आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Seeds Of Rare Native Trees Obtained By Wandering In The Forests; 'nature' To Be Guarded By 'Serpent Friend' In Beed Now!

दिव्य मराठी विशेष:जंगलांत फिरून मिळवल्या दुर्मिळ देशी वृक्षांच्या बिया; बीडमध्ये आता ‘सर्पराज्ञी’ जपणार ‘सृष्टी’!

बीड (अनंत वैद्य)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तागडगावचे प्राणिमित्र सिद्धार्थ व सृष्टी सोनवणेंचा पुढाकार

बीड जिल्ह्यात अडीच टक्केच वनक्षेत्र असून त्यातही परदेशी रोपांचे प्रमाण लक्षणीय आहे. देशी वाणाच्या व दुर्मिळ रोपट्यांचे संवर्धन, वनक्षेत्र वाढावे यासाठी तागडगाव (ता.शिरूर) येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात रोपवाटिका तयार होत आहे. प्राणिमित्र सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे दांपत्य ठिकठिकाणाहून गोळ्या केलेल्या बिया, दुर्मिळ रोपं इथे जपत आहेत.

खैर, मोहा, बिबवा, काटेसावर, पिवळा पळस, गोरक्ष चिंच, बहावा, पांगारा, गोंदण, गुंज अशी दुर्मिळ रोपं ते इथं जगवणार आहेत. सिद्धार्थ यांनी जिल्ह्यातून दुर्मिळ वृक्षांच्या बिया संकलित केल्या. विविध देशी वाणांच्या दुर्मिळ रोपांच्या बिया जमा झाल्या असून त्या पिशव्यांत भरून रोपे बनवण्याचे काम सुरू झाले. साधारण ५० हजार रोपटी या ठिकाणी तयार व्हावीत, या दृष्टीने याचे नियोजन केले जात आहे.

रोप मोफत देणार, मात्र ते वाढवायची हमी घेणार

मिळालेलं झाड वाढवायंच, अशी लेखी हमी घेऊन केंद्र प्रत्येक अभ्यागताला मोफत रोप देणार आहे. याशिवाय विविध दुर्मिळ व देशी वाणांच्या रोपांची माहिती नागरिकांना व्हावी याचीही व्यवस्था केली जाणार आहे.

पुण्याहून आणल्या काटेसावरच्या बिया

काटेसावरच्या झाडावर ३० प्रकारचे पक्षी राहू शकतात. वाढत्या वृक्षतोडीमुळे अलीकडे हे झाड फारसे दिसत नाही. त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे यांनी या झाडाच्या बिया पुण्याहून मागवून घेतल्या. त्याचीही रोपं तयार करण्यात येत आहेत.

जैवविविधता जपणार

यंदा पर्यावरण दिनाचे ब्रीद हे ‘जैवविविधतेचा उत्सव’ असे आहे. त्यानुसार दुर्मिळ व अतिदुर्मिळ झाडांची रोपे करून ती लोकांना देण्यासाठी सर्पराज्ञी प्रकल्पात रोपवाटिकेची निर्मिती झाली आहे. लोकांनीही निसर्गाला जपायचे काम करावे.’ - अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, बीड.

बातम्या आणखी आहेत...