आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यूसीमा पात्राने मारहाण केलेल्या सुनीताची 'आपबिती':मोलकरणीने सांगितली पात्राच्या क्रौर्याची कहाणी...

वैभव पळनीटकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी हा फोटो बघा...

दोन्ही फोटोंतील महिला एकच आहे. नाव आहे सुनीता, वय अंदाजे 29 वर्षे. सुनीताला तिचे वय आठवत नाही. याचे कारण आहे सातत्याने निर्दयीपणे झालेली मारहाण. सुनीता ही भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रांच्या घरी काम करत होती. इथे त्यांना निर्दयीपणे मारहाण केली जात होती. यामुळे त्यांचे दात तुटले. पायही निकामी झाले. चेहरा आणि हातावर चटके दिल्याच्या अनेक खुणा आहेत.
राँचीच्या रिम्समध्ये दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे, मात्र त्यांना अजूनही कमजोरी आहे. त्यांना पूर्ण बऱ्या व्हायला वेळ लागेल. आम्ही सुनीतांसोबत त्यांच्या वॉर्डातच बोललो. त्या म्हणाल्या की, मॅडम छोट्या चुकांवरही इतक्या रागवायच्या की जे हातात येईल त्याने मारायच्या. हे कधीपासून सुरू झाले असे आम्ही सुनीतांना विचारले. त्या म्हणाल्या, एका वर्षापासून. त्याआधी जास्त छळ होत नव्हता.
आम्ही विचारले- तुम्ही सीमा पात्रांच्या घरी कशा आणि केव्हा पोहोचल्या?
माझे घर झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आले. मी आपल्या आजोळच्या माध्यमातून सीमा पात्रांच्या घरी गेले. त्यांच्या घरी राहून झाडलोट, भांडी घासणे आणि हळूहळू जेवण बनवायला सुरूवात केली. तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील वसंत कुंजमध्ये त्यांची मुलीकडे राहिले नंतर इथे आले. इथूनच मॅडमची वर्तणूक बदलली.
कामाच्या मोबदल्यात पगार मिळत होता?
त्या मला म्हणायच्या की तुझा पगार बँक खात्यात जमा केला आहे. मी कधी पासबूक बघितले नाही. खात्यात पैसे टाकत होत्या की नाही हे माहिती नाही. माझे आधार कार्ड आणि बँक पासबूकही सीमा यांच्याकडेच होते. मी त्यांना म्हणायचे की मला नातेवाईकांकडे जायचे आहे, तर त्या जाऊ देत नव्हत्या. म्हणायच्या, की मारून फेकून देऊ, तोंड बंद ठेव.

कधी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही?
एका वर्षापासून तर घरातून बाहेर जाणेही शक्य नव्हते. घरातच तुरुंगाप्रमाणे कैदेत होते. 2 वेळा पळून जाण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना समजले. यानंतर मला खूप मारहाण झाली. अनेक दिवस मला काळोख असलेल्या खोलीत कैद ठेवले. ते मला नीट जेवूही देत नव्हते.
मारहाण कोणत्या कारणासाठी करत होत्या?
मी चालू-फिरू शकत होते, तेव्हा झाडलोट, भांडी धुणे, जेवण बनवणे असे काम करायची. दिल्लीतही पूर्ण काम करायची. राँचीत आल्यानंतर त्यांनी इतकी मारहाण सुरू केली की, माझी तब्येत बिघडायला लागली. कधी कमरेवर लाथ मारायच्या, कधी भांडी फेकून मारायच्या. मारहाणीमुळे माझे पाय निकामी झाले, मी अपंग झाले.
मला पायी चालता येत नाही. मी रांगत रांगत चालते. चालण्यासाठी भिंत किंवा इतर वस्तूंचा आधार घ्यावा लागतो. मी एखाद्या वस्तूला हात लावला तर त्या हातावरच जोरात मारायच्या. म्हणायच्या, सामान मौल्यवान आहे, त्याला हात लावू नको. अनेकदा यासाठीच मला मारहाण झाली.
किचनचे सामान, बेलणे, तवा, कढई, फ्राइंगपॅन फेकून मारायच्या. गरम तव्याने मारहाण करायच्या, तेव्हा मी बचावासाठी हात पुढे करायचे. या काळ्या खुणा तव्याने जळाल्याच्या आहेत. कितीही मारले तरी त्यांचे हात थकत नव्हते.

सर्वात जास्त कधी मारले, तुम्हाला सगळ्यात जास्त वाईट केव्हा वाटले?
त्या मला अनेक दिवस खोलीत बंद करून ठेवायच्या. एकदा मी नाइलाजाने लादी पुसण्याच्या बादलीत लघवी केली. त्यांना हे कळाल्यावर त्यांनी मला खाली पाडून मारले आणि तोंडावर ती बादली ओतली. दोन वेळा त्यांनी असे केले.
दोन आठवड्यांपासून रुग्णालयात आहात, आधी आणि आता काय बदल जाणवतो?
माझी ही परिस्थिती सीमा पात्रामुळे आहे. मी त्यांच्या मुलीकडे राहत होते, तेव्हा सर्व ठिक होते. मला हे लोक बाहेर फिरायलाही नेत होते. तुम्ही माझे आधीचे फोटो पाहा. मी सरळ उभी राहू शकत होते, पळू शकत होते. आज माझी अशी परिस्थिती आहे की मी चालूही शकत नाही. कंबर वाकली आहे. नीट बोलता येत नाही. मी अनेक आठवडे सूर्याचा प्रकाश बघितला नाही.
त्या घराच्या बाहेर आले तर आता ठिक आहे, चांगले वाटत आहे. असे वाटत आहे की जणू काही तुरुंगातून मुक्त झाले आहे.

सुनीताच्या कहाणीत सीमा पात्रांशिवाय आणखी दोन लोक आहेत. एक सीमाचा मुलगा आयुष्मान आणि त्याचा मित्र विवेक.
1. सर्वात आधी सुनीताविषयी जाणून घ्या...
सुनीता गुमलामध्ये राहायची. लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला. गावातील शाळेत ती 8 वीपर्यंत शिकली. सांभाळणारे कुणी नसल्याने 22 व्या वर्षी तिने गाव सोडले आणि राँचीला आली. 2012 मध्ये सीमा पात्राच्या घरी मोलकरीण म्हणून काम सुरू केले. यानंतर दिल्लीला गेली आणि 2019 पर्यंत सीमा पात्रांच्या मुलीच्या घरी काम करत राहिली. नंतर पुन्हा सीमा यांच्या राँचीतील घरी परत आली. 22 ऑगस्टला पोलिसांनी सीमाच्या घरातून तिची सुटका केली.
2. आता सीमा पात्रांविषयी जाणून घ्या...
निवृत्त आयएएस अधिकारी महेश्वर पात्रा यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपच्या महिला विंगच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्य आहेत. बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेच्या स्टेट कोऑर्डिनेटर आहेत. सध्या पक्षातून त्या निलंबित आहेत. 1991 मध्ये पलामूतून लोकसभा निवडणूक लढवली होती. आधी आरजेडी आणि नंतर सुमारे 2 वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. प्रदेश काँग्रेसमध्ये त्या सचिवपदी होत्या. राँचीतील पॉश अशोकनगर भागात त्या राहतात.
त्यांचे पती महेश्वर पात्रा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये सचिव होते आणि डेव्हलपमेंट कमिशनर पदावरून निवृत्त झाले होते.

आझादी का अमृत महोत्सवातील हर घर तिरंगा या मोहीमेत सीमा पात्रा चांगल्याच सक्रीय होत्या. हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घेतला आहे.
आझादी का अमृत महोत्सवातील हर घर तिरंगा या मोहीमेत सीमा पात्रा चांगल्याच सक्रीय होत्या. हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घेतला आहे.

3. सीमा यांचा मुलगा आयुष्मान पात्रा
आयुष्माननेच सुनीताला मारहाणीची माहिती पोलिसांना दिली. त्याने सांगितले की आईने मोलकरणीला 3 वर्षे एका खोलीत बंद ठेवले. आयुष्मानने आधी आईसोबत याविषयी चर्चा केली. पण सीमाने त्याला मानसिक रुग्ण ठरवून राँचीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकेट्रीमध्ये पाठवले. नंतर त्याला सोडवले.
4. आयुष्मानचा मित्र विवेक बास्के
सुनीताच्या प्रकरणात विवेकनेच एफआयआर नोंदवला आहे. विवेक सरकारी अधिकारी आहे. तो आणि आयुष्मान 2002 मध्ये सोबत शिकत होते. 2 ऑगस्ट रोजी आयुष्मानने विवेकला फोनवर सांगितले होते की त्याची आई सुनीताला मारहाण करत आहे. यानंतर विवेकने सर्व माहिती गोळा करून 22 ऑगस्ट रोजी सीमा पात्रांविरोधात हरघोडा ठाण्यात एफआयआर नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...