आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हश्रद्धा खून प्रकरणाचा तपास 11 पुराव्यांवर:खुनाचे हत्यार आणि मृतदेहाचे शीर सापडले नाही तरी आफताबला फाशी

वैभव पळनीटकर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून खून केल्यानंतर आफताब पूनावालाने पुढील 10 तास बाथरूममध्ये शॉवर चालवून तिच्या शरीराचे तुकडे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर 35 तुकडे चांगले धुऊन पॉलिथिनमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले होते. Zomato वरून जेवण ऑर्डर केले, जेवण केले, बिअर पिला आणि Netflix बघत झोपी गेला.

आफताब 18 दिवस मेहरौलीच्या जंगलात तुकडे फेकत राहिला, असाही आरोप आहे. श्रद्धाचा फोन फेकून दिला, त्याचा OLX वर विकला. फ्लॅटमधील रक्ताचे डाग एवढ्या रसायनाने धुतले की पुरावे मिळाले नाहीत. मुंबई पोलिसांनाही फसवले.

ज्याने एवढी तयारी केली त्याला आपण पकडले जाईल असे कधीच वाटले नव्हते. आता तो पकडला गेला आहे, पण ना खुनाचे हत्यार सापडले, ना श्रद्धाच्या मृतदेहाचे शीर. आफताब त्याच्या कबुलीजबाबावरुन फिरला गेला तर काय होईल?

याला उत्तर देताना यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह म्हणतात की, आफताबने स्वतः त्याच्या डेथ वॉरंटवर सही केली आहे. शरीराचे तुकडे करून आणि खुनाचे हत्यार लपवून ठेवल्याने तो वाचेल, असे त्याला वाटत असेल तर तो फार चुकीचा आहे. त्याच्याविरुद्ध असे पुरावे आहेत की जे त्याला फासावर घेऊन जाऊ शकतील.

श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबला कोर्टाकडून आणखी 5 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. मात्र, पोलिसांना 10 दिवसांची कोठडी हवी होती. पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिस आफताबला उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगीही पोलिसांना मिळाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पोलिसांना श्रद्धा हत्याकांडाशी संबंधित 11 महत्त्वाचे पुरावे आणि साक्षीदार सापडले असून, त्यापैकी अधिक परिस्थितीजन्य पुरावे आहेत. हत्येचे हत्यार किंवा मृतदेहाचे शीर अद्याप सापडलेले नाही.

गुरुवारी आरोपी आफताबला मेहरौलीतील त्याच फ्लॅटमध्ये आणण्यात आले होते जिथे श्रद्धाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही पोहोचली आणि या टीमचे नेतृत्व संजीव गुप्ता करत होते. फॉरेन्सिट टीमने फ्लॅटच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरावे गोळा करण्यात तासन् तास घालवले. गुन्ह्याच्या ठिकाणी, टीमला स्वयंपाकघरात फक्त एकाच ठिकाणी रक्ताच्या खुणा आढळल्या.

पोलिसांकडे 5 महत्त्वाचे साक्षीदार...

1. लक्ष्मण नादर (श्रद्धाचा मित्र)

लक्ष्मण हा श्रद्धाचा जवळचा मित्र होता, ज्याच्याशी ती बोलायची. जूनमध्ये जेव्हा श्रद्धाचा फोन बंद लागला तेव्हा त्याने श्रद्धाचे वडील विकास यांना याबाबत सांगितले होते. लक्ष्मण यांच्या माहितीनंतर वडिलांचा संशय बळावला, त्यानंतरच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांत तक्रार दाखल केली. श्रद्धाने लक्ष्मणला सांगितले होते की, तिचे आणि आफताबचे नाते चांगले राहिलेले नाही.

2. राजेंद्र कुमार (घर मालक)

श्रद्धा आणि आफताब मुंबईहून दिल्लीत स्थायिक झाले आणि त्यांनी मेहरौली टेकडी परिसरात दोन रुमचे घर घेतले. त्याचे भाडे नऊ हजार रुपये होते. घरमालक राजेंद्र कुमार यांनी पोलिसांना सांगितले की, आफताब आल्यानंतर पाण्याचे बिल जास्त येऊ लागले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि शरीर कापण्याचा आवाज येऊ नये म्हणून पाण्याचा नळ चालू ठेवला होता.

3. डॉ. अनिल सिंग (ज्यांनी आफताबच्या जखमेवर उपचार केले)

डॉक्टर अनिल सिंग यांनी पोलिसांना सांगितले आहे की, आफताब मे महिन्यात त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याच्या हातावर कापलेली जखम होती. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर उपचार केले. डॉ.अनिल यांना काहीही असे वाटले नाही, ज्यामुळे त्यांना तेव्हा संशय आला असता.

4. सुदीप (ज्याच्या दुकानातून आफताबने चाकू विकत घेतला)

सुदीपचे दिल्लीतील मेहरौली छतरपूर भागात घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणांचे दुकान आहे. या दुकानातून आफताबने धारदार शस्त्रे खरेदी केली होती. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले असून, त्यांचे फुटेजही तपासले जात आहे.

5. तिलकराज (ज्यांच्याकडून आफताबने फ्रीज विकत घेतला)

तिलकराज यांनी सांगितल्याप्रमाणे, आफताब 19 मे रोजी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात आला होता. त्याने एलजीचा 260 लिटरचा डबल डोअर फ्रीज घेतला होता. आफताबने सांगितले की त्याला एक मोठा फ्रीज हवा आहे, ज्यामध्ये जास्त जागा असेल. मात्र, तो सामान्य ग्राहकाप्रमाणे वागत होता.

हजारो प्रकरणांमध्ये मृतदेह सापडला नाही तरीही गुन्हेगाराला शिक्षा झाली

माजी डीजीपी विक्रम सिंह यांच्या मते, दिल्ली पोलिसांची फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपासणीची क्षमता खूप चांगली आहे. आफताबसारख्या दुष्ट आरोपीला दिल्ली पोलिसांनी जास्त काळ रिमांड घ्यायला हवा होता. आफताबने आपली सर्व हुशारी दाखवली आणि खुनाचे हत्यार आणि मृतदेह सापडला नाही तर आपण वाचू असे त्याला वाटले, पण खुनाचे हत्यार आणि मृतदेह न सापडताही दोषींना शिक्षा झाल्याची हजारो प्रकरणे आहेत.

आफताबची हत्येची पूर्व तयारी आणि त्यानंतर हत्येनंतर लपण्यासाठी त्याने जे काही केले, तेच पुरावे त्याला फासावर नेतील. कोणत्याही खुनाच्या प्रकरणात 6 प्रकारचे पुरावे आणि साक्षीदार असतात, प्रत्यक्षदर्शी साक्षीशिवाय पोलिसांकडे सर्व काही असते.

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा म्हणतात की, हत्येचे दोन प्रकार आहेत. एक ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतात आणि दुसरे ज्यामध्ये साक्षीदार नसतात पण परिस्थितीजन्य पुरावे असतात. खुनाच्या अनेक दिवस आधी मृतदेहाची विल्हेवाट लागेपर्यंतच्या हालचाली पाहून असे पुरावे पोलिसांना गोळा करावे लागतात.

या प्रकरणाच्या तपासाची ही केवळ सुरुवात आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना बराच अवधी आहे. सध्या पोलिसांनी केवळ आफताबची चौकशी करून मूलभूत तथ्ये गोळा केली आहेत. यावर फॉरेन्सिक तपासणी अहवाल तयार केला जाईल.

पांडवनगर आणि त्रिलोकपुरी येथे सापडले मानवी अवयव संशयाच्या भोवऱ्यात

आफताबने अजूनही पोलिसांना सांगितले नाही की, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे शीर कुठे फेकले होते. आता 18 मे नंतर दिल्ली-एनसीआरमध्ये जिथे जिथे मानवी शरीराचे अवयव सापडले त्या प्रकरणांचाही पोलिस तपास करत आहेत. पांडवनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिलोकपुरी येथे जून महिन्यात सापडलेल्या मानवी मृतदेहाची पोलिस सध्या चौकशी करत आहेत. येथे एका रिकाम्या प्लॉटमध्ये डोके, हात आणि पायाचा काही भाग आढळून आला होता.

जूनमध्ये हे तुकडे आठवडाभरात तीन वेळा एकाच ठिकाणी फेकण्यात आले. पोलिसांनी त्यांचे डीएनए प्रोफाइलिंग केले होते. त्यांचा डीएनए आता मेहरौली आणि श्रद्धाच्या वडिलांकडून सापडलेल्या तुकड्यांशी जुळतो का, ते पाहण्यात येणार आहे.

दारू पिऊन श्रद्धाच्या शरीराचे केले 35 तुकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने सांगितले की, त्याला श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसेतरी बाहेर काढायचे होते. त्याने त्याच्या आवडत्या टीव्ही शो 'डेक्स्टर'मधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना पाहिली होती. तो दारू प्यायचा, नंतर तोंडाला कपडा बांधायचा किंवा वास येऊ नये म्हणून मास्क लावायचा. हे करत असताना तो अनेकवेळा रडला देखील, पण अटक होण्याच्या भीतीने तो मृतदेहाचे तुकडे करून टाकत राहिला.