आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिलीपकुमार आज हयात असते तर ते १०० वर्षांचे झाले असते. या निमित्ताने आज दिलीप साहेबांसोबतच्या ‘मशाल’च्या सेटवरील माझ्या पहिल्या भेटीची आठवण सांगणार आहे...
का ही दिवसांपूर्वी मी लिहिले होते की, ‘कुछ दिल ने कहा’ या सदरात असे लेख असतील, ज्यात दुसऱ्यांवर आेढवलेल्या आणि स्वत: अनुभवलेल्या काही प्रसंगांचे वर्णन असेल. आज माझ्या काही आठवणी सांगणार आहे. भूली बिसरी चंद उम्मीदें, चंद फ़साने याद आए। तुम याद आए और तुम्हारे साथ ज़माने याद आए।। ११ डिसेंबर २०२२! दिलीपकुमार आज हयात असते, तर ते १०० वर्षांचे झाले असते. इन्ना लिल्लाही वा इन्ना इलाही राजी’ऊन! याचा अर्थ ‘निःसंशयपणे आम्ही अल्लाहचे आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परत जाणार आहोत!’ (क़ुरान-ए-पाक - सूरा २ अल बक़रा आयत १५६). दिलीपकुमार यांना मी पहिल्यांदा राज कमल स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या ‘मशाल’ चित्रपटाच्या सेटवर पाहिले होते. ‘मी दिलीपकुमार यांना भेटलो’ असे म्हणणे रास्त नाही. कारण माझी अगदीच छोट्या, पण एखाद्या एक्स्ट्रा, ज्युनिअर आर्टिस्टपेक्षा जास्त संवाद असलेल्या दृश्यासाठी निवड झाली होती. चार हजार रुपये मानधन ठरले होते. त्याची मला गरज होती, परंतु पेमेंट मागण्याची हिंमत नव्हती. मला ना रंग-रुप होतं, ना व्यक्तिमत्त्व. पण, प्रतिभेचा सांगाडा एक्स- रे सारखा असतो, तो फक्त ट्यूबलाइटच्या प्रकाशात पाहता येतो. फोटो बघून तरी काय करणार बाबू? ते तर कचऱ्याच्या डब्यातच टाकण्याच्या लायकीचे असतात. असो.
दिलीपकुमार यांना वहिदा रहमान यांच्याकडे जाताना मी पाहिले. दिलीपकुमार यांनी त्यांच्या जवळ जाऊन वहिदांना सलाम केला. वहिदांंना गोंधळलेल्या पाहून ते म्हणाले, ‘आमच्याकडे नेहमी मोठ्यांना सर्वांत आधी सलाम केला जातो, म्हणून तुम्हाला सलाम!’ ही मस्करी होती, परंतु यात दिलीपकुमार यांची श्रेणी दिसून येते होती. काही दिवसांनंतर पाली हिल, वांद्रे येथील भल्ला हाऊसमध्ये एक दृश्य चित्रीत होत होते, ज्यात मला दिलीपकुमारांंच्या कानात काहीतरी कुजबुजायचे होते. माझा कोणताही संवाद नव्हता, फक्त ओठांची हालचाल करायची होती. शॉट ‘ओके’ झाल्यावर यश चोप्रा गमतीने मला म्हणाले, ‘तू युसूफ साहेबांच्या कानात हवामानाचा अंदाज तर सांगत नव्हतास ना?’ दिलीपकुमार लगेच म्हणाले, ‘नाही, या मुलाला जे बोलायचे होते, तेच तो बोलला!’ पुढे एकदा सुभाष घईंच्या घराच्या गच्चीवर पार्टी सुरू होती तेव्हा मी त्यांना दुसऱ्यांदा पाहिले. त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोललो. ते गुणगुणत होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि नमस्कार करुन त्या रागाचे नाव सांगितले- ‘चारुकेशी!’ आता कुठे राजाचे या रंकाकडे लक्ष गेले आणि ते माझ्याशी बोलायला लागले. मग आणखी एक राग आळवत त्यांनी त्याचे नाव विचारले. सुदैवाने मला त्या रागाचे नाव माहीत होते आणि लगेच मी ‘भटियार’ असे सांगितले. त्यांना माझ्याशी गप्पा मारण्यात मजा येत होती, हे मला जाणवले. नंतर ते म्हणाले, ‘मी लयीत जरा गडबडतो, मी कच्चा आहे.’ मी म्हणलो, ‘सर, असे म्हणतात की, बेसूर असले तरी चालेल पण बेताल असू नये. हा गायकीतील सर्वांत मोठा अवगुण मानला जातो.’
१९९७ मध्ये एके दिवशी, बेबी फरीदा (आता ती मोठी झाली होती) आणि प्रॉडक्शन कंट्रोलर बशीर भाई माझ्या ऑफिसमध्ये एका चॅट शोची ऑफर घेऊन आले होते. दिलीपकुमार आणि त्यांच्या पत्नी सायराबानू यांना माझ्याकडून त्या शोचे सूत्रसंचालन करुन घ्यायचे होते. (खरं सांगायचं तर टीव्हीवर ‘अंताक्षरी’ आल्यानंतर दिवस बदलू लागले होतेे). नंतर या शोच्या संदर्भात माझ्या त्यांच्याशी भेटी होत राहायच्या. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही चित्रपटातील कलाकारांना / स्टारला मी कोणतेही उथळ किंवा हलके प्रश्न विचारणार नाही. आम्ही चित्रपटांतील कलाकारांची त्यांच्या चित्रपटासंदर्भात सगळी माहिती ठेवतो, पण एखादा कलाकार कुणाचा मुलगा आहे, त्याला बहीण आहे का? भाऊ आहे का? तो कुणाचा पिता आहे? कुणाचा नातू आहेत? त्याला कुणी आजोबा आहे का? खरं तर, मला कलाकारांच्या अशा वेगळ्या पैलूंना समोर आणायचे होते, त्यासाठी मला काही खास संशोधन किंवा तयारीची गरज वाटली नाही. मला केेवळ त्या व्यक्तीच्या मनात दडलेल्या लहान मुलाला बाहेर काढायचे होते.
चित्रीकरण सुरू झाले आणि मी एका दिवसात प्रत्येकी तीन चित्रपट कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. हे सर्वांसाठी अनपेक्षित होते. चॅनलवाले एपिसोड्स पाहून नाचायला लागले. तेव्हा या अन्नू कपूरमध्ये काय दडलेले आहे, ते बॉस लोकांना समजले. या मालिकेचा दिग्दर्शक माझा मित्र अजित श्रीवास्तव होता. दिलीपकुमार कधी-कधी त्यांच्याकडे माझी तक्रारही करायचे.. ‘भाई, अन्नूला सांगितलं की कधी कधी रिहर्सलही करत जा, मोठे कलाकार येणार आहेत. तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं- सर, काळजी करु नका, ईश्वर मार्ग दाखवेल. आणि ईश्वर नेहमी या शहाण्याला मार्गही दाखवतोही..’ आए कुछ अब्र कुछ शराब आए उसके बाद आए जो अज़ाब आए कर रहा था ग़म ए जहां का हिसाब आज तुम याद बेहिसाब आए फ़ैज़ थी राह सर बसर मंजिल हम जहां पहुंचे कामयाब आए। ११ डिसेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी यांचाही जन्मदिवस आहे. मी त्यांना सलाम करतो! माझ्या आयुष्यातील दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मला त्यांच्या हस्ते मिळाला.
ते इंग्रजीत म्हणतात ना, ‘लास्ट बट नॉट लीस्ट’, तर ११ डिसेंबर हा भारतातील एक विद्वान, तत्त्वज्ञानी मिस्टिक (रहस्यवादी) व्यक्ती आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असलेल्या अनिल चौधरी साहेबांचाही वाढदिवस आहे. (जेव्हा चित्रपट निर्माते मला विनोदी भूमिका देत होते, तेव्हा कुठलाही विरोध न जुमानता त्यांनी ‘कबीर’च्या भूमिकेसाठी माझी निवड केली. ते मोठ्या मनाचे होते, त्यांना माझ्या प्रतिभेवर विश्वास होता). मी अनिल साहेबांच्या घरून ‘तेरा साई तुझ में’ आणि ‘नये भारत की खोज’ ही दोन पुस्तके आणली. या दोन्ही पुस्तकांत ओशो रजनीश यांनी दिलेली प्रवचने होती. या पुस्तकांमध्ये नवीन कल्पना, नवे आयाम, नवा दृष्टिकोन होता. त्या दिवसापासून माझ्यात एक नवी ऊर्जाच संचारली, आणि त्याची जाणीवही खूप विस्मयकारक होती. ते वाचायला सुरूवात केली तेव्हापासून मी कोणत्या विश्वात रमून गेलो, ते मला कळलेही नाही. १९९५ मध्ये मला ओशो आश्रमात एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानासाठी निमंत्रण आले. माँ साधना, वारंवार मला बायोडाटा मागत होत्या आणि मीही न देण्यावर ठाम होतो. तथापि, ९ जुलै १९९५ ला संध्याकाळी मी कार्यक्रमाला गेलो आणि स्वामी कीर्ती वेदांत यांनी मला व्यासपीठावर आमंत्रित केल्यावर विचारले की, तुम्ही तुमचे लाइफस्केच / बायोडाटा का पाठवला नाही? तेथे उपस्थित प्रेक्षकही उत्सुक दिसत होते. मी उत्तर दिले, ‘ज्यांनी माझ्यात आपण कुणीही नसल्याची भावना जागृत केली, त्यांच्याच आश्रमात माझा बायोडेटा कसा पाठवू? मी माझ्या कर्तृत्वाबद्दल काय सांगू? मी कुणीच नाही, मी मूर्ख आहे, ही जाणीवच माझ्यासाठी पुरेशी आहे’. पाब्लो नेरुदा यांनी लिहिले आहे, ‘ज्याला काहीच कळत नाही अशी व्यक्तीदेखील निखळ बौद्धिक गोष्टी लिहू शकतो!’ मैं बनफूल भला मेरा कैसा खिलना, क्या मुरझाना मैं तो उनमें से हूं जिनका, जैसा आना वैसा जाना। माझा नमस्कार स्वीकार करावा! जय हिंद! वंदे मातरम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.