आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष: 4 हटके शाळांची भन्नाट स्टोरी:कुठे संग्रहालयात वर्ग, तर कुठे किराणा यादीचे धडे; चित्रपट पाहूनही शिकवले जाते

लेखक: एकता सिन्हा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवरिश - द म्युझियम स्कूल, भोपाळ
इनोव्हेशन -
द रिजनल सायन्स सेंटर, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, एमपी स्टेट आर्किओलॉजी म्युझियम, रिजनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आणि एमपी ट्रायबल म्युझियममध्ये लावलेली पेंटिंग, आर्टिफॅक्टसमधून शिकतात मुले.
इथे दररोज म्युझियममध्ये भरतो वर्ग
शिक्षक दिनासाठी इनोव्हेटिव्ह शाळेचा शोध घेत होते. दोन चार मित्रांनाही सांगितले होते की, पारंपरिक पद्धतींपेक्षा हटके पद्धतीने मुलांना शिकवणाऱ्या शाळांबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा.
तेव्हा एका मित्राने विचारले, तु म्युझियममध्ये का जातेस?
मी विचारले, माझ्या प्रश्नाच्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारण्याचा अर्थ काय?
तो म्हणाला, आधी उत्तर दे, मग सांगतो.
मी म्हणाले, कोणत्याही स्थळाची संस्कृती, इतिहास आणि कला पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी.
बरोबर, पण मला अशी शाळा माहिती आहे, जिथे वर्ग हाच म्युझियम आहे.
भोपाळच्या लोकांसाठी ही शाळा नवी नाही. पण उत्तर ऐकल्यानंतर माझी जिज्ञासा मला या शाळेपर्यंत घेऊन आली.
या शाळेचे संस्थापक शिबानी आणि प्रदीप घोष यांची भेट झाली रिजनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये. हे म्युझियम त्या दिवशीसाठी मुलांचा वर्ग होते. मुलांनी म्युझियमबाहेर प्रार्थना म्हटली आणि शिक्षक शिबानींसह ते शिकण्यासाठी आत गेले.

शाळेचे संस्थापक शिबानी आणि प्रदीप घोष.
शाळेचे संस्थापक शिबानी आणि प्रदीप घोष.

या शाळेत शिक्षण घेणारी मुले ती आहेत, ज्यांनी कदाचित स्वप्नातच शाळेत जाण्याचा विचार केला असेल. ही मुले पैसे कमावण्यासाठी चहाच्या दुकानावर काम करतात, किंवा कचरा वेचतात. त्यांच्यासोबत मीही संग्रहालयात आत गेले. परवरिशमध्ये संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू पाहून त्यातून विषय निवडला जातो. मुले दररोज दोन तास शिकतात. शिबानी आणि प्रदीप गेल्या 17 वर्षांपासून हे करत आहेत. 2005 मध्ये त्यांनी या शाळेचा पाया रोवला. या शाळेत हे बघितले जात नाही की मुलांना किती लिहिता वाचता येते. त्याऐवजी मुलांना काय येते याकडे परवरिशचे संस्थापक अॅडमिशन देताना लक्ष देतात. शिबानी आणि प्रदीप असे मानतात की, मुले ढ नसतात. त्यांच्याकडे कोणतेतरी ज्ञान, कौशल्य असतेच. आपल्याला ते बिल्डअप करायचे असते. एक स्टेप वर. यासाठी मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. गोष्ट सांगून. आपले म्हणणे सविस्तरपणे समजावण्यासाठी प्रदीप यांनी एका मुलाला बोलावले. तो मुलगा कचरा वेचण्याचे काम करायचा. त्याला त्यांनी विचारले, तुम्ही प्लास्टीक आणि लोखंड वेगळे कसे करतात? त्याने लगेच उत्तर दिले की, प्लास्टीक तर लवकर तुटते आणि लोखंड मजबूत असते. नंतर भांडी घासणाऱ्या मुलांना विचारले तुम्ही भांडी कशी स्वच्छ करतात? उत्तर मिळाले की, कधी साबणाने तर कधी मातीने. नंतर पुन्हा विचारले, मातीतही साबण असते का? मुले म्हणाली नाही, पण मातीने तेलकटपणा सहजपणे निघतो. राखेनेही तेलकटपणा लगेच निघतो. या उत्तरांनी हे सिद्ध होते की, मुलांना मुलभूत आकलन आहे. आता राखेने तेलकटपणा कसा जातो हे नॉलेज बिल्टअप करायचे आहे. अशा पद्धतीने त्यामागील विज्ञान समजणे सोपे जाते.

शिबानी म्हणतात- म्यूजियममध्ये शब्द शिकल्याशिवायही ज्ञान मिळू शकते. याची जाणीव झाल्यानंतर आम्ही ही जागा टीचींग नीड म्हणजेच गरजेप्रमाणे वापरत आहोत.
शिबानी म्हणतात- म्यूजियममध्ये शब्द शिकल्याशिवायही ज्ञान मिळू शकते. याची जाणीव झाल्यानंतर आम्ही ही जागा टीचींग नीड म्हणजेच गरजेप्रमाणे वापरत आहोत.

परीक्षा कशी घेतली जाते, म्हणजेच मुलगा पास झाला किंवा नापास झाला हे कसे ठरवले जाते असे मी नंतर विचारले.
प्रदीप म्हणाले, मुले किती शिकली, किती बरोबर-चूक, हे तपासण्याची पद्धत वेगळी आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. हेही उदाहरणातून समजून घेऊया...
दोन शिक्षकांकडे 10-10 मुले आहेत. जे त्या मुलांना शिकवत आहेत. दे दररोज एका वहीत ते लिहत असतात. दर तीन महिन्यांनी शिक्षकांकडील मुले आणि वह्या बदलल्या जातात. त्यानंतर नवे शिक्षक आधीच्या शिक्षकांची वही पाहून मुलांना प्रश्न विचारतात. दुसरे शिक्षकही असेच करतात.
इथे प्रश्न पारंपरिक शिक्षकांप्रमाणे विचारले जात नाही. मुलांना प्रेमाने विचारले जाते की हे तर मला माहितीच नाही. तुम्ही सांगा हे काय आहे. यानंतर मुलांची उत्सुकता वाढते आणि ते प्रश्नाचे उत्तर देतात. यात परीक्षेची भीती नसते आणि निश्चित केले जाते की मुलाने काय किती शिकले आणि समजून घेतले.
जी मुले थोडी संथ असतात, त्यांच्या मदतीचे काम त्यांच्याच एखाद्या मित्राला दिले जाते.
अनेक मुले आहेत, जे साक्षर नाही. याचेही शिक्षण सोबतच सुरू असते. जेव्हा मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्याला पारंपरिक शाळेत जाण्याची इच्छा वाटू लागते, तेव्हा त्याचे अॅडमिशन शाळेत केले जाते. काही मुलांना वाटते की शाळेत त्यांची थट्टा केली जाईल, त्यांच्यावर दबाव टाकला जात नाही. त्यांना ओपन स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवले जाते.
यानंतर मी दुसऱ्या इनोव्हेटिव्ह शाळेच्या शोधाला सुरूवात केली. नंतर मला मिळाली...
वीणा वादिनी पब्लिक स्कूल, बुधेला गाव, मध्य प्रदेश
इनोव्हेशन - इथली मुले दोन्ही हातांनी लिहू शकतात. यांना पहिलीपासूनच याचे ट्रेनिंग दिले जाते.
मुले एका हाताने हिंदी तर दुसऱ्या हाताने इंग्रजी लिहितात

8 जुलै 1999 रोजी जेव्हा शाळेची सुरूवात झाली तेव्हा इथले 90% लोक अशिक्षित होते. त्यांना शाळेत आणणे कठीण होते. त्यांच्या पालकांना समजवावे लागले कि शिकल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.
8 जुलै 1999 रोजी जेव्हा शाळेची सुरूवात झाली तेव्हा इथले 90% लोक अशिक्षित होते. त्यांना शाळेत आणणे कठीण होते. त्यांच्या पालकांना समजवावे लागले कि शिकल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.

मध्य प्रदेशच्या सिंगरौलीपासून 35 किमी अंतरावर बुधेला नावाचे गाव आहे. हे डोंगरांनी वेढलेले गाव आहे. एकेकाळी इथे रस्ते आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही नव्हत्या. इथली मुले केवळ गायी-म्हशी चारण्याचेच काम करत होते. आज इथल्या वीणा वादिनी पब्लिक स्कूलच्या मुलांच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. ही मुले दोन्ही हातांनी लिहू शकतात. यामुळे ही मुले तीन तासांचे पेपर सव्वा तासातच पूर्ण करतात.
या शाळेचे संस्थापक आहेत, बिरंगद प्रसाद शर्मा. त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतलेली आहे. इनोव्हेशनमागील विचार ते सांगतात...
मी 1996 मध्ये 12 व्या इयत्तेत शिकत होतो. तेव्हा एका पुस्तकात मी वाचले की नालंदा विद्यापीठातील मुले दररोज 32 हजार शब्द लिहित होते. ते माझ्या मनात कोरले गेले. यादरम्यान परीक्षा सुरू झाल्या. तेव्हा एका विषयाचे दोन पेपर असायचे. त्यात शॉर्ट आन्सर, लाँग आन्सर, ऑब्जेक्टीव्ह अशा प्रकारचे प्रश्न असायचे.
लिहिताना काहीतरी सुटून जायचेच. माझ्यासोबतही असेच झाले. परीक्षेतील सर्व प्रश्नांची उत्तरे न लिहिल्याचे दुःख मला होत होते. मी असा विचार केला की, मी हे का करू शकत नाही. नालंदा विद्यापीठातील विद्यार्थी कसे लिहित असावे. नंतर विचार केला की ते नक्कीच दोन्ही हातांनी लिहित असावे. यानंतर मीही सराव सुरू केला.
पहिल्यांदा सरावानंतर एका हाताने मी 28 शब्द लिहायचो. दोन्ही हातांचा वापर केला तर 32 शब्द झाले. असे करत करत शब्द वाढवत गेलो. स्पीड वाढवण्यासाठी 3 वर्षे लागली. सराव खूप गरजेचा आहे. 32000 शब्द 9 तास 11 मिनिटांत लिहिण्याचा विक्रम केला.
नंतर पालकांना समजावून त्यांना राजी करून मी माझ्या मिशनचे काम सुरू केले. मुलांना एकदाच दोन्ही हातांनी दोन लिपींमध्ये लिहिण्याचे प्रशिक्षण द्यायला मी सुरूवात केली. आमच्या शाळेत हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि संस्कृचत हे विषय शिकवले जातात.
बिरंगद प्रसाद शर्मांचे म्हणणे मी लक्षपूर्वक ऐकत होते. ते म्हणाले, तुमच्यासारखे अनेकजण आहेत, ज्यांना आमच्या मुलांविषयी ऐकून आश्चर्य वाटते. मी सर्वांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्ही बुधेलात या आणि या मुलांना भेटा.
बिरंगद प्रसाद शर्मांच्या डोळ्यांत चमक होती. माझ्याकडे पाहून ते पुन्हा बोलायला लागले, मला या मुलांवर गर्व आहे, जे जमीनीवर बसूनही पूर्ण ऊर्जेने शिक्षण घेत आहेत. आधी मी एकटा त्यांना शिकवायचो. आता माझी मुलेही माझी मदत करतात.
माझा पुढचा टप्पा होता...
अन्नया स्कूल, बंगळुरू
इनोव्हेशन -
पुस्तक नव्हे, वास्तविक वस्तूंच्या सोबतीने शिक्षणावर भर
भाजी कशी विकत घ्यावी, हेही शिकवतात शिक्षक

ज्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शाळेत प्रवेश मिळत नाही तिच मुले इथे शिकू शकतात. ज्यांचे पालक मजुरी करतात किंवा मुले बालमजुरी करतात, अशा मुलांना अन्नया फाऊंडेशनच्या शाळेत शिक्षण दिले जाते.
ज्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शाळेत प्रवेश मिळत नाही तिच मुले इथे शिकू शकतात. ज्यांचे पालक मजुरी करतात किंवा मुले बालमजुरी करतात, अशा मुलांना अन्नया फाऊंडेशनच्या शाळेत शिक्षण दिले जाते.

इथे एका फार्महाऊसमध्ये वर्ग भरतो. मुले खेळ, झोप आणि जेवताना शिकतात.
तुम्ही नीट वाचले ना, चला पुन्हा लिहिते... अन्नया शाळेत मुले खेळ, झोप आणि जेवताना शिकतात.
आता तुम्ही म्हणाला अशी काय शाळा आहे, जिथे शिकण्यालाच कमी महत्व दिले जाते. असे नाही. इथे मुलांवर शिक्षण लादले जात नाही. इथे वास्तविक वस्तूंच्या सह मुलांना शिक्षणाची ABC शिकवली जाते.
वास्तविक वस्तूंच्या सह शिक्षण म्हणजेच त्यांना भाजीपाला आणि किराणा खरेदीची यादी कशी तयार करावी हेही शिकवले जाते.
इथे मुलांवर शिक्षणासाठी दबाव टाकला जात नाही. मुले स्वतःच निवडू शकतात की त्यांना काय शिकायचे आहे. मुलांना केव्हा शिकायचे आहे याचीही सूट असते.
या शाळेची संकल्पना डॉ. शशी राव यांनी मांडली होती. 1998 मधील ही गोष्ट आहे. डॉ. शशी राव समाजात बालमजुरी करणारी मुले बघून व्यथित व्हायचे. त्यांनी काही जणांच्या सोबतीने या मुलांसाठी काहीतरी करायचा निर्णय घेतला.
अशा अंडरप्रिव्हिलेज्ड मुलांना शिकवण्यासाठी अनेक लोक पुढे येतात. त्यांना शिकवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. डॉ. राव यांनी कशा पद्धतीने हे हाताळले?
उत्तर मिळाले - पाठ्य पुस्तके नव्हती. शिकवण्याची पद्धत लवचिक होती. मुलांना प्रेमाने शिकवले जात होते. त्यांची काऊंसेलिंग आणि देखभाल चांगल्या पद्धतीने केली जात होती, म्हणून ते शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत होते. ते प्रत्येक गोष्ट अतिशय प्रेमाने शिकायला लागले आणि आमचे काम सोपे होत गेले.
जाता-जाता चौथ्या इनोव्हेटिव्ह शाळेविषयीही वाचा...
लेव्हलफील्ड स्कूल, सूरी, पश्चिम बंगाल
इनोव्हेशन -
वृत्तपत्रे, ट्विटर फीड आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांमधून शिकतात मुले, अॅपवर करतात प्रॅक्टिस
गूगल स्टोअरवरील अॅपचाही अभ्यासक्रमात समावेश

इंटरनॅशनल फिल्म हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. या माध्यमातून मुलांना जीवनाचे धडे दिले जातात.
इंटरनॅशनल फिल्म हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. या माध्यमातून मुलांना जीवनाचे धडे दिले जातात.

माझी आई म्हणायची की, ओठांतल्या ओठांत काय कुजबुजतेयस, मोठ्याने वाच, लवकर पाठ होईल. मीही तिला खूश करण्यासाठी पाठांतर करायचे. पण अर्घ्य बॅनर्जींनी असे केले नाही. त्यांना पाठांतर आवडत नव्हते. येणाऱ्या पिढीनेही असे करावे हे त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांची शाळा सुरू केली. या शाळेत मुलांना होमवर्क दिला जात नाही. मुले वृत्तपत्रे, ट्विटर फीड आणि स्टोरीबूक्समधून शिकतात. शाळेतच बनवलेली वर्कबूक आणि अॅपमधून ही मुले सराव करतात. अर्घ्य पश्चिम बंगालमधील गावात शाळा चालवतात. त्यांच्या शाळेत मुले कँटिन मॅनेज करणे, ब्लॉगिंग, आणि आयटीचे बेसिक्स्ही शिकतात. त्यांना माहिती असते की टीमसोबत कसे बिहेव करावे आणि आपली समस्या कशी सोडवावी. अर्घ्य म्हणतात की, मी अशा अनेक लोकांना ओळखतो, ज्यांच्याकडे पदवी तर आहे, पण प्रॅक्टिकल नॉलेज कमी आहे. पाठांतर थिएरीमुळे हे आहे. शिक्षण पूर्ण झाल्याच्या अनेक वर्षांनंतर तुम्ही बेसिक स्किल्सची अपेक्षा ठेवता, ते आहे प्रोफेशनल कामासाठी ई-मेल कसा लिहावा. लॉकिजली आपल्या आयडिया कशा एक्सप्रेस कराव्या. आम्ही मुलांना हे सर्व शिकवतो. जे लोक ट्रॅडिशनल स्कूल आणि पद्धतींवर विश्वास ठेवतात. त्यांची आम्ही माफी मागतो, कारण लेव्हलफील्ड स्कूल शिक्षणाच्या सर्व चौकटी मोडून काढते. ज्या चौकटी भारतीय शिक्षणपद्धतींकडून पाळल्या जात आहेत. आठव्या इयत्तेपर्यंत लेव्हलफील्ड स्कूलमध्ये स्वतः बनवलेला अभ्यासक्रम आणि पद्धतीने शिक्षण दिले जाते. यात गूगलस्टोअरवरील 12 अॅपचा समावेश आहे.

शिक्षक दिनानिमित्त वाचा ही खास स्टोरी...

शिक्षक दिनी 4 इनोव्हेटिव्ह शिक्षकांची स्टोरी:हिंदीच्या शिक्षकाने शिकवले कोडिंग, सरकारी शाळेतील मुले बनवतात अॅप, वाचा

बातम्या आणखी आहेत...