आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sharpshooter Siddhesh Kamble Mahakal Vs Sidhu Moosewala Murder । Ground Report From Pune Village । How Mahakal Became Criminal

मुसेवाला हत्येतील डॉनच्या गावातून रिपोर्ट:पुण्याचा सिद्धेश कांबळेचा कसा झाला महाकाल, बॉलीवूडमधून खंडणी, 5 राज्यांचे पोलिस मागे

लेखक: आशिष राय16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात पुण्यातील दोन शार्प शूटरचा सहभाग असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. यामध्ये सिद्धेश हिरामण कांबळे ऊर्फ ​​सौरभ महाकाल आणि संतोष जाधव यांचा समावेश आहे. महाकालला गेल्या आठवड्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरापासून 90 किमी अंतरावर असलेल्या अहमदनगर हद्दीतून अटक केली होती. त्याचवेळी जाधवला रविवारी गुजरातमधील कच्छमधून अटक करण्यात आली. त्याच्यासोबत नवनाथ सूर्यवंशी नावाच्या सराईत गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे. सध्या हे तिघेही 20 जूनपर्यंत पुणे पोलिसांच्या कोठडीत आहेत.

सौरभ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अहमदनगर हद्दीतून अटक केली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात कांबळेचे नाव चर्चेत आले होते.
सौरभ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अहमदनगर हद्दीतून अटक केली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात कांबळेचे नाव चर्चेत आले होते.

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेला सिद्धेश कांबळे हा पुण्यापासून 70 किमी अंतरावर असलेल्या नारायणगाव येथील गाव क्रमांक 14चा रहिवासी आहे. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, तो केवळ 17 वर्षांचा आहे, परंतु पोलिसांचा दावा आहे की तो प्रौढ आहे आणि त्याचे वय 19 वर्षे आहे. सिद्धेशला MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2021 रोजी मंचर येथील एकलहरे फकीरवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या ओंकार बाणखेले ऊर्फ ​​राण्या (24) याच्या हत्येमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

महाकालचे वय भलेही लहान असेल, पण त्याचे कारनामे इतके मोठे आहेत की अनेक गावांत त्याची दहशत आहे. दिव्य मराठीने त्याच्या आई आणि वडिलांच्या गावात पोहोचून एवढ्या लहान वयात तो एवढा मोठा गुन्हेगार कसा बनला, ज्याचा पाच राज्यांचे पोलीस शोध घेत होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील पोलिस पथकांचा समावेश आहे.

सिद्धेश कांबळे ऊर्फ 'महाकाल' याच्यावर पुण्यातील मंचर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिद्धेश कांबळे ऊर्फ 'महाकाल' याच्यावर पुण्यातील मंचर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आईने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते

महाकालच्या आईचे नाव सुनीता असून 7 वर्षांपूर्वी त्यांनी घरगुती वादातून पेट्रोल शिंपडून स्वतःला पेटवून घेतले होते. विशेष म्हणजे सुनीता यांनी घरातून पळून जाऊन हिरामण कांबळेंशी लग्न केले होते. दोघांना सिद्धेशसह एकूण चार मुले असून ते सध्या कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.

आई वारल्यावर वडील झाले मद्यपी, महाकाल बनला गुन्हेगार

आईचे निधन झाले त्यावेळी महाकालचे वय 12 वर्षेच होते आणि खामुडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत तो शिकत होता. त्याच्या एका जवळच्या नातेवाइकाने (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले की, आई गेल्यानंतर तो अनियंत्रित झाला. चालकाचे काम करणारे वडील दिवसभर दारूच्या नशेत असायचे आणि मुलगा गुन्हेगारांसोबत राहू लागला. यावेळी त्याची संतोष जाधव याच्याशीही भेट झाली. त्यानंतर जाधवने शाळा सोडली आणि अचानक गायब झाला.

नारायणगावातील खामुंडीच्या या शाळेत महाकालने 7वीपर्यंत शिक्षण घेतले आणि एके दिवशी तो येथून अचानक गायब झाला.
नारायणगावातील खामुंडीच्या या शाळेत महाकालने 7वीपर्यंत शिक्षण घेतले आणि एके दिवशी तो येथून अचानक गायब झाला.

वयाच्या 10व्या वर्षी चोरला होता मोबाईल चार्जर

सिद्धेश कांबळेच्या आणखी एका नातेवाइकाने सांगितले की, महाकाल हा लहानपणापासून गुन्हेगार होता आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला त्यांच्या घरातून मोबाइल फोन चार्जर चोरताना पकडले होते. त्यानंतर त्यांनी त्याला शिवीगाळ करून घराबाहेर हाकलून दिले.

मुसेवाला हत्याकांडाच्या एक महिना आधी तो आपल्या आईच्या गावी म्हणजेच खामुडी येथे आला होता आणि काही नातेवाइकांनाही भेटला होता. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, त्याने दाढी वाढवली होती आणि तो बाइकवरून गावात आला होता. तो काही काळ गावात राहिला आणि नंतर कुठेतरी निघून गेला.

महाकालबद्दल बोलायला घाबरतात गावकरी

ग्रामस्थ सौरभच्या विरोधात दबक्या आवाजात बोलले, परंतु कॅमेरासमोर त्यांच्या जिवाला धोका असल्याचे कारण देत त्याला ओळखण्यासही नकार दिला. मुसेवाला हत्येच्या एक महिना आधी तो गावात आला होता, असेही लोकांनी सांगितले.
ग्रामस्थ सौरभच्या विरोधात दबक्या आवाजात बोलले, परंतु कॅमेरासमोर त्यांच्या जिवाला धोका असल्याचे कारण देत त्याला ओळखण्यासही नकार दिला. मुसेवाला हत्येच्या एक महिना आधी तो गावात आला होता, असेही लोकांनी सांगितले.

सिद्धेश कांबळेची दहशत एवढी आहे की गावातील लोक त्याच्याबद्दल बोलायलाही घाबरतात. 10 हजार लोकसंख्या असलेल्या 14 क्रमांकाच्या गावात त्याच्याबद्दल उघडपणे बोलणारा एकही माणूस आढळला नाही. कांबळेचा शोध घेण्यासाठी पोलिस सातत्याने येथे चकरा मारत असल्याचे जवळपास सर्वांनीच सांगितले. महाकालमुळे त्यांचे गाव बदनाम झाले आहे. त्याचे सत्य लवकर बाहेर यावे, अशीही त्यांची इच्छा आहे. प्रमोद मेहरा नावाच्या गावकऱ्याने सांगितले की, आम्हालाही आश्चर्य वाटते की आमच्यात राहणारा मुलगा एवढा मोठा गुन्हेगार कसा काय बनू शकतो.

नातेवाइकांनी व्यक्त केला जिवाला धोका

गंगाराम बोर नावाच्या गावकऱ्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी सौरभ महाकाल याचे नाव वर्तमानपत्रात वाचले होते. मात्र, तो कुठे राहतो हे गंगारामला माहीत नाही. गंगारामप्रमाणेच महाकालचा चुलत भाऊ राजेश खुलासा करतो की, तो इतक्या लहान वयात इतका मोठा गुन्हेगार बनला आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही. त्याच्या विरोधात वक्तव्य केल्यास त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

तीन राज्यांच्या पोलिसांनी केली आहे चौकशी

महाकालला पकडणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे ग्रामीण पोलिसांचे एसपी अभिनव देशमुख म्हणाले की, आम्ही महाकालला मोक्काच्या जुन्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये त्याच्याविरुद्ध खून (302), खुनाचा प्रयत्न, 34 शस्त्रास्त्र कायद्यान्वये आणि कलम 3(1) मकोका अन्वये गुन्हा दाखल केला. गायक मुसेवाला आणि अभिनेता सलमान खानला धमकावल्याप्रकरणी महाकालची पंजाब, दिल्ली, मुंबई पोलिसांच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. अन्य राज्यांतही घडलेल्या काही गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे. अद्याप तपास सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एवढेच सांगता येईल.

14 क्रमांकाच्या या गावात महाकालचे कुटुंब राहत होते. दोन वर्षांपूर्वी ते अचानक कुठेतरी निघून गेले.
14 क्रमांकाच्या या गावात महाकालचे कुटुंब राहत होते. दोन वर्षांपूर्वी ते अचानक कुठेतरी निघून गेले.

बॉलिवूडमध्ये खंडणीचे रॅकेट चालवायचे होते महाकालला

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यामागेही महाकालचा हात होता. महाकालने आपल्या वक्तव्यात मुंबई क्राइम ब्रँचला सांगितले आहे की, सलमानला धमकावून त्याला बॉलिवूडमध्ये दहशत पसरवायची होती, जेणेकरून बड्या स्टार्सकडून खंडणीची मागणी करता येईल. सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रात म्हटले होते, 'सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची मुसेवालासारखी अवस्था होईल. जीबी आणि एलबी...' जीबी म्हणजे गँगस्टर गोल्डी ब्रार आणि एलबी म्हणजे लॉरेन्स बिश्नोई असा अंदाज बांधला जात आहे. हे दोघेही मुसेवाला हत्याकांडातील आरोपी आहेत.

महाकालच्या शूटरने केली सिद्धू मुसेवालाची हत्या

दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, महाकालच्या जवळच्या शूटरने सिद्धू मुसेवालाची हत्या केली आणि या हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईच आहे.

बातम्या आणखी आहेत...