आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अष्टविनायक महिमा |पालीचा श्री बल्लाळेश्वर:दगडी सिंहासनावर आसनस्थ श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा हा अष्टविनायकातील एकमेव गणपती

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणजे पालीचा श्री बल्लाळेश्वर. रायगड जिल्ह्यातील हे दुसरे अष्टविनायकाचे स्थान. आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा हा अष्टविनायकातील एकमेव असा गणपती मानला जातो.

अख्यायिका : बल्लाळचे गजानन

पुरातन काळात पाली ‘पल्लीपूर’ या नावाने ओळखले जात असे. यात कल्याण नावाचा एक व्यापारी होता. त्याचा मुलगा बल्लाळ हा गणेश भक्त होता. बल्लाळ आपल्या सवंगड्यांसोबत वनात जाऊन गजाननाची मूर्ती बनवत व खेळत. कल्याणला हे मुळीच पटत नसे. त्याने एकेदिवशी बल्लाळला यापासून परावृत्त केले. परंतु, बल्लाळने गणेश भक्ती सोडली नाही. गजाननाने प्रसन्न होत बल्लाळला वरदान दिले व गावातच रहाण्याचे मान्य केले.

मुर्तीची वैशिष्ट्ये : पुर्वाभिमुख मूर्ती

बल्लाळने शिळेपासून एक मूर्ती तयार केली होती. ती मूर्ती आजही पालीत आहे. ही मूर्ती धुंडीविनायक म्हणून ओळखली जाते. पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी धुंडीविनायकाचे हे मंदिर आहे. बल्लाळेश्वर दगडी सिंहासनावर विराजमान आहेत. हे मंदिर आधी लाकडी स्वरूपाचे होते. पेशव्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला व नंतर मंदिराचे दगडी बांधकाम करण्यात आले. मंदिरातील मूर्ती ही तीन फूट उंच व रुंद आहे. बल्लाळेश्वराची मूर्ती पुर्वाभिमुख असून मूर्तीच्या डोळ्यात व नाभीमध्ये हिरे बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या समोर मोठी घंटा आहे.

> औरंगाबाद ते पाली हे अंतर ३४१ किमी एवढे आहे. नाशिक ते पाली हे अंतर २४१ किमी एवढे आहे. > पुणे ते पाली हे अंतर १२१ किमी एवढे असून रस्ते मार्गानाचे येथे जाता येते.