आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वय विसरायचे असेल तर मनमाेकळे राहा, दीर्घायुष्यासाठी सर्वांशी सुसंवाद हवा, मी सध्या शरीराने नृत्य करत नाही, मात्र मनात नृत्य सुरूच असते

अहमदाबाद/भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांनी दिली यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

आयुष्यात सर्व गाेष्टी एका लयीत हाेत असतील तर ऊर्जा अंतर्मनातून आपाेआप बाहेर येते. वयाची नव्वदी गाठलेल्या देशातील बुजुर्ग कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांच्या यशस्वी जीवनाचे हेच रहस्य आहे. याच उत्साहाच्या बळावर गेल्या ५५ वर्षांपासून त्या अहमदाबादमध्ये ‘कदंब’ कथ्थक नृत्य केंद्र चालवत असून हजाराे शिष्य शिकून जगभरात या नृत्यशैलाचा प्रसार करत आहेत.

>या वयात इतकी ऊर्जा व सक्रियतेचे नेमके मर्म काय आहे ?

आयुष्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत याबद्दल नेहमी स्पष्ट रहावे असे मी मानते. वय विसरायचे असेल तर तुमच्याकडे ज्ञान असाे वा मनातील गाेष्टी खुलेपणाने त्याचे आदान प्रदान करा. मी ८ ते २८ वयाच्या विद्यार्थ्यांबराेबर माझ्या गाेष्टी शेअर करते. ‘शेअरिंग इज द माेस्ट वंडरफुल थिंग’ असे मी मानते. सध्या मी नृत्य करू शकत नसले तरी माझे डाेके तर नृत्य करते ना!

> कथ्थकमध्ये सर्वात जास्त प्रयाेग करण्याचे श्रेय तुम्हाला दिले जाते. अखेर याची गरज का पडली ?

एकदा मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून साेलाे परफाॅर्मन्सच्या जागी कथक काेरिआेग्राफी करणे सुरू केले. सर्वेश्वर दयाल यांच्या कवितेचीही काेरिआेग्राफी केली. कथ्थकचे सार म्हणजे नुसता ‘भाव’ नाही तर ती ‘कथा’ देखील आहे. त्यामुळे ती कथन करण्याचा दृष्टिकाेनही शाेधावा लागेल. म्हणून मी विद्यार्थ्यांना नावीन्याचा ध्यास घेण्यासाठी प्रेरित करत असते.

>‘उमराव जान’मध्ये रेखाबराेबर काम करण्याचा तुमचा अनुभव कसा हाेता. आताच्या नृत्याबद्दल तुमचे मत काय ?

मी तीन चित्रपटांमध्ये काेरिआेग्राफी केली, पण उमराव जान हिट झाला. मुजफ्फर अली यांचा चित्रपटही केला. रेखाला भरतनाट्यम येते. तिने नृत्यासाठी खूप मेहनत घेतली हाेती. त्या वेळच्या चित्रपटांत अर्थपूर्ण नृत्ये असायची. आता नृत्य नाही तर एराेेबिक्स असते.

> आज कोरोनामुळे लाेक घरात कैद आहेत. ते खूप नकारात्मक झाले आहेत. सकारात्मक कसे राहतील ?

आयुष्याकडे तुम्ही कसे बघता याचा खूप फरक पडत असताे. काेराेना आला तर घाबरायचे कशासाठी ? या वाईट दिवसांंसाठी घाबरायचे का? जर चांगले दिवस राहू शकत नाहीत तर वाईट दिवस कसे राहतील? त्यामुळे निराश हाेण्याची गरज नाही. लाेकांना त्यांच्याकडे आहे त्यापेक्षा नेहमी जास्त हवे असते. त्यामुळेच तणाव आहे. नकारात्मकता आहे.       >पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, टॅगोर रत्न पुरस्कार। >कथ्थकला सोलो नृत्यातून कोरिअोग्राफीमध्ये परिवर्तित करण्याचे श्रेय. > सर्वेश्वर दयाल सक्सेना आधारित नृत्याचे सादरीकरण।  >प्रसिद्ध शिष्या संध्या देसाई, दक्षा सेठ, अदिती मंगलदास या आहेत.

बातम्या आणखी आहेत...