आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह10 साक्षीदार आफताबला शिक्षेपर्यंत नेतील:यांचे जबाब श्रद्धाच्या छळाचा पुरावा, मांसाहारासाठी दबाव टाकायचा

लेखक: आशीष राय4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला पोलिसांच्या ताब्यात आहे. आफताबने मंगळवारी न्यायालयात पहिल्यांदाच गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले. मात्र, आफताबच्या वकिलाने हत्येची कबुली दिल्याचा इन्कार केला.

दरम्यान, श्रद्धाची मुंबईत राहणारी मैत्रीण पूनम बिडलान हिने दावा केला आहे की, आफताब श्रद्धाला जबरदस्तीने मांसाहार करायला लावत असे. यावरून दोघांमध्ये भांडणही व्हायचे. सामाजिक कार्यकर्त्या पूनम यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे.

दिल्ली पोलीस या प्रकरणी दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 5 राज्यांमध्ये तपास करत आहेत. यासोबतच ते श्रद्धा आणि आफताबशी संबंधित लोकांची सतत चौकशी करत आहे. आम्ही तुम्हाला या खटल्याशी संबंधित अशा 10 पात्रांबद्दल सांगत आहोत, ज्यांची साक्ष आफताबला फाशीपर्यंत पोहोचवू शकते.

विकास वालकर: श्रद्धाचे वडील

पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची ओळख पटवण्यासाठी तिचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएचा नमुना घेतला आहे. हे बॉडी पार्टच्या डीएनएशी जुळवले जातील. यावरून पोलिसांना सापडलेले बॉडी पार्ट श्रद्धाचे आहेत की नाही हे कळेल.

विकास यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, आफताब अनेकदा त्यांच्या मुलीला मारहाण करायचा. अनेकदा त्याने श्रद्धाचे केस धरून तिला ओढले होते. यानंतर त्यांनी श्रद्धाला आफताबला सोडून घरी येण्यास सांगितले होते. मात्र तिने ऐकले नाही. आफताबला जेरबंद करण्यासाठी वडिलांचा जबाब आणि डीएनए नमुना हा सर्वात मोठा पुरावा ठरेल.

गोविंद यादव मुंबईत गुडलक या नावाने पॅकर्स आणि मूव्हर्स सेवा चालवतात. 18 मे रोजी श्रद्धाच्या हत्येनंतर 18 दिवसांनी 5 जून रोजी आफताबने त्याचे सामान मुंबईहून दिल्लीला हलवले. त्यांच्या टीमने आफताबशी फोनवरून सौदा केला होता. त्यांनी 37 बॉक्समध्ये माल भरला होता.

गोविंदने सांगितले की, जेव्हा त्यांचे कर्मचारी आफताबच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचे आई-वडील तेथे उपस्थित होते. यामुळे आफताबच्या कुटुंबीयांना श्रद्धाच्या हत्येची माहिती होती का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दिल्लीत शिफ्ट झाल्यानंतर आफताब आणि श्रद्धा यांची पहिली भेट राजेश कुमार यांच्याशी झाली होती. व्यवसायाने प्लंबर असलेल्या राजेशने या दोघांना घरात पाणी कुठून येणार आणि मोटारीचे बटण कुठे आहे हे समजावून सांगितले होते.

राजेश म्हणाला- 'जेव्हा ते लोक आले, तेव्हा मी दोघांना पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी एकत्र पाहिलं. यानंतर मी अनेकवेळा त्यांच्या घरी गेलो, मात्र श्रद्धा कधीच दिसली नाही.' आफताब अनेकदा बाहेरून जेवण मागवायचा, हेही राजेशने पोलिसांना सांगितले होते.

श्रद्धाचा मुंबईत राहणारा मित्र राहुल राय याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर खूप जखमा होत्या. त्यानंतर श्रद्धाने मित्रांची मदत मागीतली होती.

राहुलच्या म्हणण्यानुसार, श्रद्धाला मदत करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही श्रद्धाने मुंबई पोलिसांना सांगितले होते की, आफताब तिला वारंवार मारहाण करायचा.

मुंबईत राहणारा गॉडविन श्रद्धाला ओळखत नव्हता, मात्र त्याचा भाऊ श्रद्धाचा मित्र होता आणि तो तिच्या ऑफिसमध्ये कामाला होता. दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात गॉडविनने म्हटले आहे की, एकदा आफताबने श्रद्धाला मारहाण करतक तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यानंतर श्रद्धाने ऑफिसच्या मित्रांकडे मदत मागीतली होती.

त्यावेळी गॉडविनचा भाऊ दूसरीकडे कुठेतरी होता, म्हणून त्याने गॉडविनला पाठवले होते. त्यानेच श्रद्धाला रुग्णालयात दाखल केले होते. गॉडविनला श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या अनेक भागांवर जखमांच्या खुणा दिसल्या होत्या. त्यावेळी गॉडविनने श्रद्धाला पोलिसांकडेही नेले होते. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. श्रद्धाने गॉडविनला सांगितले होते की, आफताबने तिला यापूर्वीही अशीच मारहाण केली होती.

24 नोव्हेंबर 2020 रोजी आफताबने श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. ही गोष्ट श्रद्धाने तिचे मॅनेजर करण बारी यांना व्हॉट्सअॅपवर सांगितली होती. मारहाणीमुळे मला उठता येत नाही, असे श्रद्धाने चॅटमध्ये सांगितले होते. त्यामुळे मी काम करू शकत नाही असे तिने म्हटले होते.

श्रद्धाने लिहिले की, ती घरी गेल्यानंतर सर्व काही ठीक झाले. तो आता बाहेर जात आहे. मी आज काम करू शकणार नाही, कारण कालच्या भांडणामुळे तिचा बीपी खाली आला असावा. हे विधान आफताबविरोधात मोठा पुरावा ठरू शकते.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर करवतीने मृतदेह कापताना आफताबचा हात कापला गेला होता. त्यांच्यावर दिल्लीतील डॉ.अनिल कुमार यांनी त्याच्यावर उपचार केले होते. त्यांनी सांगितले की त्या रात्री आफताब आला तेव्हा तो नॉर्मल होता. त्याला हात कापण्याचे कारण विचारले असता त्याने फळ कापताना हात कापल्याचे सांगितले. डॉ.अनिल यांनी पोलिसांसमोर आफताबला ओळखले आहे.

2019 मध्ये श्रद्धाने तिचा मित्र रजत शुक्लाला सांगितले होते की ती 2018 पासून आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लिव्ह-इनमध्ये राहत आहे. सुरुवातीला ते खुश होते, पण आता आफताब तिला मारहाण करतो. तिचे जीवन नरक बनले आहे. तिला त्याला सोडायचे आहे, परंतु असे करणे तिच्यासाठी कठीण झाले आहे.

रजतच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत येण्यापूर्वी दोघांनी तिथे जॉब करण्याचा निर्णय सहमतीने घेतला होता. दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर त्याचा श्रद्धाशी संपर्क जवळपास संपला होता.

लक्ष्मणने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाने दिल्लीला गेल्यानंतर त्याच्या मेसेजला रिप्लाय करणे बंद केले होते. काही दिवसांनी तिचा नंबर बंद झाला. यानंतर लक्ष्मणला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने श्रद्धाच्या भावाला सांगितले की, त्याचे तिच्याशी शेवटचे जुलैमध्ये बोलणे झाले. मग त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मणने दिल्ली पोलिसांना सांगितले की, श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. एकदा त्यांचे भांडण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणार होते, पण श्रद्धाने पुन्हा नकार दिला. एका रात्री श्रद्धाने तिला तिथून दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाण्याचा मेसेज केला. ती इथे राहिली तर आफताब तिला मारून टाकेल. आम्ही तिच्या घरी गेलो आणि आफताबला सांगितले की ते पोलिसांकडे जातील, पण श्रद्धाने तसे करण्यास नकार दिला.

आफताबने ज्या दुकानातून करवत खरेदी केली होती त्या दुकानाचा मालक सुदीप सचदेवा आहे. या करवतीने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. सचदेवाने सांगितले की, आफताब करवत खरेदी करण्यासाठी आला तेव्हा तो पूर्णपणे सामान्य होता. पोलिसांनी त्याला त्याच्या दुकानात आणले तेव्हाही त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप नव्हता.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी 19 मे रोजी छतरपूर येथील एका दुकानातून नवीन फ्रीज विकत घेतला. येथे काम करणाऱ्या कुलदीप सिंह यांनी सांगितले की, आफताबने फ्रीजसाठी 25,300 रुपये दिले होते. सुमारे अर्धा तास तो दुकानात थांबला होता. त्याने कुलदीपला जास्त जागा असलेला फ्रीज दाखवायला सांगितले होते.

आफताब आणि श्रद्धा दुबईला जाण्याचा विचार करत होते

रोजच्या भांडणांना कंटाळून आफताब आणि श्रद्धा भारत सोडून दुबईत राहण्याचा विचार करत होते, असा दावा श्रद्धाच्या मित्रांनी केला आहे. दोघांना दुबईत नवीन आयुष्य सुरू करायचे आहे, असे श्रद्धाने एका मैत्रिणीला सांगितले होते. मात्र, श्रद्धाच्या मैत्रिणींनी तिचे भारत सोडू नये म्हणून समजावले होते.

आफताबने श्रद्धाच्या आधी चार हिंदू मुलींना डेट केले होते

पोलीस आफताबच्या श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच्या आयुष्याचीही माहिती गोळा करत आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धासोबत ओळख होण्यापूर्वी 4 मुलींना डेट केले होते. यापैकी दोघींपर्यंत पोलिस पोहोचले असून, दोघींशी अद्याप संपर्क झालेला नाही. आफताबने त्यांचेही शोषण केले का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही मुली हिंदू आहेत.

बातम्या आणखी आहेत...