- Marathi News
- Dvm originals
- Sri Lanka People Suffering From Starvation Took To The Streets, Desperate To Eat; Spent 13 13 Hours In The Dark | Marathi News
15 फोटोंमध्ये श्रीलंकेतील लोकांच्या व्यथा:भुकेने त्रस्त लोक उतरले रस्त्यावर, एकवेळच्या अन्नाची भ्रांत; 13-13 तास अंधारात आयुष्य
भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशात अन्नधान्यापासून ते डिझेल-पेट्रोलपर्यंत सर्वच वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे लोक संतप्त झाले असून त्यांनी सरकारचा निषेध केला आहे. श्रीलंकेचे आर्थिक संकट किती गंभीर आहे याची माहिती आम्ही तुम्हाला 15 फोटोंच्या माध्यमातून देत आहोत.
भारताच्या शेजारील देश श्रीलंकेतील ही महिला LPGच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर लाकडाच्या धुरात गुदमरून कुटुंबासाठी अन्न शिजवत आहे. अर्थव्यवस्थेवर मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यानंतर 12.5 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत अनेक राज्यांमध्ये 4200 रुपयांच्या पुढे गेली आहे.
आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचे परकीय चलन अत्यंत कमी झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे 45 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. विरोधी पक्ष जनता विमुक्ती पेरामुनाच्या युवा विंग सोशलिस्ट युथ युनियनने 18 मार्च रोजी कोलंबोमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते.
घरगुती गॅस महागल्याने लोकांना रॉकेलवर स्वयंपाक करावा लागत आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत रॉकेलही 85 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. एवढेच नाही तर ते खरेदी करण्यासाठी लोकांना तासनतास वाट पाहावी लागते. छायाचित्रात बसलेली ही वृद्ध महिला आणि बालक इंधन केंद्राबाहेर रॉकेलची टाकी येण्याची वाट पाहत आहेत.
श्रीलंकेतील इंधनाच्या संकटामुळे लोकांना स्वयंपाकासाठी साधनांची व्यवस्था करणे सर्वात कठीण झाले आहे. हातात प्लास्टिकचे डबे घेऊन हे लोक रॉकेल घेण्यासाठी कडक उन्हात तासन्तास लांब रांगेत उभे आहेत. मात्र, भारताने शेजारी धर्माचे पालन करत 40 हजार मेट्रिक टन डिझेलची मदत श्रीलंकेला पाठवली आहे.
प्रथमदर्शनी फोटो पाहून तुम्हाला वाटले असेल की हा तरुण टँकरवर चढून श्रीलंका सरकारच्या विरोधात घोषणा देत आहे, पण तसे नाही. वास्तविक, इंधन स्टेशनवर तासनतास वाट पाहिल्यानंतर जेव्हा टँकर इंधन स्टेशनवर पोहोचला तेव्हा या तरुणाच्या आनंदाला पारावार उरला नाही. हा तरुण टँकरवर चढला आणि आनंद साजरा करू लागला.
30 मार्च रोजी रस्त्यावर रिकाम्या तेलाचे डबे घेऊन बसलेले हे लोक तासनतास इंधन केंद्रावर टँकरची वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही लोकांच्या पदरी निराशाच पडल्याने संतप्त नागरिक आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी कंटेनरसह रस्त्यावर उतरले. त्यामुळे तासनतास जाम झाला होता.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकन नागरिकांना घरगुती गॅस आणि इंधनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, त्याचबरोबर अन्न संकटानेही लोकांना घेरले आहे. प्रत्येक आघाडीवर सरकारच्या अपयशी धोरणांची फळे जनता भोगत आहे. श्रीलंकेत तांदूळ 200 रुपये किलोने विकला जात आहे. इतकेच नाही तर कांदा 150 रुपये किलो तर हळद 750 रुपये किलो झाली आहे.
राष्ट्रपती भवनासमोरील आंदोलकांच्या चेहऱ्यावरचा हा संताप, राजपक्षे कुटुंबीय आणि सरकारविरोधात बुलंद आवाज, सध्याच्या सरकारला गुडघे टेकवण्याचा मनसुबा आणि महागाईने होरपळलेल्या जनतेचा रोष या सर्व गोष्टी आपल्याला या फोटोत दिसू शकतात.
सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या या भोळ्याभाबड्याच्या डोळ्यात एक असा प्रश्न आहे, ज्याच्या उत्तरात लाचारी भरलेली आहे. श्रीलंकेतील जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. 31 मार्च रोजी, तासनतास वीज खंडित झालेल्या लोकांनी निदर्शने केली आणि राजपक्षे सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
श्रीलंकेतील या दयनीय परिस्थितीसाठी राजपक्षे कुटुंब जबाबदार मानले जात आहे. विरोधकांनीही सरकारला घेरण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 31 मार्च रोजी विरोधकांनी मशाल दाखवून निषेध केला. पुढे या आंदोलनालाही हिंसक वळण लागले.
जेव्हा लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतात तेव्हा सर्वप्रथम लोक सैन्याचा सामना करतात. श्रीलंकेतही तेच होत आहे. आंदोलकांना तोंड देण्यासाठी श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
सरकारमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली, तर सत्तेचा पाया हादरवण्यासाठी जनता कोणत्याही थराला जाऊ शकते. हा फोटो जनतेच्या संतापाचे जिवंत उदाहरण आहे. फोटोत बस पेटवून नाचणारे लोक हे जनतेच्या या अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचा पुरावा आहे.
सत्तेविरोधातील आंदोलनांना अचानक हिंसक वळण लागले, सरकारच्या धोरणांमुळे श्रीलंका उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हिंसक जमावाचा पोलिसांशी सामना झाला, तेव्हा आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले. या छायाचित्रात जखमी पोलीस कर्मचाऱ्याला इतर पोलीस रुग्णालयात नेत आहेत.
3 एप्रिलच्या या फोटोमध्ये एकीकडे प्रशासन तर दुसरीकडे जनता. एका बाजूला सरकारची फौज, तर दुसरीकडे सरकार निवडणारी जनता. 31 मार्चला हिंसक आंदोलन होऊनही राष्ट्रपती भवनाजवळ पुन्हा निदर्शने झाली. यापुढे सरकार आपली फसवणूक करू शकत नाही हे सर्वसामान्य नागरिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.