आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sri Lanka Economic Crisis Vs Emergency । Divya Marathi Sri Lanka Ground Report । Sri Lanka Protest Current Situation

श्रीलंकेत आणीबाणी-कर्फ्यू कुचकामी:54 आंदोलकांना अटक, त्यांना सोडवण्यासाठी पोहोचले 600 वकील; अध्यक्ष गोटाबाया यांच्या विरोधकांसाठी पायघड्या

लेखक: पूनम कौशल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेत सरकारवर नाराज असलेले लोक हिंसक आंदोलने करत आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. लोकांमध्ये आता आणीबाणी आणि कर्फ्यूची भीती उरलेली नाही. आंदोलन करताना अटक करण्यात आलेल्या 54 जणांच्या सुटकेसाठी 600 वकील न्यायालयात पोहोचले. कोर्टाला 48 जणांची सुटका करावी लागली. त्याचवेळी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आता विरोधकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारशी हातमिळवणी करण्याची विनंती करताना दिसत आहेत.

श्रीलंकेतील सद्य:स्थिती समजून घेण्यासाठी आम्ही तेथील आंदोलनांचे कव्हरेज करणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराशी बोललो. सुरक्षेच्या कारणास्तव नाव जाहीर न करता त्यांनी तेथील परिस्थिती सांगितली.

श्रीलंकेतील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. देश आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झाला आहे.

आठवडाभराहून अधिक काळ लोक सातत्याने सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. सुरुवातीला त्यांनी मूक निदर्शने सुरू केली होती. पोस्टर बॅनर घेऊन ते शांतपणे उभे राहिले आणि त्यांनी राष्ट्रपतींना राजीनामा देण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या नाहीत.

त्यामुळेच आता हळूहळू निदर्शने आक्रमक होत आहेत. 1 एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या घराजवळ हिंसक निदर्शने झाली. यावेळी आंदोलक आणि सुरक्षेत तैनात असलेल्या स्पेशल टास्क फोर्समध्ये बाचाबाचीही झाली.

वकील म्हणाले, आंदोलकांना कायदेशीर मदत करणार

येथे परिस्थिती खूपच तणावपूर्ण झाली होती. दगडफेक झाली आणि वाहने जाळण्यात आली. हिंसाचारात पाच पत्रकार आणि अनेक आंदोलक जखमी झाले. येथून पोलिसांनी 54 आंदोलकांना अटक केली.

पोलिसांना या आंदोलकांवर पीटीए (प्रिव्हेन्शन अगेन्स्ट टेररिझम अॅक्ट) अंतर्गत गुन्हा नोंदवायचा होता, परंतु 600 हून अधिक वकील न्यायालयात पोहोचले आणि अटक केलेल्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्याची मागणी केली.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या 54 जणांपैकी सहा वगळता सर्वांची सुटका केली. लोकांना आंदोलन करायचे असेल तर कायदेशीर मदत द्यायला तयार आहोत, असा संदेश वकिलांनी एकजुटीने दिला आहे.

आंदोलकांना होतेय मारहाण

श्रीलंकेत राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर करून आणीबाणी लागू केली आहे. सोशल मीडियावर बंदी आहे आणि कर्फ्यूही आहे. असे असतानाही लोक रस्त्यावर येत आहेत. म्हणजेच आणीबाणी आणि कर्फ्यू कुचकामी ठरला आहे. जोपर्यंत हे सरकार जात नाही, तोपर्यंत लोक आंदोलन करत राहणार हेही यावरून दिसून येते.

दरम्यान, श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी विरोधकांना सरकारमध्ये सामील होण्यासाठी आणि एकत्रित सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. संघटितपणेच या संकटातून बाहेर पडू शकतो, असे ते म्हणाले.

आंदोलक कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत आणि राजकीय घोषणा देत नाहीत. त्यांचा एकच नारा आहे - गोटाबाया घरी जा. 3 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता देशभरातील लोकांनी एकत्र येऊन निदर्शने केली.

सरकार सर्व शक्तीनिशी निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना अटक केली जात आहे. आंदोलकांना मारहाण केली जात आहे.

श्रीलंकेत गोटाबाया सरकारच्या विरोधात शहरे, रस्त्यावर आणि परिसरात निदर्शने होत आहेत.
श्रीलंकेत गोटाबाया सरकारच्या विरोधात शहरे, रस्त्यावर आणि परिसरात निदर्शने होत आहेत.

माध्यमांवर बंदी आल्याने संतापात भर

सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली असून, त्यामुळे तरुणांमध्ये संताप वाढत आहे. सरकार जितके कठोर होत आहे, तितकाच लोकांचा रोष वाढत आहे. #GoHomeGota हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर बंदी असतानाही लोक ऑनलाइन येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे आपली मते मांडत आहेत.

परदेशातही सरकारविरोधी मोहीम सुरू

आता जगभरात राहणारे श्रीलंकन ​​नागरिकही या मोहिमेत सहभागी होत आहेत. ते निषेध करत आहेत आणि श्रीलंकेच्या जनतेला पाठिंबा व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत जगभरातून गोटाबायांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पत्रकार या नात्याने मीही आंदोलने कव्हर करत आहे. कोलंबोच्या मोराटुवा भागात लाकडाचे काम करणाऱ्या लोकांनी रस्ता अडवला होता. माझ्या लक्षात आले की त्यांनी कोलंबो ते गॉलला जाणारा मुख्य रस्ता बंद केला होता आणि गर्दी वाढत चालली होती.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमकही झाली आहे. मोराटुवाच्या महापौरांच्या घराला आंदोलकांच्या एका गटाने घेराव घातला आणि तेथे दगडफेक केली. महापौरांच्या समर्थकांनी आंदोलकांवर दगडफेक केली. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

येथे मी आंदोलकांचा राग समजून घेण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या परिस्थितीत जगणे कठीण झाले असून आता भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रेसिडेंट गोटबाया यांच्या विरोधात #GoHomeGota ट्रेंड करत आहे. लोक यासंबंधित पट्टी बांधून आंदोलन करत आहेत.
प्रेसिडेंट गोटबाया यांच्या विरोधात #GoHomeGota ट्रेंड करत आहे. लोक यासंबंधित पट्टी बांधून आंदोलन करत आहेत.

सोशल मीडियावर बॅन करताच VPNशी जोडले लोक

आंदोलनांसाठी ऑनलाइन मोहीम चालवली जात होती. त्यांना रोखण्यासाठी सरकारने सोशल मीडियावरही बंदी घातली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले गेले आहेत, परंतु आंदोलक VPN वापरत आहेत. मीसुद्धा तुमच्याशी VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) द्वारेच बोलत आहे.

कर्फ्यूच्या काळात रविवारीही आंदोलने झाली आणि शनिवारीही निदर्शने सुरूच होती. लोक कोणत्याही प्रकारे मागे हटायला तयार नाहीत. केवळ राजधानी कोलंबोतच नाही, तर देशातील प्रत्येक शहरात आणि गावात निदर्शने होत आहेत.

जेव्हाही श्रीलंकेत काही घडते तेव्हा राष्ट्रपती राजपत्र अधिसूचना जारी करण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा वापर करतात. निदर्शनांनंतर लोकांना एकत्र येण्यास मनाई करणारी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. मात्र, लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मी बर्‍याच लोकांशी बोललो ज्यांनी सांगितले की त्यांच्यासाठी ही राजपत्र अधिसूचना आता एक विनोद ठरला आहे.

पॅनिक बाइंगमुळे परिस्थिती चिघळली

लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यासाठी देशभर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याचा एक परिणाम असा झाला की घाबरलेल्या लोकांनी आपली खरेदी तीव्र केली. पॅनिक बाइंगमुळे परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. आता जो माल मिळतोय, मग किंमत काहीही असो, बहुधा तोही पुढे चालून कोणत्याही भावाला मिळणे दुरापास्त होईल, असे लोकांना वाटते.

ज्या लोकांच्या आवाक्याबाहेर या किमती आहेत किंवा ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, पॅनिक बाइंगमुळे तेही बाजारात जात आहेत आणि जे खरेदी करता येईल, ते खरेदी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...