आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टहस्तांदोलन, खुर्चीला स्पर्श होताच लागते करंट:हिवाळ्यात असे का होते? हा करंटचा झटका कसा टाळावा?

लेखक: अलिशा सिन्हा2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

हिवाळ्यात दाराची कडी, खुर्ची किंवा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर झटका किंवा करंट लागल्याचे तुमच्यासोबतही घडले असेल. कोणताही वीजप्रवाह नसलेल्या वस्तुंना स्पर्श केल्याने करंट का लागते याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

कंगवा केसांना घासल्यावर त्याला कागदाचे तुकडे चिकटल्याचे तुम्ही पाहिले असेल. स्वेटरला केस चिकटतात. असे का होते असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच.

आज कामाच्या गोष्टीत आपण यावरच बोलणार आहोत.

स्टोरीचे तज्ज्ञ आहेत - डॉ, बालकृष्ण श्रीवास्तव, जनरल फिजिशियन

प्रश्न - वीज प्रवाह किंवा सामान्य भाषेत करंट काय असते?

उत्तर - सर्वात आधी हे समजून घ्या -

सर्व वस्तू अणूंनी बनल्याचे तुम्ही लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेच असेल. अणू 3 कणांनी बनतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन. यापैकी इलेक्ट्रॉनच्या संचारालाच करंट म्हणतात.

 • इलेक्ट्रॉनमध्ये निगेटिव्ह भार असतो
 • प्रोटॉनमध्ये पॉझिटिव्ह भार असतो
 • न्युट्रॉन हा भार रहित असतो.

करंटचा अर्थ आहे प्रवाह. जेव्हा विद्युत तारांमधून इलेक्ट्रॉनचे वहन होते तेव्हा त्याला इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत प्रवाह म्हणतात. यासाठी माध्यमाची गरज असते.

प्रश्न - करंटसाठी किती प्रकारची माध्यमे असतात?

उत्तर - यासाठी 2 माध्यम असतात - Good Conductor आणि Bad Conductor

 • Good Conductor - यात विद्युत प्रवाहाचे सहज वहन होते. जसे की, धातू.
 • Bad Conductor - यातून विद्युत प्रवाहाचे सहज वहन होत नाही. जसे की, कपडे किंवा कंगवा.

प्रश्न - कधी-कधी Bad Conductor ने बनलेल्या वस्तू जसे की, कपडे, फर्निचर किंवा कंगव्याला स्पर्थ होताच आपल्याला करंट लागते. याला काय म्हणतात?

उत्तर - हेही करंटच असते. जे इलेक्ट्रॉनमुळे लागते. मात्र Bad Conductor ने बनलेल्या वस्तूंना स्पर्श झाल्यास स्थिर विद्युतमुळे करंट लागते.

प्रश्न - हिवाळ्यात स्थिर विद्युत म्हणजेच करंट का आणि कसे लागते?

उत्तर - Bad Conductor मध्ये कधी-कधी निगेटिव्ह भार म्हणजेच इलेक्ट्रॉन येतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही ती व्यक्ती किंवा वस्तूला स्पर्श करता, तेव्हा तो भार लगेच तुमच्यातून वहन होऊन निघून जातो आणि तुम्हाला काही क्षणांसाठी झटका लागतो.

प्रश्न - स्थिर करंट कसे असते?

उत्तर - स्थिर करंट म्हणजेच निश्चित भार(फिक्स्ड चार्ज). जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही.

प्रश्न - अनेक लोक सांगतात की, पायांचा जमीनीला स्पर्श असल्यास यामुळे हिवाळ्यात करंट लागण्याची शक्यता कमी होते. हे खरे आहे का?

डॉ. बालकृष्ण - अगदी बरोबर आहे. वेळोवेळी आपल्या पायांचा जमीनीला स्पर्श करत राहा. यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला स्पर्श झाल्यास करंट लागण्याची शक्यता कमी होते. कारण यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉनचा भार जमीनीत निघून जातो.

प्रश्न - जर एखादा व्यक्ती बूट घालून कार्यालयात किंवा दुसरीकडे गेला, तर तो बूट काढून वारंवार जमीनीला स्पर्श कसा करू शकेल?

डॉ. बालकृष्ण - अशा परिस्थितीत थोड्या थोड्या वेळाने आपल्या हाताचे कोपर किंवा हातांनी भिंतीला स्पर्श करत राहा. यामुळे तुम्हाला एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श केल्याने करंट लागण्याची शक्यता कमी होईल.

प्रश्न - अशा प्रकारे करंट लागल्याने काही नुकसान होते का?

डॉ. बालकृष्ण - नाही. असे करंट 1-2 सेकंदांसाठीच लागते. जे लहान-मोठे कुणीही लगेच विसरून जातात. त्यामुळे याने काहीही नुकसान होत नाही.

जाता-जाता

करंट लागल्याने झटका बसल्यासारखे का वाटते?

पूर्ण शरीराची तंत्रिका तंत्र म्हणजेच न्युरोसिस्टिम वीजेच्या हलक्या पल्सवर काम करते. जेव्हा आपल्याला बाहेरून इलेक्ट्रिक चार्ज मिळतो, तेव्हा आपल्या तंत्रिका तंत्रात अडथळा निर्माण होतो आणि आपल्याला झटका बसल्यासारखे वाटते. त्यामुळेच करंटचा तीव्र झटका किंवा दीर्घ कालावधीसाठी लागल्यास हे मृत्यूचे कारण बनते.

करंट लागल्याने अनेकदा मृत्यू का होतो?

वास्तविक, करंट लागल्याने मृत्यूचे कारण म्हणजे ह्रदय योग्य रितीने काम न करणे हे असते. अनेकदा करंटमुळे ह्रदय रक्त पंप करत नाही आणि रक्तप्रवाह थांबतो. याला अॅट्रिएल अँड व्हेन्ट्रिक्युलर फॅब्रिलेशन म्हणतात. हे मृत्यूचे कारण ठरते. अनेकदा रुग्ण कोमात जातो. त्यानंतर श्वास थांबतो. याला कार्डिओ पल्मोनरी अरेस्टही म्हणतात.

करंटचा तीव्र झटका किंवा दीर्घ कालावधीसाठी लागल्याने 12 प्रकारचे धोके होऊ शकतात

 • शरीर गंभीररित्या भाजणे
 • शरीराचे अवयव गळून पडणे
 • श्वास घेण्यास त्रास
 • कार्डिअॅक अरेस्ट
 • हार्ट अटॅक
 • झटका येणे
 • बेशुद्ध होणे
 • लकवा मारणे
 • डिहायड्रेशन
 • रक्ताच्या गुठळ्या होणे
 • स्नायूंत वेदना आणि आकुंचन

करंट लागल्यानंतर साधारणपणे या अडचणीही येतात -

 • धूसर दिसणे
 • हाता-पायाला मुंग्या येणे
 • डोकेदुखी
 • घबराट
 • ऐकण्यात अडचणी
 • तोंडातील व्रण

हेही जाणून घ्या -

 • झटका व्होल्टने नाही करंटने लागतो.
 • शरीराच्या कोणत्या भागावरून विद्युत प्रवाहित झाली त्यावर झटका अवलंबून असतो.
 • तुमचे शरीर ओले आहे की कोरडे यावरही झटका अवलंबून असतो.
 • शरीरातून किती वेळ विद्युत प्रवाहित झाली यावरही झटका अवलंबून असतो.
बातम्या आणखी आहेत...