आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sri Lanka Crisis Vs Rajapaksa Family । Rajapaksa Family Tree; Chinease Loan On Sri Lanka, Indian Help To Sri Lanka

दिव्य मराठी एक्सप्लेनर:श्रीलंकेच्या जनतेने का जाळली राजपक्षे कुटुंबाची घरे, यांनीच 75% बजेट काबीज करून देश कसा केला बरबाद?

लेखक: नीरज सिंहएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एक असा देश जेथे खायला धान्य नाही, रुग्णांसाठी औषधे नाहीत, एटीएममध्ये पैसे नाहीत, पेट्रोल आणि डिझेलचे संकट आहे. 16 तास वीजकपात सुरू आहे. परदेशातून जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी डॉलर शिल्लक नाहीत.

आम्ही बोलत आहोत आपला शेजारी देश श्रीलंकेबद्दल, जो स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे श्रीलंकेत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटासाठी श्रीलंकेतील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंब राजपक्षे यांना जबाबदार धरले जात आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत राजपक्षे कुटुंबातील पाच प्रमुख सदस्यांनी देशातील सर्वात प्रमुख मंत्रिपदे भूषवली. असा दावा केला जातो की राजपक्षे कुटुंबाकडे त्यावेळी श्रीलंकेच्या बजेटच्या 75% रक्कम होती.

यामुळेच श्रीलंकेतील लोक राजपक्षे कुटुंबाला देशातील आर्थिक संकटासाठी जबाबदार धरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून श्रीलंकेतील लोक या कुटुंबाविरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. त्याचवेळी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या विरोधामुळेच 9 मे रोजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अशा परिस्थितीत जाणून घेऊया की, श्रीलंकेच्या राजकारणात राजपक्षे कुटुंबाचा किती प्रभाव आहे? राजपक्षे कुटुंब किती काळ सत्तेत होते? घराणेशाहीचे राजकारण वाढवण्यासाठी या घराण्याने घटनादुरुस्ती कशी केली?

राजीनामा दिल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी समर्थकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते का?

1948 मध्ये स्वतंत्र झालेला श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. येथे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. जनता आणि विरोधक यासाठी राजपक्षे कुटुंबीयांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांना जबाबदार धरत आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये मार्च महिन्याच्या अखेरपासून निदर्शने सुरू आहेत. त्रस्त लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पायउतार व्हावे अशी मागणी करत आहेत, ते गो गोटाबाया गो अशा घोषणा देत आहेत.

जनतेच्या दबावानंतर राजपक्षे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी राजधानी कोलंबोमध्ये हिंसक घटना घडवून आणल्या. यानंतर त्यांचे विरोधकही संतापले. आंदोलकांनी हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 12 हून अधिक मंत्र्यांची घरे जाळली गेली आहेत.

महिंदा यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केली आहे. महिंदाने शांतताप्रिय आंदोलकांना भडकावले आणि हिंसाचार भडकावला असे त्यांचे म्हणणे आहे. महिंदा राजपक्षे मंगळवारी नौदलाच्या तळावर कुटुंबासह लपून बसले. तळाबाहेर आंदोलक आहेत. ते राजपक्षे यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहेत.

1948 मध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून राजपक्षे कुटुंब श्रीलंकेच्या राजकारणात

राजपक्षे कुटुंबीयांचा राजकारणाशी संबंध श्रीलंकेत नवीन नाही. डीएम राजपक्षे हे 1948 मध्ये स्वातंत्र्यापूर्वी 8 दशके सिलोनच्या राज्य परिषदेचे सदस्य होते. श्रीलंकेला पूर्वी सिलोन म्हणून ओळखले जात असे. डीएम यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे भाऊ डीए राजपक्षे राज्य परिषदेचे सदस्य झाले. स्वातंत्र्यानंतर, डीए राजपक्षे खासदार झाल्यानंतर त्यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

या डीए राजपक्षे यांची 4 मुलेच गेल्या 20 वर्षांपासून श्रीलंकेचा कारभार पाहत आहेत. महिंदा राजपक्षे, गोटाबाया राजपक्षे, बेसिल राजपक्षे आणि चमल राजपक्षे अशी त्यांची नावे आहेत. महिंदा राजपक्षे 2004 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यानंतर ते श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2009 मध्ये, जेव्हा महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा गोटाबाया यांनी संरक्षण मंत्री म्हणून LTTE या फुटीरतावादी संघटनेचा बीमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी चमल आणि बेसिल राजपक्षे हेदेखील सरकारचा भाग होते. चमल तेव्हा सभागृहाचे अध्यक्ष होते आणि बेसिल सरकारमध्ये मंत्री होते.

घटनादुरुस्ती करून राष्ट्रपतींचे अधिकार वाढवून घेतला फायदा

महिंदा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 2015 मध्ये राजपक्षे कुटुंबाला सत्तेतून बाहेर काढण्यात आले. तथापि, 2019 मध्ये जेव्हा गोटाबाया राष्ट्रपती झाले, तेव्हा एक एक करून सर्व भाऊ आणि इतर कुटुंबीय सरकारचा भाग बनले. 2020 मध्ये राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेच्या घटनेतील 20व्या दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींच्या अधिकारांचा अमर्याद विस्तार केला. याअंतर्गत राष्ट्रपती पंतप्रधानांसह मंत्र्यांची नियुक्ती किंवा बडतर्फ करू शकतात आणि मनाला येईल तेव्हा मंत्रालयांची संख्या, मंत्र्यांची संख्या आणि प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या कार्यांमध्ये बदल करू शकतात.

बलाढ्य राजपक्षे कुटुंबाने मिळून श्रीलंकेला कसे बुडवले

मार्चमध्ये श्रीलंकेत मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा देण्यापूर्वी शक्तिशाली राजपक्षे कुटुंबातील पाच सदस्य सरकारमध्ये होते. त्यात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, सिंचन मंत्री चमल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांचा समावेश होता. श्रीलंकेच्या या स्थितीला या कुटुंबाचा भ्रष्टाचार आणि चुकीची धोरणे जबाबदार मानली जात आहेत. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, फेब्रुवारी 2022 पर्यंत श्रीलंकेच्या बजेटपैकी 75% राजपक्षे कुटुंबातील मंत्र्यांच्या ताब्यात होते.

चला जाणून घेऊया श्रीलंकेला उपासमारीच्या उंबरठ्यावर ढकलणाऱ्या राजपक्षे कुटुंबातील प्रमुख लोकांबद्दल…

'द चीफ' महिंदा राजपक्षे : श्रीलंकेला चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकवले

महिंदा हे राजपक्षे कुटुंबातील सर्वात शक्तिशाली मानले जातात. ते एक दशक श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. 2009 मध्ये एलटीटीईचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महिंदा हे राजपक्षे कुटुंबातील सर्वात शक्तिशाली मानले जातात. ते एक दशक श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. 2009 मध्ये एलटीटीईचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

76 वर्षीय महिंदा राजपक्षे हे कुटुंबाचे करिष्माई प्रमुख आहेत, त्यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. 2009 मध्ये फुटीरतावादी तमिळ बंडखोर गट एलटीटीईच्या उच्चाटनानंतर महिंदा राजपक्षे हे श्रीलंकेतील सिंहली बौद्ध समुदायातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.

महिंदा यांच्या कारकिर्दीतच श्रीलंका आणि चीन यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी चीनकडून 7 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. विशेष म्हणजे बहुतांश प्रकल्प फसवे ठरले असून त्यांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

'द टर्मिनेटर' गोटाबाया राजपक्षे: चुकीच्या आर्थिक धोरणांनी देश बुडवला

गोटाबाया राजपक्षे हे अजूनही श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे श्रीलंकेची स्थिती बिघडली आहे.
गोटाबाया राजपक्षे हे अजूनही श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे श्रीलंकेची स्थिती बिघडली आहे.

72 वर्षीय राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख सरदार होते. संरक्षण मंत्री असताना त्यांचे सशस्त्र दल आणि पोलिसांवर जबरदस्त नियंत्रण होते. गोटाबायांवर डेथ स्क्वॉड तयार केल्याचाही आरोप आहे. याद्वारे त्यांनी आपल्या डझनभर विरोधकांचे पांढऱ्या व्हॅनमधून अपहरण करून त्यांना गायब केले आहे.

शीघ्रकोपी स्वभावामुळे विरोधकही त्यांना घाबरतात. त्यामुळे घरातील लोक त्यांना टर्मिनेटर म्हणतात. अनेक तज्ज्ञ सध्याच्या संकटाचे कारण गोटाबायांच्या कर कपातीपासून ते शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घालण्यापर्यंतचे धोरण असल्याचे सांगतात.

'मिस्टर 10 पर्सेंट’ बासिल: करारांमध्ये कमिशन आणि लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार

अर्थमंत्री असलेल्या बासिल राजपक्षे यांना सरकारी कंत्राटांमध्ये कमिशन घेतल्याने मिस्टर टेन पर्सेंट असेही म्हटले जाते.
अर्थमंत्री असलेल्या बासिल राजपक्षे यांना सरकारी कंत्राटांमध्ये कमिशन घेतल्याने मिस्टर टेन पर्सेंट असेही म्हटले जाते.

71 वर्षीय बासिल राजपक्षे हे आतापर्यंत अर्थमंत्री होते. श्रीलंकेत, त्यांना 'मिस्टर 10 पर्सेंट' म्हणून ओळखले जाते. कारण ते सरकारी करारांवर कमिशन घेतात. राज्याच्या तिजोरीत लाखो डॉलर्सचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, परंतु गोटबाया अध्यक्ष होताच सर्व खटले वगळण्यात आले.

'द बॉडीगार्ड' चामल : पाटबंधारे खात्याचे मंत्री

राजीनाम्यापूर्वी चामल राजपक्षे पाटबंधारे खाते सांभाळत होते.
राजीनाम्यापूर्वी चामल राजपक्षे पाटबंधारे खाते सांभाळत होते.

79 वर्षीय चामल हे महिंदा यांचे मोठे भाऊ असून ते जहाज व विमान वाहतूक मंत्री राहिले आहेत. आतापर्यंत ते पाटबंधारे खाते सांभाळत होते. चामल हे जगातील पहिली महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांचे अंगरक्षक होती.

'वारस' नामल: महिंदाच्या मुलावर मनी लाँड्रिंगचा आरोप

महिंदा राजपक्षे यांच्या मुलाचे नाव नामल राजपक्षे आहे. नामलवर मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
महिंदा राजपक्षे यांच्या मुलाचे नाव नामल राजपक्षे आहे. नामलवर मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

35 वर्षीय नामल महिंदा राजपक्षे यांचा मोठा मुलगा असून तो व्यवसायाने वकील आहे. 2010 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी तो खासदार झाला. आतापर्यंत तो क्रीडा आणि युवा मंत्रालय सांभाळत होता. नामलवर मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याचा आरोप आहे, जो नामलने फेटाळला आहे.

श्रीलंका आर्थिक संकटात कसा अडकला?

श्रीलंकेतील महागाई दर अनेक महिन्यांपासून दहा आकडी आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे संकटात आणखी भर पडली. त्यामुळे परदेशातून घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले. त्याच वेळी, अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की, श्रीलंकेत अनेक वर्षांपासून संकट उभे होते, ज्याचे एक कारण गोटाबाया यांची चुकीची आर्थिक धोरणे आहेत.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या दशकभरात श्रीलंका सरकारने सार्वजनिक सेवांसाठी परदेशातून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले आहे. तसेच अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि सरकारने रासायनिक खतांवर घातलेली बंदी यामुळे देशाला मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली.

काही तज्ज्ञ श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीसाठी राजपक्षे कुटुंब आणि त्यांची चुकीची धोरणे याना जबाबदार मानत आहेत. ते असे मानतात की, जे सरकार सत्तेवर आहे त्यांनाच चुकीचे ठरवले पाहिजे कारण त्यांना माहित होते की आव्हाने काय आहेत आणि त्यांनी यासाठी काहीही केले नाही फक्त फायदेशीर धोरणे चालवत राहिले.