004 या काळात त्या भाजप-बीजेडी यूती सरकार मध्ये मंत्रीही होत्या.लोकसभेच्या 543 जागांपैकी 47 जागा एसटी प्रर्वगासाठी राखीव आहेत. 60 हुन अधिक जगांवर आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, छत्चीसगडमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी मतदार निर्णायक स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत आदिवासीच्या नावावरही चर्चा सुरू होती. याचा राजकीय फायदा भाजपला निवडणूकीतही होऊ शकतो, कारण पुढील दीड वर्षात गूजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत.

विरोधकांकडून भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचे नाव
यापूर्वी, भाजपचे माजी दिग्गज आणि टिएसीचा राजीनामा देणारे यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विरोधकांच्या वतीने पूढे करण्यात आले होते. तर भाजपकडून 2022-23 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडनूका सहज हाताळता याव्यात यासाठी महिला, मूस्लिम, दलित किंवा दक्षिण भारतातील एखाद्या व्यक्तीच्या नावाचा विचार केला जात होता.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीयाठी ज्या गटांकडे नजर आहे त्याची तपासणी दिव्य मरठी नेटर्वकने केली आहे, तुम्हीही पाहा....

आदिवासी: आजपर्यंत देशात आदिवासी समाजातील एकही व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकला नाही. महिला, दलित, मुस्लिम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपती झाले असले तरी आदिवासी समाज मात्र त्यापासून वंचित राहिला आहे. अशा परिस्थितीत दलित समाजातील व्यक्तीलाच देशातील सर्वोच स्थानावर बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महिला: महिला भाजपच्या कोअर व्होट बँक बनल्या आहेत. या व्होटबँकचा फायदा घेण्यासाठी भाजपने आता प्रयत्न सुरू केले आहेत. महिलांच्या नावाचा जास्त विचार केला जात होता. यामध्ये यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश होता. पटेल या नरेंद्र मोदींच्या अगदी जवळच्या आहेत.

पटेल यांच्याशिवाय माजी राज्यपाल द्रैापदी मुर्मू, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके यांचाही या शर्यतीत सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी राज्यपाल द्रैापदी मुर्मू राष्ट्रपती बनवल्यास भाजप एका बाणाने दोन निशाणे साधू शकेल. पहिला म्हणजे आदिवासी समाजाला जवळ करणे सोपे होऊ शकेल आणि दूसरे म्हणजे महिलांच्या व्होटबँकेतही सकारात्मक संदेश जाईल. अनुसुइया उईके या मूळ छिंदवाडा येथील असून मध्य प्रदेशातून 1985 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी दमुआमधून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्या भाजपच्या राज्यसभेच्या खासदारही होत्या. राजकारणात येण्यापूर्वी त्या छिंदवाडा येथील सरकारी महाविद्यालयात तीन वर्षे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.

25 जुलैला संपणार राष्ट्रपतींचा कार्यकाळ

नीलम संजीन रेड्डी यांनी 25 जुलैला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासुन, प्रत्येक वेळी 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती कार्यकाळ सांभाळतात. रेड्डी यांच्या पाठोपाठ ज्ञानी झैल सिंह, आर वेंकटरमन, शंकरदयाल शर्मा, के आर नारायनण, एपीजे अब्दूल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घतली होती.

दोन राष्ट्रपतींचा पदावर असताना झाला होता मृत्यू

देशात असे दोन राष्ट्रपती झाले आहेत ज्यांचे राष्ट्रपतीपदावर असताना निधन झाले आहे. यात तिसरे राष्ट्रपती झाकीर हूसैन आणि फखरूद्दीन अली अहमद यांचा समावेश आहे. झाकीर हूसैन हे 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत राष्ट्रपती होते. त्यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती करण्यात आले होते. तसेच राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रूवारी 1977 या काळात पदावर राहिले त्यांच्या निधनामुळे बी.डी जट्टी यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवावे लागले.

हे होते कार्यवाहक राष्ट्रपती

झाकीर हूसेन यांच्या निधनानंतर तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यालयाचे सरन्यायधीश मूहम्मद हीदायतूल्ला यांची राष्ट्रपती म्हणून निुवड झाली. तर फखरूद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर बी.डी जट्टी यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवावे लागले.

ममतांच्या तीन आवडत्या चेहऱ्यांचा उमेदवारीसाठी नकार
विरोधकांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेस नेते यशवंत सिन्हा यांचे नाव दिले आहे. त्यानंतर सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. अनेक दिवसांपासून विरोधकांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मिळत नव्हता.

विरोधकांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मिळत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दूल्ला आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यानंतर महात्मा गांधींचे नातू आणि पश्चिम बंगालच्या राज्यपाल गोपाऴ कृष्ण गांधी यांनीही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याचा विरोधकांचा प्रस्ताव धूडकावून लावला होता. आपण विरोधीपक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होणार नसल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले होते. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवारीसाठी सातत्याने प्रयत्न करत होत्या, मात्र त्यांना यश आले नाही.

बातम्या आणखी आहेत...